उस्मानाबाद -  संघ लोकसेवा आयोग ( युपीएससी), नवी दिल्ली यांचे मार्फत दि.15 फेब्रुवारी,2015 रोजी घेण्यात येणा-या कम्बाईड डिफेंस सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता एम्लॉयमेंट न्युज (रोजगार समाचार) मध्ये दि.8 नोव्हेंबर,2014 रोजी जाहिरात प्रसिध्द होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 5 डिसेंबर,2014 असून कम्बाईड डिफेंस सर्व्हिसेस  या परीक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येत असते. जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परीक्षेचा अर्ज ऑनलाईन भरुन सादर करतील व रोजगार समाचार मध्ये दिलेल्या शैक्षणिक, शारीरीक आणि वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत अशाच उमेदवारांची निवड परीक्षापूर्व प्रशिक्षण तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे करण्यात आली आहे. सीडीएस परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरणेसाठी http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे.
     वयोमर्यादा : आय एम ए साठी : 2 जानेवारी 1992 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक. नाव्हेल ॲकेडमी: 2 जानेवारी 1992 ते 1 जानेवारी 1997 च्या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक. एअर फोर्स आकेडमी - 2 जानेवारी 1993 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत भारतीय युवक, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी : 2 जानेवारी 1991 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले विवाहीत व अविवाहीत भारतीय युवक. ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमी ( महिलांकरीता) : 2 जानेवारी 1991 ते  1 जानेवारी 1997 या दरम्यान जन्मलेले अविवाहीत, मुलं नसलेल्या विधवा, पुन्हा विवाह न केलेल्या, मुलं नसलेल्या घटस्फोटीत भारतीय महिला, अशी राहील
    शैक्षणिक पात्रता : आय.एम.ए व ओ.टी.ए. साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा समकक्ष, नेव्हल आकेडमी साठी : अभियांत्रिकी पदवीधर / बी.ई आणि एअर फोर्स ॲकेडमी साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ( भौतीक शास्त्र व गणित 10+2 स्तर विषयासह ) पदवीधर किंवा बी.ई. असा असावा.
    वरील पदांच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी दि.25 नोव्हेंबर2014 ते 7 फेब्रुवारी 2015 या कालावधीत प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांचे निवास व प्रशिक्षणाची सोय शासनामार्फत करण्यता आली आहे. भोजनासाठी दरदिवशी रु.60/- प्रमाणे अल्प दरात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
    तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी मिळण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे दि.12 नोव्हेंबर,2014 रोजी पदवी पर्यंतच्या सर्व मुळ प्रमाणपत्र व गुणपत्रिकेसह आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन मुलाखतीचे वेळेस दाखविल्याशिवाय उमेदवारांची निवड करण्यात येणार नाही. मुलाखतीचे वेळी वस्तूनिष्ठ पध्दतीने लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे कडून घेण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
    अधिक माहिती करीता छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्रमांक 0253-2451031 व 2451032 येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असेही  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि) सुभाष सासने यांनी केले आहे. 
 
Top