बार्शी -  वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्थेच्या वतीने रविवारी (दि.३१) रोजी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा, सामुहिक विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांचे विवाह, संस्थेच्या नूतन कार्यालयाचे भूमिपूजन, आरोग्य तपासणी आणि रक्तदानाचे आयोजन केल्याची माहिती संस्थाध्यक्ष राजाभाऊ कचरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत सचिव भीमराव कोरे, नागजी नान्नजकर, सोमेश्वर देशमाने, दत्तात्रय देशमाने, दत्तात्रय सातारकर, किशोर दळवे, बाळासाहेब गाताडे, महेश देशमाने, अशोक नान्नजकर आदी उपस्थित होते.
मार्केट यार्ड येथील भाजी मार्केट हॉलमध्ये हा विवाह सोहळा होत आहे. तुळजापूर रोडवरील मार्केट यार्ड शॉपींग सेंटरच्या पहिल्या मजल्यावर नूतन कार्यालयाचे भूमिपूजन होत आहे. संस्थेने यापूर्वी चार विवाह सोहळे आणि परिचय मेळावे यशस्वी पार पाडले असून याकरिता राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. माजी मंत्री, आमदार दिलीप सोपल आणि ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. विवाह सोहळ्यातील दांपत्यांना संसारोपयोगी व विवाहासाठी आवश्यक साहित्य भेट देण्यात येणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्था, युवा ग्रुप परिश्रम घेत आहेत. अधिक माहितीसाठी ९८५००५०४६०, ९४२२६४८१९४, ८०८७४११००८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 
Top