सांगोला येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
सांगोला :- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या 32 व्या स्मृती समारोहानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या पुरुषांच्या राज्यस्तरीय खुल्या बास्केटबॉल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पो.नि.दयानंद गावडे यांच्या हस्ते आणि नगराध्यक्षा सौ.प्रतिभा सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लायन्स क्लबचे विभागीय सभापती डॉ.श्रीकांत शृंगारपुरे यांच्या शुभहस्ते आणि सांगोला येथील विधीज्ञ ॲड.उदयबापू घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या पारितोषिक वितरण समारंभास लायन्स क्लबचे अरविंद कोणशिरसगी, नरेंद्र गंभिरे, सांगोला लायन्सचे अध्यक्षा सौ. गीता क्षीरसागर, सेंट्रलचे अध्यक्ष नरेंद्र होनराव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Labels: प्रदेश

<< Home