सांगोला :- सांगोला नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या सौ. प्रतिभा मनोज सपाटे यांनी आपला अर्ज शनिवारी सकाळी मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्याकडे दाखल केला.
      नगराध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम नुकताच नगरपालिकेकडे आला असून शनिवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. शेकापक्ष, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन प्रमुख पक्षांची आघाडी असलेल्या या नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाची पहिली सव्वा वर्षे ही शेकापक्षाकडे होती. तर आता यानंतरचे सव्वा वर्षे हे कॉंग्रेसकडे असणार आहे. कॉंग्रेस पक्षाने आरोग्य समितीच्या विद्यमान सभापती सौ. प्रतिभा मनोज सपाटे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याने शनिवारी फक्त सपाटे यांचाच एकमेव अर्ज या पदासाठी दाखल करण्यात आला आहे. सौ. सपाटे यांचीच निवड बिनविरोध होणार असली तरी 25 तारखेलाच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. अर्ज दाखल करताना कॉंग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
 
Top