Wednesday, 24 September 2014

शिवशक्तीला सर्वोकृष्ट बँक पूरस्कार जाहीर


    बार्शी -  दि महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक्स फेडरेशन लि.मुंबई यांचे वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट बँक पूरस्कार बार्शीतील शिवशक्ती अर्बन को ऑप बँकेला जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण २७ सप्टेंबर रोजी मुंबई मध्ये जाहिर झाला आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ प्रकाश बुरगुटे यांनी दिली आहे. यावेळी संचालक आप्पासाहेब लोखंडे व्यवस्थापक भारत उमाटे गणेश बारंगुळे उपस्थित होते.       
    दि महाराष्ट्र अर्बन को ऑप बँक्स् फेडरेशन ही राज्यातील नागरी सहकारी बँकींग क्षेत्राचे पालकत्व स्विकारलेली सुमारे ३५ वर्शापासून राज्यस्तरावर काम करणारी संघीय संस्था आहे. ५० कोटी पर्यंतच्या ठेवी असलेल्या बँकामध्ये शिवशक्ती ही राज्यांमध्ये सर्वोकृषष्ष्ट ठरली आहे. बँकेच्या शिवशक्ती ही राज्यामध्ये सर्वोकृषष्ष्ट ठरली आहे. बँकेच्या ठेवी नङ्गा एन.पी.ए. भागभांडवल इत्यादी अंतर्गत बाबी तपासून या पुरस्काराची निवड केली जाते. शिवशक्तीने मागील सहा वर्शामध्ये सभासद ठेवीदारांचा विष्वास संपादन करून उल्लेखनीय अशी प्रगती केली आहे. सभासदांना १५टक्के लाभांश विमा संरक्षण नियमित वसूली असा पारदर्शी कारभार केला आहे याची दखल घेत महाराष्‍ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून २०१३ चा आदर्श बँक हा मानाचा पुरस्कार देवून गौरव केला आहे. तसेच बँको २०१३ बार्शी आयकॉन २०१३ आदर्श चेअरमन म्हणून सन्मानीत केले आहे. शिवशक्तीने आर्थिक पाठींबा देवून असंख्य माणस उभी केली. पण त्याच बरोबर समाजप्रबोधन लोकजागृती व्हावी या हेेतूने कर्मवीर व्याख्यानमाला अखंडपणे सुरू ठेवली राज्यभरातील अनेक नामवंत वक्यांनी या व्याख्यानमालेमध्ये हजेरी लावलेली आहे. त्यामुळे बार्शीमध्ये एक सांस्कृतीक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या जिल्हयाचे सुपूत्र नागराज मंजूळे या सर्वसामान्य कुटूंबातील तरूणाने चित्रपट नगरीमध्ये मिळवलेल्या प्रचंड यशाबदद्ल त्यांना सन्मानपत्र देवून प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.राज्यात पडलेल्या भिषण दुष्काळाला ५१ हजाराची रोख मदत तर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोङ्गत पाणी पूरवठा उपक्रमास ७५ हजाराची मदत देणा-या बँकेने बार्शीतील मोक्षधाम जीर्णोध्दारासाठी ११ हजार रूपयाची मदत दिली आहे. याशिवाय गुणवंत विदयार्थी क्रिडा सांस्कृतिक साहित्य कला आदी क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम बँक करत आहे. कर्मवीर डॉ जगदाळे मामा यांच्‍या आदर्श विचाराची कास धरून व मामांची प्रेरणा घेउनच आज बँकेने हे यश मिळवले असल्याचे मत डॉ.बूरगूटे यांनी व्यक्त केले. पूरस्कार जाहीर झाल्याबदद्ल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव सचिव व्ही एस पाटील खजीनदार प्रा अरूण देबडवार ऍड सूभाश जाधवर आदींनी चेअरमन बॉ. प्रकाश बुरगूटे यांचे अभिनंदन केले.

Labels: