उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद जिल्‍हयातील गेल्‍या तीन वर्षापासून निसर्गाची अवकृपा असल्‍यामुळे पावसाचे अत्‍यल्‍प प्रमाण असल्‍यामुळे 1972 पेक्षा भि‍षन दुष्‍काळी परीस्‍ि‍थती निर्माण झालेली आहे. 
दि. 18/5/2015 रोजी मा.ना. राधाकृष्‍ण विख - पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेता यांनी टाकळी (बें,) येथील आत्‍महत्‍या ग्रस्‍त शेतकरी कै. बालाजी विदुरथ शिंदे वयः46 वर्षे यांच्‍या कुटूंबीयांची भेट घेवून चर्चा  केल्‍यानंतर सततच्‍या नापीकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे जिवन जगणे कठिण झाल्‍यामुळे आत्‍महत्‍या करुन आपली जीवनयात्रा संपविली. पाडोळी (आ) येथील पाडोळी (आ) - बोरगाव या महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमीयोजनेंतर्गत चालू असलेल्‍या रस्‍त्‍याच्‍या कामावरील मजुराशी संवाद साधला. तर बोरखेडा येथील  भीषण पाणी टंचाईग्रस्‍त ग्रामस्‍थांशी संवाद साधून दुष्‍काळाची तीव्रता समजून घेतली. कार्यकर्त्‍यांशी संवाद साधले.       
 
Top