बार्शी -  बार्शीतील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक होत असल्याचे राजकिय वातावरण चांगलेच तापल्यानंतर बार्शीत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिती दिमाखान उभी राहिली. काही व्यापार्‍यांनी नवीन बाजार समितीत दुकाने थाटली तर अनेक व्यापार्‍यांनी जुन्याच सहकारी बाजार समितीमध्ये जैसे थे व्यवसाय सुरु ठेवले. बार्शीतील कांदा व्यापार्‍यांमध्येही मोठ्या प्रमाणात व्यावसायीक स्पर्धा सुरु असून काही शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याची तक्रार आल्याने फसवूणक झाल्यानंतरही राजकिय द्वेषातून तक्रार झाली असेल अशी चर्चा रंगत आहे.
    येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेती मालाच्या खेरीदी-विक्री व्यवसाय करणार्‍या व्यापार्‍याकडून कांदा या शेतीमालाची विक्री करुनही शेतकर्‍यांना रक्कम दिली नाही. याप्रकरणी शेतकर्‍यांनी दि.२० पासून आमरण उपोषण व सामुहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकर्‍यांच्या रकमेसाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनेही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.   
    हारुण अल्लाबक्ष केमकर (बागवान), हरिफ हारुण केमकर (बागवान) असे येथील कांदा व्यापार्‍यांची नावे आहेत. केमकर यांनी शेतकर्‍यांच्या शेतात येऊन कांद्याचा भाव भरविला व मार्केट कमिटी येथील त्यांच्या दुकानात शेतकर्‍यांनी स्वखर्चाने आणून देण्यास सांगीतले. कांद्याचा माल दुकानात आल्यानंतर पैसे देण्यासाठी चार पाच दिवसांची वेळ मागीतली व त्यानंतर अनेक हेलपाटे मारुनही रक्कम दिली नसल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. उपोषण व सामुहिक आत्मदहन इशार्‍याच्या निवेदनावर किशोर कानगुडे, सुनिल कानगडे, शंकर कसाब, ज्ञानेश्वर जाधव, समाधान देवकर, चंद्रकांत कदम, रामचंद्र कदम, दत्तात्रय कदम, उत्तम कानगुडे यांची नावे व स्वाक्षर्‍या आहेत. पणन संचालक, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, तहसिलदार, पोलिस उप अधिक्षक, पोलिस निरीक्षक, कृषि उत्पन्न बाजार समिती आदींना निवेदन देण्यात आले आहे.
 
Top