Saturday, 24 August 2013

डिकसळ येथे केंद्र संम्मेलन संपन्न

कळंब -: शैक्षणिक वर्ष 2013-14 मधील कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) केंद्रातील पहिले केंद्र संम्मेलन डिकसळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदयामंदिर तथा केब्रीज इंग्लिश स्कूल कळंब येथे शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी विस्तार अधिकारी संजीव बागल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
    चालू शैक्षणिक वर्षात शासनाने केंद्र संम्मेलनाची संख्या कमी केलेली आहे. प्रत्येक सत्रात एक असे दोन केंद्र संम्मेलने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसभर चाललेल्या या केंद्र संम्मेलनात विदयार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षकांना विस्तार अधिकारी यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली हे केंद्र संम्मेलन प्रभावीपणे राबविण्यात आल्याचे बागल यांनी सांगितले.
    केंद्र संम्मेलनाची सुरुवात शाळेच्या प्रांगणात सामुहिक परिपाठाने करण्यात आली. त्यानंतर कुलाप्रमाणे गट पाडून संम्मेलन घेण्यात आले. या संम्मेलनात लोहटा (पूर्व) केंद्रातील 46 शाळातील प्राथमिक स्तरावरील जवळपास 282 शिक्षक उपस्थित होते. केंद्र संम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आंबेडकर विदयालयाचे मुख्याध्यापक व्ही.जी. चौधरी, केंब्रिजचे प्राचार्य एस.बी. मोरे, एस.एस. पवार, यु.एम. सिरसट, पी.पी. तांबडे, ए.डी. धस, के.जी. चौधरी, ए.सी. राऊत, श्रीमती एम.बी. माने आदींनी परिश्रम घेतले.

Labels: