बार्शी -  सोमवारी दि.१७ रोजी श्रीक्षेत्र भगवानगडावर वंजारी सेवा संघाची ५ वी राज्य कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने प्रतिनिधी उपस्थितीत होते. संत भगवान बाबा व लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमा पूजनाने या बैठकीची सुरुवात करण्यात आली. 
            यावेळी वंजारी सेवा संघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष श्री. राहुलजी जाधवर, प्रदेश सचिव बाजी दराडे, प्रदेश उपाध्यक्ष अमोल कुटे, देवेंद्र बारगजे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मंगलताई वाघ, प्रदेशकार्याध्यक्ष मंजूषा दराडे ,प्रदेश सहकार्यध्यक्ष दत्तात्रय जाधवर सरचिटणीस श्री धनंजय ओम्बासे ,प्रदेश संघटक धनंजय मुंढे राज्य सदस्य श्री सिद्धेश्‍वर मुंढे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.   
यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी अनिलकाका सानप तर विभागीय कार्याध्यक्ष पदी सुधाकर मुंढे यांची नव्याने नियुक्ति करण्यात आली. याप्रसंगी बोलताना राहुल जाधवर म्हणाले की, वंजारी सेवा संघ ही बिगर राजकीय समाज चळवळ असून आज बुद्धिजीवी तरुण हा समाज्यात परिवर्तन करण्यास सज्ज झाला आहे. माझे संपूर्ण आयुष्य भगवान गडाची व वंजारी समाजाची सेवा करण्याचा माझा संकल्प असून वंजारी सेवा संघाची चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे. वंजारी समाज चार शाखेत विभागला गेल्याने बेठी व्यवहार होत नाही त्यामुळे एकीची भावना दिसून येत नाही. वंजारी समाजाचे मुळ आणि उगमस्थान एकच आहे. ज्या ज्या परिसरात हा समाज विस्तापित झाला त्या त्या परिसरातील रुढी, संस्कृती आणि पंरपरा समाजाने आत्मसात केल्या. संम्पूर्ण वंजारी समाज एक व्हावा , एक वंजारी ही भावना दृढ व्हावी हिच स्व. मुंढे साहेबांची ईच्छा होती. आजपासून ही परिर्वतनाची नांदी बाबांच्या आशिर्वादाने आणि स्व.साहेबांच्या प्रेरणेने सुरु झाली. येणार्‍या काळात चार शाखेत विभागल्या गेलेल्या या समाजाला एकत्रित आणावयाचे आणि त्यांच्यातील रोटी बेटी व्यवहार सुरु करुन संपूर्ण समाजाला एकत्र करण्याची, एकीची भावना, चळवळ सेवा संघाच्या माध्यमातुन ऊभी करण्यात येणार आहे. समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भगवान गडाचा प्रचंड कायापलट आणि विकास हा न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री व गडाचे सचिव श्री गोविन्द घोळवे यांनी केला आहे. वंजारी समाज हे ऋण कदापि विसरणार नाही. गोविन्द घोळवे यांनी सक्रीय समाजकारणात यावे असा ठराव यावेळी घेण्यात आला याबरोबर वंजारी समाज्यात हुंडा बंदी करणे, स्त्रीभृणहत्त्या थांबवणे , शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे, वंजारी तरुणांनी निर्व्यसनी निष्कलंक राहून स्त्रीयांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करणे, शासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या अडचणींचा विचार करता वंजारी समाजाचे आरक्षण बदलून समाजाचा समावेश ओबीसी मधे करावा असे विविध ठराव मंजूर करण्यात आले .
 प्रदेश सचिव बाजी दराडे यांनी वंजारी सेवा संघाचा अजेंडा,ध्येय धोरणे यावर मार्गदर्शन केले. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मंगलताई वाघ, कार्याध्यक्ष डॉ.मंजूषाताई दराडे, आशा मिसाळ यांनी वंजारी महिलांच्या समस्या, हुंडाबंदी ईत्यादींवर आवाज उठवत यापुढे महिलांच्या अडचणी सोडविण्यसाठी राज्यभर काम उभरणार असल्याचे जाहिर केले. प्रास्ताविक अनिल ङ्गड यानी केले तर सुत्रसंचालन दादासाहेब खेडकर यांनी केले. या बैठकीप्रसंगी सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष हरिदास जाधवर, जिल्हा उपाध्यक्ष विजय घोळवे, ईश्‍वर जाधवर, जिल्हा सरचिटणीस अभिजीत माळवे, बार्शी तालुकाध्यक्ष राम खराटे, शहराध्यक्ष राजाभाऊ वनवे, श्रीमंत बांगर, पिंटू पाटील, पद्माकर मुंढे यांच्यासह राज्यभरातून हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते.

 
Top