तिस-या दिवशी लोकनृत्य स्पर्धा सपन्न
पांगरी (गणेश गोडसे) ढोल,ताशे,संभळ,हार्मोनियम,टिपर्या,यांच्या गजरात सोलापूर विद्यापीठातील सहभाग घेतलेल्या 22 विद्यालयातील विद्यार्थांनी वेगवेगळ्या राज्यातील लोकनृत्यांनी शाहीर अमर शेख व्यासपीठ दणाणून सोडले.सोलापूर विद्यापीठ व शिवाजी महाविद्यालय बार्शी यांच्या विद्यमाने बार्शी येथे सुरू असलेल्या युवा मोहोत्सवाच्या तिसर्या दिवसी शेवटच्या सत्रात लोकनृत्य स्पर्धा पार पडल्या.जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या विध्यार्थ्यानी लोकनृत्य स्पर्धाना अक्षरक्ष;डोक्यावर घेतले.
मधूनच जोरदार शिट्या,सादरकर्त्या विद्यालयाच्या मुलांकडून मिळणारा उस्फूर्त प्रतिसाद आदि प्रकारांनी सभागृह दणाणून जात होते.लोकनृत्य स्पर्धामध्ये पोतराज नृत्य,आदिवाशी नृत्य,कोळी नृत्य,राजस्थानी नृत्य,गोंड नृत्य,देवीचे जागरण गोंधळ,पंजाबी भांगडा,एकविरेची पालखी ,वाघ्या मुरळी गीत,झारखंड राज्याचे लोकगीत,गरबा,आदि विविध राज्यातील लोकगीतचे व कला प्रकारचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.के.एन.भिसे विद्यालय कुर्डुवाडी च्या विध्यार्थ्यानी सादर केलेल्या वाघ्या-मुरुळी गीतास प्रेशकांनी मनभरुन दाद दिली.शिवाजी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यानी सादर केलेले आदिवाशी लोकनृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावले.संगमेश्वर च्या विध्यार्थ्यानी केलेले गरबा नृत्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.झाडबुके च्या विध्यार्थ्यानी जोतिबाच्या नावाने चांगभले चा गजर करून ज्योतिबा दर्शन घडवून दिले.दयानंद च्या विध्यार्थ्यानी येळकोट येळकोट जय मल्हार हे खंडोबा गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.कलाकारांनी श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले.
लोकमंगल महाविद्यालय,ए.आर.बिर्ला,ए.जी.पाटील,लक्षिमीबाई पाटील,कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर,वालचंद,सांगोला महाविद्यालय,दयानंद,संतोष भीमराव पाटील आदि जिल्ह्यातील महाविद्यालयांनी लोकनृत्य स्पर्धामध्ये सहभाग घेतला.उपस्थित हजारो प्रेक्षकांनी स्पर्धाचा मनमुराद आनंद घेतला.मान्यवरांनीही गीतावर ठेका धरायला भाग पाडले.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शशिकांत कदम(सातारा),राजेंद्र संकपाळ,डॉ.टी.पी.शिंदे(पुणे)यांनी काम पाहिले.

Labels: Barshi

<< Home