Sunday, 21 April 2013

मानवतेचा विचार देणा-या डॉ.आंबेडकराच्‍या विचाराची गरज : शेख

नळदुर्ग : सामाजिक न्‍याय, समता, समरस्‍ता व समानेतवर आधरित समाजरचना निर्मितीसाठी व राष्‍ट्रीय एकात्‍मतेच्‍या वाढीसाठी जगातील समतेचा व मानवेतचा विचार देणा-या महामानवांच्‍या विचाराची आज गरज असल्‍याचे मत महाराष्‍ट्र मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेचे महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रवक्‍ते तायरभाई शेख यांनी व्‍यक्‍त केले.
    शहापूर (ता. तुळजापूर) येथे महाराष्‍ट्र मुस्लिम फ्रंट या संघटनेच्‍या शाखा उदघाटनप्रसंगी प्रमुख वक्‍ते म्‍हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी सरपंच विजय पवार हे होते, तर उदघाटक म्‍हणून संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष नदिमसाब मुजावर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून संघटनेचे सोलापूर जिल्‍हाध्‍यक्ष सैफन मुजावर, समीर मिस्‍त्री, महम्‍मद तेली, सैफन बागवान, सरपंच पांडुरंग सुरवसे, बालाजी खरात, शाहुराज जाधव, नाना पाटील, महावीर धोंगडे, नागनाथ पाटील आदीजण उपस्थित होते.
    प्रारंभी महाराष्‍ट्र मुस्लिम फ्रंट शहापूर शाखेचे फित कापून नदिमसाब मुजावर यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. याप्रसंगी नूतन शाखा कार्यकारणी जाहिर करण्‍यात आले. यामध्‍ये शाखाध्‍यक्ष सद्दाम पटेल, कार्याध्‍यक्ष जाकीर हुसेन पटेल, उपाध्‍यक्ष मजिद पटेल, सचिव हम्‍झा पटेल, सहसचिव खासीम शेख, खजिनदार मुनाफ पटेल आदींचा समावेश आहे. याप्रसंगी नितीन काळे, सचिव गोरे, संभाजी डावरे, अशोक मोरे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद काळुंके, एस.के. गायकवाड, प्रा. दत्‍ता साखरे, भैरवनाथ कानडे यांच्‍यासह गावातील नागरीक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
फोटो :

Labels: