उस्मानाबाद - राज्य शासकिय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी विहित नमुन्यात 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँकेमार्फत  कोषागारास सादर करावयाचे असून सर्व राष्ट्रीयकृत बँकेना हयात प्रमाणपत्राची यादी पुरविण्यात आली आहे.
          कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी पुनर्विवाह व पुर्णनियुक्ती/ अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबतचे प्रमाणपत्र कोषागार कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय त्यांचे कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान केले जाणार नाही.    सर्व राज्य शासकिय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी आपले प्रमाणपत्र 15 डिसेंबरपर्यंत विहित नमुन्यात हयात प्रमाणपत्रासमोर स्वाक्षरी करुन संबंधित बॅकेमार्फत  कोषागारात सादर करावीत अन्यथा  माहे डिसेंबर 2014 पासून पुढील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार नाही,  याची सर्व संबधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.     
 
Top