बार्शी - आनंदयात्री प्रतिष्ठानच्या वतीने आजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ७८ पैकी २७ नाट्यसंस्थेच्या एकांकिकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष नागेश अक्कलकोटे यांनी दिली.
     २५ ते २८ डिसेंबर दरम्यान या स्पर्धा बार्शीतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात होत असून २५ रोजी सायंकाळी स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. राज्यातील सर्वात जास्त पारितोषिके असलेल्या एकांकिका स्पर्धा आमदार दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भरविण्यात येतात. स्पर्धेकरिता कोणत्याही प्रकारची मोठी जाहीरात न करता सोशल मिडीयाचा वापर करुऩ कागदविरहित (पेपरलेस) यंत्रणा राबविण्यात येते.
     स्पर्धेसाठी निवड केलेल्या एकांकिका व नाट्यसंस्था पुढीलप्रमाणे - दि.२५ रोजी - गहाण (कुर्डूवाडी युवक बिरादरी), जाहला सोहळा अनुपम (अस्तित्व मेकर्स,सोलापूर), जंगल (समाराधना,सोलापूर), पुरुषार्थ (युगांक सांस्कृतिक प्रतिष्ठान, परंडा), दि.२६ रोजी - बाऊंड्रीच्या पलीकडे (राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय, इस्लामपूर), आकडा (संवाद नाट्यसंस्था, सातारा), बजो (भारतीय क्रीडा शिक्षण मंडळ,सोलापूर), द स्केच (पी.ई.एस.,पुणे), भिंत (क्रिएशन,पुणे), जावई माझा भला (श्रृती मंदिर,सोलापूर), फोटू (मराठवाडा वाणिज्य महाविद्यालय,पुणे), कडमिंची (एम.आय.टी.,पुणे), राम राम पाहुणं राम राम (समर्थ, पुणे), दि.२७ रोजी - मळभ (एमआयटी-सीओई-आरोहण), खेळ मांडला (सकस, मुंबई), सात पन्नास (ड्रीम मेकर्स, अलिबाग), काकपिंड (सप्तश्री कलामंच, पुणे), रवंथ (आरंभ, मुंबई), बॉर्न वन (आयएमसीसी, पुणे), युग्मक (रंगोदय, मुंबई), आयुष्य एक होताना (अनुभूती, मुंबई), कोपरा (वैविध्य, पुणे), दि.२८ रोजी - कॉन्शन्स (अ.भा. नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड), किलीक (सिध्दांत थिएटर्स, कुडाळ), फुलपाखरु (राजेंद्र पौळ सांस्कृतिक प्रतिष्ठाण, सांगली), चॉकलेटचा बंगला (नाट्यमंडळ, पुणे), गारा (साई सानिध्य, मुंबई), दि.२८ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होत आहे.
    स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धाप्रमुख रामचंद्र इकारे, समन्वयक प्रताप दराडे, रुपेश बंगाळे, अंबादास शिंदे, कृष्णा उपळकर, पंकज शिंदे, गणेश अक्कलकोटे, मक्सुद मुल्ला, धीरज पाटील, हर्षद लोहार, परमेश्वर चांदणे, उदय कुलकर्णी, बाबा माळगे, प्रशांत खराडे, संजय कचरे, प्रशांत घोडके, प्रविण थळकरी, जमीर कुरेशी, दिपक कंगले, वसीम शेख, संतोष घुमरे, विवेक गजशिव, संग्राम माने, जेतस गायकवाड, सागर कुलकर्णी, पप्पू बावकर, अक्षय कोठारी, रोनक पल्लोड, उमेश अक्कलकोटे आदी परिश्रम घेत आहेत.
 
Top