उस्मानाबाद,दि.16- जिल्हा परिषद बांधकाम विभागाची विविध 25 कामाची जाहीरात ई निविदा htt://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली ई निवीदा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून सदर निविदेच्या सर्व अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याची संबधितानी व पात्र निवीदाधारकांनी याची नोंद घेवून आपल्या निवीदा वेळेत सादर करावेत, असे आवाहन, जिल्हा परिषद (बांधकाम) विभागाचे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद यांनी केले आहे.
    विविध 25 कामाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. यात उस्मानाबाद तालुक्यातील महंत भगवानगिरी बाबा मोक्षधाम गोवर्धनवाडी पोहच रस्ता करणे, जि. प. प्रशाला जागजी येथे तीन वर्ग खोलीचे बांधकाम करणे, राममा 211 पळसवाडी रस्ता सुधारणा करणे, आळणी जवळा खामगाव रस्ता सुधारणा करणे, इजिमा 66 ते बरमगांव रस्ता सुधारणा करणे, जागजी ते आरणी रस्ता सुधारणा करणे,
         कळंब येथील जिल्हा परिषदेच्या सहा वर्ग खोल्याचे बांधकाम करणे, येडेश्वरीदेवी येरमाळा येथे स्वच्छतागृह बांधकाम करणे, जिल्हा परिषद प्रशाला, शिराढोण येथे तीन वर्ग खोलीचे बांधकाम करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येरमाळा येथे शवविच्छेदन कक्षाचे  बांधकाम करणे,
             भूम तालुक्यातील  सदगुरु शामनाथ महाराज मंदिर सामनगाव येथे पोहच रस्ता करणे, महेबुब सुभानी दर्गा माणकेश्वर येथे पोहाच रस्ता करणे, हनुमादन मंदिर वालवड येथे भक्तनिवास बांधणे, आणि सटवाई मंदिर माणकेश्वर येथे भक्त निवास बांधकाम करणे,        
            लोहारा तालुक्यातील विध्वहर पार्श्वनाथ मंदिर आष्टा का. येथे पोहच रस्ता करणे, उदतपुर मुर्शदपूर येथे रस्ता सुधारणा करणे, कास्ती बु येथे उपकेंद्राची संरक्षण भिंत बांधणे, लोहारा ते कानेगाव पुल व रस्ता सुधारणा करणे, बालाजीमंदिर जेवळी परिसर विकास करणे, सास्तूर ते चिंचोली रेबे रस्तो सुधारणा करणे,
    वाशी तालुक्यातील  घाटपिंपरी रस्ता सुधारणा करणे, घाटपिंपरी चांदवड रस्ता सुधारणा करणे, सरमकुंडी तांदुळवाडी रस्ता सुधारणा करणे, यशवंडी रस्ता सुधारणा करणे, राममा 211 ते घाट पिंपरी रस्ता सुधारणा करणे तसेच  उमरगा तालुक्यातील एकोंडी पळसगाव नागराह रस्ता करणे  आदि कामाची जाहीरात वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.                  
 
Top