पांगरी(गणेश गोडसे) कुसळंब ता.बार्शी येथील जिल्हा परिषद प्रशाळेची विद्यार्थिनी कु.मनस्वी मनोज गादेकर हिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात दूसरा क्रमांक मिळवला आहे.स्व.प्रा.उमेश
  राज्यस्तरावर यश मिळवल्याबद्दल मनस्वी गादेकर हिचा कुसळंबच्या सरपंच सौ.आश्विनी पवार यांच्या हस्ते करण्यात आला.गादेकर हिला सौ.अर्चना राऊत यांच्यासह प्रशाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी अर्चना राऊत यांचा केंद्र प्रमुख कांदे व विस्तार अधिकारी कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विस्तार अधिकारी चांगदेव कांबळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय बोकेफोडे,केद्रप्रमुख महादेव कांदे,मुख्याध्यापक किशोर बगाडे,मंगल शेळके,सुनीता अंबुरे,आशाबाई चौधरी आदींनी तिचे अभिनंदन केले.
चंद्र खेडकर मित्र परिवार पंढरपूर यांच्यावतीने उमेशचंद्र स्मृती चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कु.मनस्वी हिने यापूर्वी विविध स्तरावर घवघवीत यश संपादन केलेले आहे.केंद स्तरावर तसचेच तालुका स्तरावर वक्तृत्व,कथाकथन आदि स्पर्धामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवले आहेत.
 
Top