बार्शी - साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या प्राध्यापक लक्ष्मण मस्के यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एलएलबीमध्ये प्रात्यक्षीकात विद्यापीद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे.
मस्के यांनी एम.एम.बी.एड, सेट-नेट, बी.सीजे पदविका यापूर्वीच प्राप्त केल्या आहेत. अंकुर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून तालुक्यातील साहित्यक्षेत्रात त्याचा नावलौकिक आहे. धाराशिव (उस्मानाबाद) येथील अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाच्या
कार्याध्यक्षपदीही त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
विधी क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांसाठीही कायद्याचे मोफत मार्गदर्शन करत असून गरीब गरजू तसेच अन्यायग्रस्तांना मोफत मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. बार्शीतील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील अनिष्ट प्रथा मोडीत काढण्याचाही त्यांनी यापूर्वी प्रयत्न केला आहे. विद्यार्थी संस्कारक्षम व सक्षम घडावा यासाठी त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे ते लोकप्रिय शिक्षक ठरले आहेत.

 
Top