उस्मानाबाद -  शेतकरी गट व जलयुक्त शिवार योजनेच्या कामात ‍दिरंगाई, कामकूचार,निष्काळीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कार्यवाही करावी व  त्यांच्या गोपनीय अहवालात नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.  येथील जिल्हा परीषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात शेतकरी वैयक्तिक माहिती व विकास आराखडा प्रपत्र प्रगती आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे बोलत होते.
           यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे श्री. लोखंडे, कृषि विज्ञान केंद्राचे  कृषी उपसंचालक श्री. चोले, श्री. मिनीयार, श्री. हिरेमठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शितलकुमार मुकणे, कृषि विकास अधिकारी श्री. खोत, सर्व तालुका कृषि अधिकारी, डॉ. टाकणकर, उपविभागीय कृषी अधिकारी, मंडल अधिकारी आदि उपस्थित होते. 
          उस्मानाबाद जिल्ह्याने शेतकरी गट स्थापनेत व जलयुक्त शिवार योजनेत उल्लेखनीय कार्य करुन राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या कामाचा राज्यात व देशात नाव लौकीकात भर पडली आहे. राज्यातील इतर जिल्हयाने या कामाची दखल घेतली. शिवाय आंध्र व तेलंगणा राज्याने या कार्याचे कौतूक केले. तसेच  महाराष्ट्राचे मुख्य सचिवानी देखील या  कामाची दखल घेवून त्यानी  प्रशंसा केल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी आवर्जुन उल्लेख केला.
        जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे पुढे बोलताना म्हणाले की, कृषि विभागाचे के
लेले कार्याची  माहिती नियमित संकेतस्थळावर अपलोड करावी, शेतकरी गटांना एकत्रित करुन त्यांचे सबलीकरण करावे, कृषि गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करावा, शेतकरी गट, शेतकरी मित्रास प्रशिक्षण दयावे, प्रत्येक गावस्तरावर खरीप हंगामाच्या बैठका घेवून शिबीरे घ्यावीत. पीक विम्याचे तक्रारीचे निवारण करावेत, येत्या 30 तारखेपर्यंत प्रपत्र भरण्याचे 100 टक्के कार्य पुर्ण करावेत. खरीप हंगामाचे कामे पुर्ण करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवाव्यात, सोयाबीन पेरणीबाबत  शेतकरी गटाच्या बैठका घ्याव्यातअसे निर्देश त्यांनी  कृषि विभागाला दिले.        यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या हस्ते आत्मातर्फे संकलीत सोयाबीन      घडिपत्रिकेचे विमोचन  करण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक श्री.  लोखंडे,जिल्हा अधिक्षक कृषि  अधिकारी श्री.तोटावार आदिनी  मार्गदर्शन केले.    
 
Top