नवी दिल्ली-  विधानसभा निवडणुकीचे निकालानंतर सोमवारी डिझेलच्या प्रति लिटर किमतीत किमान साडेतीन रुपयांची कपात जाहीर होण्याची शक्यता आहे. 
    पेट्रोलियम मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्राने याबाबतचे सुतोवाच केले.दोन दिवसांपूर्वीच पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत एक रुपयांची कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आचारसंहिता उठल्यानंतर डिझेलच्या किमतीतही मोठी कपात करण्याचा निर्णय झालेला आहे. यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, यंदाची दिवाळी खर्‍या अर्थाने भरभराट घेऊन येणार आहे.गेल्या चार महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे २० टक्क्‌यांनी घसरल्या आहेत.

 
Top