उस्मानाबाद :- जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत निवडणूक यंत्रणेने प्रशासकीय पातळीवर केलेली तयारी, प्रचार कालावधी मतदान आणि मतमोजणी यासाठी केलेले नियोजन आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी साधलेला समन्वय यामुळे चारही विधासनभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली.
    जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांनी उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परंडा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी उत्कृष्ट समन्वय साधला. भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचना, विधानसभा मतदार संघाबाबतीत करावयाची अंमलबजावणी विविध कक्षांकडून करुन घ्यावयाची कामे आदीबाबत त्यांनी तसेच निवडणूक यंत्रणेने उत्कृष्ट समन्वय दाखवला. त्याचा परिणाम म्हणजे निवडणूक कालावधीतील विविध कामे अगदी विहित वेळेत पार पडली.
    मतदनाच्या दिवशी दर दोन तासांनिहाय मतदानाची टक्केवारी संबंधित विधानसभा मतदारसंघातून प्राप्त करुन घेवून ती राज्य निवडणूक आयोगाला कळविणे, प्रसारमाध्यमांना देण्यासाठी मिडिया कक्षास तात्काळ उपलब्ध करुन देणे आदींमुळे माहिती  सहज व वेळेवर उपलब्ध झाली.
    मतदानाच्या दिवशीही चारही मतदार संघातील माहिती फेरीनिहाय ईमेलव्दारे उपलब्ध करुन देण्यात उपलब्ध करुन देण्यात आल्याने जिल्हास्तरीय प्रसारमाध्यमांसाठी ते सोईचे ठरले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वयातून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कामे चांगल्या पध्दतीने पार पाडली.
    चारही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या मतदार संघात विविध कक्षाव्दारे निवडणूक प्रक्रिया सुनियोजितपणे राबविली त्यामुळे जिल्ह्यात कुठल्याही मतदारसंघात वाद विवाद न होता ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.       
 
Top