पांगरी (गणेश गोडसे) -: देशात मागे राहिलेला व दुर्लक्षित घटक म्हणून शेतक-याकडे पाहिले जात असले तरी शेतकर्‍यांनी आधुनिक व यांत्रिक शेती  करून उद्योग धंदयामध्ये उडी घ्यावी असे प्रतिपादन व्ही.आर.डी.शेती प्रोडूसर कंपनीचे (सारोळा)संचालक अमोल रणदिवे यांनी केले.ते कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व प्रायमुव्ह यांच्यावतीने मृदगंध अग्रो प्रोडूसर शेतकरी कंपनीच्या (पांगरी) संचालक व सदस्यांच्या अभ्यास दौर्‍यात मार्गदर्शन करताना बोलत होते.
  शेतकरीही सध्या आधुंनिकतेच्या दिशेने वाटचाल कर्त असून विकासाचे टप्पे पार केलेल्या शेतकर्‍यांची यशोगाथा इतर शेतकर्‍यांना समजावी यासाठी शासनाच्या कृषि खात्यातर्फे शेतकर्‍यासाठी अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते.शेतकर्‍यांनी संघटित होऊन शेतक्र्‍यासाठी तयार केलेल्या सारोळा व मेंढा (ता,जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी कंपन्यांना यावेळी भेटी देऊन माहिती घेण्यात आली.कोणतेही काम करताना समोर ध्येय व विश्वास असणे गरजेचे आहे.मजूर टंचाई लक्षात घेऊन यांत्रिक शेती करावी,पूर्व मशागत ते काढणी येथपर्यंतची सर्व कामे मजराशिवाय काशी करता येतील यावर भर द्यावा आदि बाबी या अभ्यास दौर्‍यात समोर आल्या.
 यावेळी आत्माचे बार्शी तालुका समन्वयक श्री.के.आर.चाटी,सहाय्यक व्यवस्थापक शेलेश घोडके,प्रायमुव्हचे दिपक आग्रे, पांगरीचे उपसरपंच सतीश जाधव,रामलिंग सुरवसे,माजी सभापति विजय गरड,बालाजी पवार,सुधाकर बाभळे,साहेबराव पवार,किरण पवार,बालाजी सातनाक,लक्ष्मण बनसोडे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
  

 
Top