Wednesday, 24 September 2014

निकृष्ट रस्त्याच्या समस्येने वाहनातूनच ज्योत निघाली

    बार्शी -  साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी तुळजापूरला येतात. काही जण मिळेल त्या वाहनाने, काही जण पायी तर काही जण हातामध्ये ज्योत घेऊन धावत येतात, त्यांचा गावाकडे परतीचा मार्गही धावतच असतो. निकृष्ठ रस्त्यांमुळे भाविकांचा प्रवास हा त्रासदायक झाल्याने वाहनातच ज्योत ठेवून खडतर प्रवास पूर्ण केला जात असल्याचे दिसून येत आहे.
    थकलेल्या व्यक्तींना विसावा मिळावा यासाठी इतर सोबती व इतर मुबलक साहित्यांचा संच घेतलेली वाहने पाठीमागून बरोबर राहतात. मोठ्या भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांचे अंतर कापत असलसेल्या अनवाणी धावणार्‍या भवानीमातेच्या भक्तांना मागील काही वर्षांपासून खडतर प्रवास घडत आहे. वरचेवर निकृष्ट दर्जांच्या रस्त्यामुळे प्रतीवर्षी आणखी खडतर प्रवासाला सामोरे जात असतांना खराब रस्त्यांच्या ठिकाणी यंदा तर पाऊल कुठे टाकले तर सुरक्षीत राहील असा प्रश्‍नच भाविकांना पडत आहे. त्यामुळेच काही भाविकांनी पायी धावत नेण्यात येणारी ज्योत ही आपल्या वाहनातच ठेवून तुळजापूर कडे प्रस्थान केले आहे.
   

Labels: