उस्मानाबाद - नागरिकांच्या विविध अडचणींची सोडवणूक व्हावी, यासाठी विविध शासकीय यंत्रणा येत्या शनिवारी प्रत्यक्ष सकनेवाडी (ता. उस्मानाबाद) या गावात जाणार आहेत. विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, शासन योजनांचा थेट लाभ त्यांना मिळावा, यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी विविध शासन यंत्रणांच्या प्रमुखांची यासंदर्भात बैठक घेऊन या मेळाव्यात सहभागी होण्याबाबत सूचना दिल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. वाबळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
महसूल विभागासह कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प.चा स्वच्छ भारत अभियान कक्ष यासह विविध विभागांचे स्टॉल्स याठिकाणी लावण्यात येणार आहेत. 
सकनेवाडी ग्रामस्थांनी या योजनांचा आणि शासन आपल्या दारी उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 
Top