बार्शी -  कुमूदा-आर्यन शुगर्स कारखान्याचे निमित्ताने स्थानिक राजकिय विरोधकाशी आंदोलनकर्ते प्रभाकर देशमुख यांनी संधान साधून स्टंटबाजी चालवलेली आहे. सदर कारखाना कुमूदा उद्योग समुहाकडे आहे ही वस्तुस्थिती असताना सोपल कुटूंबियांच्या बदनामीचा प्रयत्न कदापी खपवून घेतलाजाणार नाही.                    ॠंबंधीतांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे असे सुधीरभाऊ सोपल यांनी सांगीतले आहे. ते पुढे म्हणाले ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आम्ही पाठीशी आहोत आणि कायमस्वरुपी पाठीशी राहूत.
आर्यन शुगर्स या कारखानायाचे शेअर्स (समभाग) कुमूदा उद्योग समुहाने हस्तांतरीत (ट्रान्सफर) करुन घेतलेले आहे. खाजगी उद्योगात कंपनी ऍक्टनुसार शेअर ट्रान्सफर झाल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी कुमूदा उद्योग समुहाची झालेली आहे. कारखाना विकला या ऐवजी शब्दश: शेअर ट्रान्सफर झाले असे म्हटले जाते. हि वस्तुस्थिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहीर करुनही सोपल कुटूंबाचा संबंध जोडून नाहक बदूामी करण्याचा डाव राजकिय विरोधक आणि प्रभाकर देशमुख यांनी एकत्रितपणे मांडलेला आहे.
सोपल कुटूंब गेली ३० वर्षापासून शेतकर्‍यांसोबतच आहे. आमदार दिलीप सोपल यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने बार्शी तालुक्यातील शेतकर्‍यांना कायम न्याय देण्याची भुमिका घेतलेली आहे. ऐतीचे, विजेचे, सिंचनाचे प्रश्‍न असो की शेतकर्‍यांवर आलेली संकटे, मध्यंतरी अवकाळी आणि दुष्काळी संकटाच्या वेळी सुमारे सव्वाशे कोटी रुपये अनुदान हे सुध्दा फक्त आमदार दिलीप सोपल यांच्यामुळेच मिळाले हे शेतकरी कधीही विसरणार नाहीत. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे मिळालेच पाहिजेत हिच आमचीही भुमीका आहे. आम्हीही ऊस उत्पादक शेतकरीच आहोत आमचेही ऊसबील थकीत आहे. सनदशीर मार्गाने सर्वांचे थकित ऊसबील निश्‍चितपणे मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सोपल पुढे बोलताना म्हणाले की, वस्तुस्थिती दडवून साखर कारखान्याच्या बिलासाठी कारखान्यावर मोर्चा न काढता तिथे आंदोलने न करता आमच्या घरावर मोर्चा काढण्याची भुमिका घायची, मोर्चाला कायदेशीरदृष्ट्या परवानगी नसतांना हटवादीपणाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांऐवजी राजकिय विरोधी कार्यकर्ते घेऊन मोर्चाने प्रयत्न करणे, प्रसिध्दीसाठी आणि फक्त आणि फक्त बदनामीसाठी आंदोलनाचा फार्स करणार्‍या प्रभाकर देशमुख व इतरांविरोधात लवकरच गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया आम्ही चालु केलेली आहे.
मोर्चाचा अल्प प्रतिसाद बघता त्यामध्ये ऊस उत्पादकाऐवजी राजकिय विरोधी कार्यकर्ते बहुसंख्येने होते. यावरुन विरोधकांचा हा पूर्णपणे राजकिय स्टंट होता.


 
Top