प्रसिद्ध छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या
मुंबई : ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी दादर परिसरातील साईचरण इमारतीत त्यांच्या निवासस्थानी घडली.
दादरमधील शिवसेना भवनासमोरिल साईटरण इमारतीत तिसऱया मजल्यावर गजानन घुर्ये वास्तव्याला होते. शनिवारी सकाळी त्यांनी आपल्या बेडरूममध्ये पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी साडेसात सातच्या सुमारास हा सर्व प्रकार पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
राजकीय क्षेत्रात कुशल छायाचित्रणात गजानन घुर्ये प्रसिद्ध होते. 'जीजी पिक्स' नावाने त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे संकेतस्थळही इंटरनेटच्या जालात त्यांनी सुरू केले होते. गजानन घुर्येच्या आत्महत्येमुळे छायाचित्रकार क्षेत्र शोकाकूल झाले आहे.

Labels: पोलीस डायरी

<< Home