उस्‍मानाबाद :- राज्य घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावे तसेच तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी मंजूर करवून घेऊन गावातील धनगर वस्तीच्या विकासासाठी तो निधी खर्च करावा, या मागण्यांसाठी धनगर समाजबांधवांनी मेंढरांसह ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला.
    गावातील श्रीखंडोबा मंदीर येथून सकाळी १० वाजता सामाजिक कार्यकर्ते शिवाजी फस्के, दत्ता सुडके, धनगर विकास परिषदेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी गावडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास प्रारंभ झाला. मेंढपाळ व्यावसायिक गोरोबा कोकरे व लक्ष्मण गाडे यांनी आपल्या मेंढरांसह मोर्चात सहभाग नोंदविला. ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बाप्पाचं’, ‘धनगर आरक्षण जाहीर झालेच पाहिजे’, अशा घोषणा देत हा मोर्चा ग्रामपंचायतसमोर आला. धनगर विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. गोविंद कोकाटे व तालुका उपाध्यक्ष शिवाजी गावडे यांनी मोर्चेकर्‍यांना मार्गदर्शन करून या मोर्चामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपसरपंच बाळासाहेब माने यांनी आपले मनोगत व्यक्त करून धनगर समाजबांधवांच्या या आंदोलनास पाठींबा जाहीर केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी गावडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ सोनटक्के, माजी सरपंच मोहन खापरे, नंदकुमार गावडे, नवनाथ कांबळे, महादेव गावडे, गोरोबा घोडके, शंकर वाघे, अविनाश सोनटक्के, सचिन कोरे, मारूती कस्पटे, नारायण सोनटक्के, रणजित सोनटक्के, विजय दगडकाडे, तानाजी तानले, दिलीप सोनटक्के, सुहास सोनटक्के, अजय गंगथडे, गणेश गंगथडे, दादा सोनटक्के, रामभाऊ सोनटक्के, मुन्ना वाघुलकर, गजेंद्र वाघुलकर, अंकुश डावकरे, अनिल दाणे, अनिल घोडके, विष्णू सोनटक्के, महेश सोनटक्के, महेश गाडे, आकाश सोनटक्के, बालाजी दाणे, तानाजी फस्के यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक सोनटक्के व तलाठी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
 
Top