उस्‍मानाबाद -  विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यात शिवसेनेचा एकच उमेदवार विजयी झाला असला तरी सगळ्यात जास्त मते शिवसेनेला मिळाली  आहेत.  जिल्ह्यातील आगामी होणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामास लागावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी केले.
      विधानसभा निवडणूकीनंतर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-याची एक महत्वपूर्ण बैठक मेघमल्हार सभागृहात नुकतीच संपन्न झाली. या बैठकीस मार्गदर्शन करताना पाटील हे बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, आमदार ज्ञानराज चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी पुढे बोलताना पाटील  म्हणाले की, गेल्यावेळी आपल्या जिल्ह्यात शिवसेनेचे दोन लोकप्रतिनिधी होते. यावेळी दुर्देवाने पक्षास एकच जागा मिळाली. मात्र असे असले तरीही इतर पक्षाच्या तुलनेत जिल्ह्यात शिवसेनेस सर्वाधिक मते मिळाली ही आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेस सगळ्यात जास्त म्हणजे २ लाख ३४ हजार, राष्ट्रवादी काँग्रेसला २ लाख २३ हजार, काँग्रेसला १ लाख ३४ हजार तर भाजपाला १ लाख ३२ हजार मते मिळाली आहेत. त्यामुळे आजही शिवसेना जिल्ह्यात एक नंबरवर आहे. असे सांगून आगामी कांही दिवसात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचा पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या निवडणूका जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. तेव्हा शिवसेनेच्या सर्व पदाधिका-यासह शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आतापासूनच कामास लागावे असे आवाहन त्यांनी केले.
     या जिल्ह्यात दुष्काळ पडण्यास नैसर्गिक कारणे असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने या जिल्ह्यातील सहकारी संस्थाचे आर्थिक दिवाळे काढळल्यामुळे त्याचा फटकाही शेतक-यांना सहन करावा लागला आहे. शेतक-यांना कमी व्याजात कर्ज देणारी जिल्हा मध्यवर्ती बँक,काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांनी डबघाईस आणली, त्यामुळे शेतक-यांना इतर बॅकाचे चढ्या व्याजदराचे कर्ज घ्यावे लागते, जिल्हा दुध संघ या लोकांनी बंद पाडला, त्यामुळे शेतक-याच्या दुधाला ग्राहक नाही, परिणामी कमी भावाने शेतक-
याबैठकीसाठी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, दिलीप शाहू महाराज, विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख, युवा सेना जिल्हाधिकारी सुरज साळुंके, उस्‍मानाबाद तालुकाप्रमुख दिलीप जावळे, कळंब तालुकाप्रमुख रामलिंग आवाड, भूम तालुकाप्रमुख अनिल शेडगे, तुळजापूर तालुकाप्रमुख राजअहमद पठाण, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे यांच्यासह सर्व उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
यांना दुध विकावे लागते. त्यामुळे शेतक-याच्या नुकसानीस जेवढा दुष्काळ जवाबदार आहे, तेवढेच काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते मंडळीही जवाबदार असून या लोकांच्या सहकारी संस्थामधील गैर कारभाराची चौकशी करण्यास शिवसेना शासनास भाग पाडेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
Top