उस्मानाबाद - नाबार्डच्या कन्सलंटसी सर्व्हीसेस  नॅबकॉनमार्फत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, विविध कार्यकारी समित्या, व्यापारी व बँकेसाठी क्रेडिटी ट्रेनींग या विषयावर  नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी चंद्रशेखर देशपांडे यांनी एक दिवसीय जागरुकता कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्री. दुपारगुडे हे होते.
          या कार्यक्रमात  कृषि उत्पन्न व्यापार व त्याचे नियमन, साधीत करार, कायदे करार, गोडाऊन पावती आदि विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे वित्त अधिकारी तथा मल्टी स्टेटचे  व्यवस्थापकीय संचालक डी. एस. पाटील, नाबार्डचे चंद्रशेखर देशपांडे व लीड बॅंकेचे अधिकारी श्री. दुपारगुडे यानीही उपस्थितांना  मार्गदर्शन केले.         
 
Top