उस्‍मानाबाद - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत फेब्रु/ मार्च-2015 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेत नियमीत प्रविष्ठ होणाऱ्या विदयार्थ्यांसाठी  ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विदयार्थ्यांनी  शाळा/कनिष्ठ महाविदयालयाकडे ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र सादर करावे, असे आवाहन सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी  एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
         नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र दि.14 ते 21 ऑक्टोबर, बँकेत चलन सादर करण्याची तारीख 22 ते 30 ऑक्टोबर, विभागीय मंडळाकडे चलन व विदयार्थ्यांच्या यादया जमा कराण्‍याची तारीख 31 ऑक्टोंबरपर्यंत निधार्रित करण्यात आली आहे.  विलंब शुल्कासह बुधवार, दि. 22 ते 31 ऑक्टोबर,  बँकेत चलन सादर करण्याची तारीख 1 ते 5 नोंव्हेंबर, विभागीय मंडळाकडे चलन व विदयार्थ्यांच्या यादया जमा करण्‍याची तारीख 7 नोंव्हेंबर 2014 अशी आहे. तसेच आवेदनपत्र www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर भरता येतील. आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विदयार्थ्यांनी आवेदनपत्र आपल्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविदयालयांशी संपर्क साधावा. ऑनलाईनने आवेदनपत्रे भरताना येणाऱ्या अडचणीबाबत प्राचार्य, मुख्याध्यापकांनी संबधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावयाचा आहे. मुख्याध्यापक / प्राचाऱ्यांनी  विदयार्थ्यांच्या यादया प्रचलित शुल्क प्रमाणे बँक ऑफ इंडिया चलनाची प्रत दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करावे,असेही आवाहन करण्यात आले आहे
 
Top