Saturday, 24 August 2013

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

नळदुर्ग -: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दि. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते म्हणून भ.ना. कदम हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच यशवंत गायकवाड हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजेंद्र गरड, सोसायटी चेअरमन लक्ष्मण गायकवाड, तंटामुक्त अध्यक्ष दयानंद मोटे, बसपाचे आर.एस. गायकवाड, राष्ट्र सेवा दलाचे दयानंद काळुंके, रिपाइंचे तानाजी कदम, आनंद पांडागळे यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दगडू काळुंके, महादेव काळुंके, अविनाश काळुंके, सतिश काळुंके, धोंडीबा काळुंके यांनी केले आहे.

Labels: