उस्मानाबाद -  राष्‍ट्रीय पीक विमा योजना रब्बी हंगाम 2014-15 साठी भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यापूर्वी पीक विम्याच्या हप्ता भरणे आवश्यक आहे. पिक विमा ही योजना सर्व पिकांसाठी ऐच्छिक असून कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता चलनाद्वारे बँकेत भरणे आवश्यक आहे. यासाठी ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरल्या बद्दल तलाठयाचा पीक पेऱ्याचा दाखला, सातबारा आणि आठ अ च्या उताऱ्यासह नजिकच्या बँकेत हप्ता भरावा. या योजनेतंर्गत अतिअल्प व अल्प भूधारकांना विमा हप्त्याच्या 10  टक्के सुट विमा हप्ता भरावयाचा आहे.  तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहित वेळेत पीक विम्याची रक्कम भरुन या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी केले आहे.
    रब्बी हंगाम 2014-15 करीता गहु (बा.), गहु (जि.), ज्वारी (बा.), ज्वारी (जि.) हरभरा, करडई, सुर्यफुल आणि रब्बी कांदा या पीकाच्या उंबरठा उतपादनाच्या किंमती पर्यंत व उंबरठा उत्पादनापेक्षा जादा किंमतीपर्यंत प्रति हेक्टरी दिलेल्या रक्कमवर पिक विमा दराप्रमाणे पीक विमा भरावयाचा आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा.
 
Top