उस्मानाबाद :- ई.बी. सी. शैक्षणिक शिष्यवृत्तीचे सन 2014-15 या वर्षासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव स्वीकारण्यासाठी तालुकास्तरावर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित शाळेने आपले प्रस्ताव आपल्या तालुक्यासाठी दर्शविलेल्या ठिकाणी दिनांकास वेळेवर उपस्थित राहून विहीत नमुन्यात प्रस्तावाची तपासून करुन घ्यावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केले आहे.
तुळजापूर तालुक्यासाठी 22 सप्टेंबर रोजी येथील आर्य चाणक्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उस्मानाबाद येथे, उमगरा व लोहारा तालुक्यासाठी 23 रोजी, भूम व परंडा तालुक्यासाठी 24 रोजी , कळंब व वाशी तालुक्यासाठी 26 रोजी आणि उस्मानाबाद तालुक्यासाठी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत येथील आर्य चाणक्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,उस्मानाबाद येथे तपासून घ्यावे.
प्रस्तावासोबत शाळेचे पत्र, प्रमाणपत्र, ईबीसी सवलतीचे देयक नमुना नंबर 1, प्रपत्र अ मध्ये विद्यार्थी संख्या इयत्ता निहाय प्रवेश शुल्क, शुल्क इतर शुल्क विहित नमुन्यात विद्यार्थ्यांची यादी अनुदान आदेशाचे प्रत प्रस्ताव संगीकृत करुन 1 प्रतीमध्ये निहाय स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा. सन 2014-15साठी इबीसी योजनेची रक्कम संबंधित मुख्याध्यापक यांचे बँक खातेवर जमा करण्यात येणार असल्याने राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये खाते उघडुन खाते क्रमांक, शाखा, तालुका आदि संपूर्ण तपशिल प्रस्ताव सोबत सादर करावा.
इयत्ता 12 वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण, ज्यांचे किंवा त्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्यांना फी माफी , माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण, स्वातंत्र सैनिकाच्या मुलांना शैक्षणिक सवलती, माजी सैनिकांच्या पाल्यांना शौक्षणिक सवलती, आदि विद्यार्थ्यांना विद्यावेतन, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संस्कृत शिष्यवृत्ती, नक्षलविरोधी कारवाईत नक्षवादी हल्ल्यात मृत व जखमी झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल आदि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती, दि. 26 ते 29 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे आतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस, गृहरक्षकदल आदि कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलतीबाबत उक्त दिनांकास कॅम्पमध्ये परिपुर्ण माहितीसह वेळेवर उपस्थित राहून प्रस्ताव सादर करावेत. अपुर्ण प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही याची नेांद घ्यावी, अधीक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (मा) जिल्हा परिषद, उस्मानाबादशी संपर्क साधावा.