Friday, 22 May 2015

मारहाणीत शेतकरी जखमी

पांगरी  (गणेश गोडसे)  झाडे तोडल्याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून चिडून दोघांनी मिळून एकास कोयता व लोखंडी गजाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना खामगाव (ता.बार्शी) येथील शिवारात घडली.
     पांडुरंग शिवाजी नलगे असे कोयत्याने झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍याचे नांव असून सूरज तानाजी नलगे व तानाजी नामदेव नलगे अशी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे असून त्यांना अटक करण्यात आले आहे.
      जखमी पांडुरंग नलगे रा.खामगाव यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपींनी मिळून तू सामाईक जागेवरील झाडे तोडल्याबाबत बार्शीच्या तहसीलदारांकडे अर्ज का केला या कारणावरून चिडून राग मनात धरून त्यांच्या सामाईक विहीरीवर गाठून त्यांच्या डोक्यात कोयते मारून व हातावर पायावर लोखंडी गजाने मारून जबर जखमी केले.पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्‍यादिवरून दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असतं त्यांना दि.23 शनिवार पर्यन्त पोलिस कोठडी देण्यात आली आहे.अधिक तपास हवालदार रविंद्र भडूरे हे करत आहेत.

Labels: