Tuesday, 18 November 2014

उस्‍मानाबाद खासदारांची बार्शी तहसिलला भेट

 बार्शी - धाराशिव मतदार संघाचे खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी बार्शी तहसिल कार्यालयात भेट देऊन आढावा घेतला. यावेळी बार्शी मतदार संघातील विकासात्मक अडचणीविषयी माहिती घेतली. बार्शी शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले कोणते प्रकल्प प्रशासकिय कामकाजात अडकून पडल आहेत त्याविषयी चर्चा करुन बार्शीच्या विकासासाठी आपण वचनबध्द व कटीबध्द आहोत व सतत पाठपुरावा करणार असल्याचे आवर्जुन सांगीतले.
    यावेळी बार्शी नगरपरिषदेने मान्यता दिलेल्या भुयारी गटार योजनेबाबत त्यांना माहिती देण्यात आली. तालुक्याच्या विकासाकरिता कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन चांगल्या प्रकारचा विकास करण्यासाठी आपली भूमिका सकारात्म राहील असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

Labels: