शेतात गांजाची लागवड करणा-या दोघा शेतक-यांना अटक
कळंब -: भोगजी (ता. कळंब) शिवारात असलेल्या एका शेतात कापसाच्या पिकात गांजाची लागवड करुन जोपासन करणा-या दोघा शेतक-यांना पोलिसांनी अचानक छापा मारुन रंगेहाथ पकडून गजाआड केले. ही घटना शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
बाळासाहेब उत्तम खराटे (वय 35), प्रकाश उर्फ पप्पू खराटे (वय 38) (दोघे रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. कळंब तालुक्यातील भोगजी गावच्या शिवारात बाळासाहेब खराटे, प्रकाश खराटे यांनी त्यांच्या शेतामध्ये कापसाच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे एका खब-यामार्फत पोलिसाना माहिती मिळाली. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे, पोलीस कर्मचारी मायकेल एस.एम., सावंत एस.बी., शेवाळे एम.बी., महिला पोलीस नाईक तेली, सय्यद यांच्यासह इतर पोलीस कर्मचा-यांनी शनिवारी दुपारी अचानक वरील ठिकाणी शेतात छापा मारले. यावेळी गांजाची लहान-मोठे 46 झाडे, त्याचे अंदाजे वजन बारा किलो, किंमत बारा हजार असल्याचे आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसात हवालदार दीपक गोलकर यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत साळवे हे करीत आहेत.

Labels: पोलीस डायरी

<< Home