उस्मानाबाद : जिल्ह्यातील 240-उमरगा, 241- तुळजापूर, 242-उस्मानाबाद आणि 243- परंडा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी  रविवार दि. 19 ऑक्टोंबर, 2014 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होणार आहे.
    उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील मतमोजणी अंतुबळी पंतगे सभागृह, उमरगा येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 13 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 21 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व  पोस्टल मतमोजणीसाठी दोन स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
    तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मतमोजणी स्पोटर्स हॉल तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, तुळजापूर येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 13 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 27 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व  पोस्टल मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
    उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील मतमोजणी शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 20 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 25 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व पोस्टल मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
           परंडा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी गर्व्हरमेंट रेसीडेंट स्कूल फॉर एस सी आणि नवबुध्दा स्टुडंन्ट भूम, परंडा रोड, गोलेगाव  येथे सकाळी 8 पासून होणार असून या मतदार संघात एकूण 10 उमेदवार आहेत. या मतमोजणी दरम्यान एकूण 25 फेऱ्या अपेक्षित असून त्यासाठी 14 टेबल व पोस्टल मतमोजणीसाठी एक स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका उमेदवारांच्या दोन प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.
    चारही विधानसभा  मतदार संघातील मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी संबंधित मतमोजणी केंद्र परिसरात 200 मीटर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये बंदी आदेश जारी केले आहेत.
 
Top