उस्मानाबाद -    सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात्त अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग व इतर मागासवर्ग वर्गातील विदयार्थ्यासाठी  भारत सरकार व शिक्षण फी परीक्षा फी या शिष्‍यवृत्तीची योजना सुरु केली आहे. या  योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट सुरु करुन देण्यात आली  आहे. ऑनलाईन नवीन अर्ज व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन व्दारे भरुन या योजनेचा लाभ घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद
इच्छुक विदयार्थ्यांनी  ऑनलाइन फॉर्म भरुन  या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, विदयावेतन आणि परराज्यात शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना शिष्यवूत्ती ई-स्कॉलरशिप या योजनेमध्ये  समावेश करण्यात आला आहे. मागासवर्गीय विदयार्थ्यांकंडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविदयालयाच्या प्राचार्यांनी विदयार्थ्यांच्या निदर्शनास आणून दयावी व विदयार्थ्यास अडचणी आल्यास संबंधितांनी त्वरीत मदत करावी.
जर विदयाथ्यानी ऑनलाईन अर्ज न भरल्यास शिष्‍यवृत्तीपासून वंचित राहील्यास याची जबाबदारी संबंधित महाविदयालयाचे विदयार्थी व प्राचार्यावर राहील, जिल्हयाअंतर्गत  ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याकरीता 235 महाविदयालये कार्यरत असून त्यापैकी अदयाप 75 महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची कार्यवाही चालू आहे.
उर्वरीत महाविदयालयापैकी 68 महाविदयालयातील विदयार्थी ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याकरीता प्रचलित सिस्टीमध्ये गेले नसल्याचे आढळून आले आहे. उपरोक्त महाविदयालयाने आपले अभ्यासक्रम अदयावत केल्यानंतरच विदयाथ्या्रंनी ऑनलाईन शिष्यवृत्ती /फ्रीशिप अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन सिस्टीमने भरता येतील.  विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती /फ्री‍शिप अर्ज विहीत मुदतीत ऑनलाईन सिस्टीमने अर्ज भरण्याकरीता प्राचार्यांनी विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती/ नोटीस बोर्डावर योग्य त्या सूचना डकवाव्यात. ऑनलाईन शिष्यवृत्ती /फ्रीशीप फॉर्म भरुन घेण्याची जबाबदारी  हि प्राचार्याची व विदयार्थ्यांची राहिल याची नोंद घेवून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मागील  वर्षात 22 हजार 796 विदयार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.       
 
Top