उस्मानाबाद -: मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन तुळजापूर विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रलंबित कामाचा आढावा घेतला. 
    यावेळी त्यांचे समवेत सहायक आयुक्त रामोड, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, अप्पर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिरासे, तहसीलदार  काशीनाथ पाटील, गटविकास अधिकारी विलास खिल्लारे, नियोजन अधिकारी एम.के. भांगे आदि अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी मंदीर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी  डॉ. नारनवरे यांनी श्री तुळजाभवानीची प्रतिमा देऊन जयस्वाल यांचा सत्कार केला. यावेळी मंदीर संस्थानचे  तहसीलदार सुजित नरहरे, सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह मंदीर संस्थानचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
 
Top