पांगरी (गणेश गोडसे) : पांगरी (ता. बार्शी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजेंद्र राऊत गटाचे विजय गोडसे यांची पुनश्च बिनविरोध निवड करण्यात आली तर भारत वाकडे यांना उपसरपंचपदी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. रामभाऊ लाडे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यानी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पांगरी ग्रामपंचायत कार्यालयात पांगरीचे मंडल अधिकारी बेले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
    पांगरी ग्रामपंचायतिच्या पंधरा सदस्यापैकी तेरा सदस्य हे राऊत गटाचे असून सरपंच पद हे सर्वसाधारण गटातील पुरुष प्रवगासाठी खुले आहे.सरपंच पद विभागून घेण्याचे ठरल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.यावेळी माजी सरपंच रामा लाडे,जयंत पाटील,विशाल गरड,ग्रामपंचायत सदस्य सतीश जाधव,अकील बागवान,सौ.सुमन देशमुख,सौ.पद्मिन कोळी,सौ.शोभा जानराव,पांगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख,पांगरी ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर,तलाठी राठोड,देशमुख,दिलीप जानराव,अनिल गरड,पप्पू देशमुख,चंद्रकांत गोडसे आदि उपस्थित होते. निवडिंनंतर गावात गुलाल न उधळता व फटाक्याची आतिषबाजी न करता कसलाही जल्लोष करण्यात आला नाही.
 
Top