उस्मानाबाद - अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकास महामंडळा - मार्फत जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील किंवा ज्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळ अतिस्तवता नाही अशा प्रवर्गातील आर्थीक मागास असलेल्या लाभार्थ्यांसाठी या महामंडळाची स्थापना झाली आहे. या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना 5 लाखाच्या प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायाकरिता  कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये बँकेचा सहभाग 60 टक्के असून उमेदवार /लाभार्थ्यांचा सहभाग 05 टक्के व 35 टक्के रक्कम महामंडळाकडून बीज भांडवल म्हणून देण्यात येते. या 35 टक्के रक्कमेवर 4 टक्के दराने व्याजाची आकारणी करण्यात येऊन कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्षाचा निर्धारित केला आहे. तरी जिल्ह्यातील ईच्छूक लाभार्थ्यांनी या कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा स्वरोजगार मार्गदर्शक केंद्राचे सहायक  संचालक रमेश पवार यांनी केले आहे.
    ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थीक मागास विकासमहामंडळाकडून www.mahaswayamrojar.maharashtra.gov.in या संकेत-स्थळाची  निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर सन 2014-15 चे उदिष्ट, प्रमख सुविधा, तसेच उमेदवार/लाभार्थ्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा  क्र. 022- 28342521 /2/3/4/5 देण्यात आली आहे.
    जिल्ह्यातील आर्थीकदृष्टया मागास बेरोजगार व त्यांचे पालकांनी या वेबपोर्टलवरील सेवांचा लाभ घेण्याचेही आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.            

 
Top