बार्शी : गावामध्ये आरोग्य नांदायचे असेल तर ग्रामस्वच्छता महत्वाची असून त्यासाठी समाजघटकातील प्रत्येकाने योगदान दयावे असे प्रतिपादन सनदी अधिकारी अविनाश सोलवट यांनी केले. तालुक्यातील आगळगांव येथे मातृभूमी प्रतिष्ठान व रोटरी क्लब, ग्रामपंचायत आगळगांव व ग्रामविकास संस्था आगळगांव यांच्या संयुक्त विदयमाने गावात राबविलेल्या विविध उपक्रमांचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
विठ्ठल मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्यंकटेश भट, पोलिस उपायुक्त डी.टी.शिंदे, पिंपरी चिंचवडचे तहसीलदार किरण काकडे, वृक्षमित्र मधुकर डोईफोडे, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे ,उपाध्यक्ष तथा रोटरी अध्यक्ष गौतम कांकरिया,सहसचिव मुरलीधर चव्हाण, सहकार विभागाचे उपसचिव संतोष पाटील, पद्माकर चवरे, वित्त व लेखा अधिकारी धनराज गरड, समाजकल्याण विभागाचे कक्ष अधिकारी सुनिल उकिरडे,संस्थाचालक किरण मोरे, पो़नि़ अजय गरड, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, सरपंच सुमन गरड, सचिव प्रताप जगदाळे, सुभाष जवळेकर, विजय शहा, अशोक हेड्डा, सयाजी गायकवाड ,अजित कुंकुलोळ ,विठ्ठल उकिरडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतिश पाठक, आदी उपस्थित होते.
अविनाश सोलवट म्हणाले, आपल्या जन्मभूमीसाठी आपण कांहीतरी देणे लागतो या भावनेतून विधायक कार्यासाठी प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे.  प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभाागातून सामाजिक विकास साधण्यावर भर देण्यात येत आहे. दूषित पाणी हेच बहुतांशी आजाराचे मूळ आहे. त्यातही ग्रामीण भागात हे  प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याच प्रश्नाला प्रथम प्राधान्य देवून प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर 5 ठिकाणी जलशुध्दीकरण प्रकल्पाद्वारे ग्रामस्थांना शुध्द पाणी देण्याचा प्रयत्न आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीं व ग्रामस्थांकडून मागणी आल्यास त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे सांगितले. पणन मंडळाचे सहसचिव संतोष पाटील यांनी राज्यातील विविध गावांमधील दूषित पाण्यामुळे आजार होण्याचे प्रमाण पाहिल्यानंतर शुध्द पाणी योजना राबविण्याची संकल्पना सुचली व त्यातूनच ती प्रत्यक्षात आणल्याचे सांगितले. पोपट पवार यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या हिवरेबाजार ची यशोगाथा सांगून आदर्शवादाची कास धरा असा संदेश दिला. वृक्षमित्र मधुकर डोईफोडे यांनी पर्यावरणाच्या ºहासामुळेच दुष्काळी परिस्थितीला तोंड दयावे लागत असून वृक्षांचे संगोपनच आपल्याला वाचवेल असा संदेश दिला.धनराज गरड, किरण मोरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. 
यावेळी निवारा शेड, विदयार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात बसविण्यात आलेल्या खेळणी, तसेच शुध्द पाण्याच्या प्लँटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कृषी अधिकारी सयाजी गायकवाड यांच्या हस्ते केशर आंबा रोपांचे वाटप तसेच लहान मुलांना आरोग्य कार्डाचे वाटप करण्यात आले. वैयक्तिकरित्या 2 वनराई बंधारे तयार केल्याबद्दल लखन मडके याचा तसेच विविध स्पर्धेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय थिटे, ज्ञानेश्वर पाटील, शिवलिंग जमदाटे, संतोष थिटे, रविंद्र विधाते, नागनाथ गटकळ, जयेश गरड, एस़डी़ गरड, रामेश्वर जाधव, यांनी परिश्रम घेतले़ प्रास्ताविक प्रताप जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन उकिरडे यांनी केले़ तर आभार राणी कोकाटे यांनी मानले़.

 
Top