उस्मानाबाद -   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत र्फेब्रुवारी/ मार्च 2015 मध्ये घेण्‍यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विदयार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत व तुरळक विषयक घेवून प्रविष्ठ होणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत.
    कनिष्ठ महाविदयालयांनी बँकेत चलनाव्दारे शुल्क भरावाच्या तारखा 17 ते 20 डिसेंबर आहे. महाविदयालयानी विभागीय मंडळाकडे शुल्क भरण्याच्या चलनासह विदयार्थ्यांच्या यादया जमा करावयाच्या तारखा 20 डिसेंबर-2014 आहे. विंलब शुल्क कनिष्ठ महाविदयालयांनी ऑनलाईन आवेदनपत्रक भरावयाच्या तारखा 17 ते 22 डिसेंबर असून बॅंकेत चलनाव्दारे शुल्क भरावयाच्या तारखा 23 ते 24 डिसेंबर आहे. कनिष्ठ महाविदयालयांनी  विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याचा चलनासह विदयार्थ्यांच्या यादया जमा करावयाच्या तारखा 26 डिसेंबर आहे.
    सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईनपध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे. पात्र विदयार्थ्यांनी आवेदनपत्र भरण्यासाठी आपल्या कनिष्ठ महाविदयालयांशी संपर्क साधून ऑनलाईन आवेदनपत्रे भरावेत. कांही अडचणी आल्यास प्राचार्यांनी संबधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. प्राचार्यांनी  विदयार्थ्यांच्या यादया व प्रचलित शुल्काप्रमाणे बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर करणेआवश्यक असल्याचे राज्य मंडळ, पुणे साचिव कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.
--------------------
                   सेक्युरीटी कोर्स प्रशिक्षणाचा घ्या  सासने यांचे आवाहन
    उस्मानाबाद -   माजी  सैनिक, इतर नागरिकांचे पाल्य व युवकांना सुचित करण्यात येते की, महासैनिक ट्रेंनिंग सेंटर कसबा-बावडा- कोल्हापूर येथे सेक्युरिटी कोर्स क्रं 46 मध्ये 3 ते 27 जानेवारी-2015, कोर्स क्र-47 दि. 31 जानेवारी ते 23 फेब्रुवारी-2015 ,
कोर्स क्र- 48 दि. 28 फेब्रु.23 मार्च, कोर्स क्र- 49 दि. 28 मार्च ते 20 एप्रिल, कोर्स क्र- 50 दि. 25 एप्रिल ते 19 मे, लेडीज (कोर्स), कोर्स क्र- 51 दि. 23 मे ते 15 जुन, लेडीस कोर्स आणि कोर्स क्रमांक-52, मध्ये 20 जुन ते 13 जुलै-2015 पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.     या प्रशिक्षणासाठी रुपये 4 हजार 800 शुल्क असून प्रशिक्षण प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी इच्छूकांनी 0231-2663132,9422039718 वर संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.       
 
Top