पांगरी (गणेश गोडसे) मतदान झाले असून आता सर्वच पक्षांच्या कार्यकर्तासह नेत्यांना वेध लागलेत ते 19 अक्टोंबरचे.गावो गावच्या पारावार कार्यकर्त्यांच्या गप्पा निकालावरून  चांगल्याच रंगू लागल्या आहेत.पैशाच्या पैजाही मोठमोठ्या लागू लागल्या आहेत.वेळ प्रसंगी आम्हीच गुलाल उधळणार असे म्हणत हमरी तुमरीवर येऊ लागले आहेत.या वेळेस लढती या बहुरंगी झाल्यामुळे व गत लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून काम केलेले कार्यकर्ते या विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले गेले होते.
      राजकीय पक्षांच्या युतीमध्‍ये बिघाडी झाल्यामुळे निवडणुकीत दुरावलेले मित्र आपापल्या उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केल्यानंतर पुन्हा आपापल्या गुत्यावर भेटू लागले असून 'तेरी मेरी यारी दुनियासे भारी'असे म्हणत मधल्या काळातील दुरावा, निवडणुकीतील नेत्यांनी दिलेल्या व शिल्लक  राहिलेल्या पैशातून मदिरेचे सेवन करतानाचे दृश्य ग्रामीण भागात दिसुन येत आहे.
   सध्या मात्र सगळीकडेच निवडून कोण येणार,कोण क्रमानं दोन वर रहाणार,कोणाची अनामत जप्त होणार,जनता कोणाला गुलालापासून दूर ठेवणार,अमक्याने उभे राहायला नको होते,तमक्याचा फटका नेमका कोणाला बसणार आदि विषयावरील चर्चा गावकट्यासाह चौका चौकात,चावडी,पानटपरी,यासह सगळीकडेच चविणे चर्चिली जात आहे.ज्या त्या पक्षाचा कार्यकर्ता आपलाच उमेदवार निवडून येणार असे ठणकावून सांगत आहेत.तेव्हा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याचे तोंड बघण्यालायक झालेले पाहावयास मिळते.कांही वेळेस तेथून काढता पाय घेऊन बघू 19 असे म्हणत वेळ मारून नेली जात आहे.कधी एकदाचा निकाल लागून मोकळा होतोय आशेही कार्यकर्त्यांना वाटते.गावं चावडीवरील गप्पातून आता काहीही साध्य होणार नसले तरीही काही मतदारांना आता आपण उगीचच चुकीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा साक्षात्कार होऊ लागला आहे॰विधानसभेत जाण्यासाठि उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून 19 तारखेला काय होणार याकडेच त्यांचे डोळे लागून राहिले आहेत.निवडणूक खर्चाचा ताळमेळ व गाड्यांची भाडी तोडी देण्यात उमेदवाराचा चांगलाच वेळ जात आहे.
 पैशाच्या हिशेबावरून निघू लागली उणी दुनि:
आधुनिक काळातील चतुर कार्यकर्तेही मी त्यातला नसल्याचे दाखवण्याची संधि सोडत नसून आलेले रक्कम व वाटप केलेली रक्कम याचा योग्य ताळमेळ घालत आहे.मात्र हिशोब जरी जुळत असला तरी तू काय केलय मला म्हाईत हाय असे म्हणताच कार्यकर्‍याचा पार चढून एकमेकांची उणी दुनि काढू लागले आहेत.स्थानिक पातळीवर सुरू झालेली भांडणे अखेर उमेदवारांच्या दारावर धडक मारू लागली असून निकाल लागायच्या अगोदरच अशी स्थिति तयार होत आहे॰नेते व उमेदवार हे निवडणुकीसाठी किती कोट बदलावे लागले व याच्या बदल्यात आपल्याला किती मतदान मिळणार याचा ताळमेळ लावण्यात गुंग आहेत.आतून कोणी कोणाचे काम केले,बाहेरून कोणाचे दाखवले,शेवटी मतदानाच्या दिवशी जवळच्या नेत्याने विरोधी उमेदवाराचे कसे काम केले,खोक्याच्या बदल्यात कोणी आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकले,यावेळेस मदत करण्याच्या अटीवर पुढील निवडणुकीत कोणी आल्यासाठी बांधणी करून घेतली,निवडांनुकीपूरवी कोण कोणाला केव्हा,कधी कसे कोठे,भेटले होते हे आता बाहेर येऊ लागले असून कार्यकत्यांनाही तोंडात बोटे घालण्याची वेळ येत आहे.पैसा एका उमेदवाराचा मात्र मतदान दुसर्‍याच उमेदवाराला करण्याचे फर्मान देण्यात आल्याचेही उघड होऊ लागले आहे.
 
Top