नळदुर्ग :-  नळदुर्गसह राज्यातील शासकीय जागेवरील अतिक्रमण धारकांना त्यांचा हक्काचा घरजागेचा कबाला देण्याची प्रभावीपणे अमलबजावणी करून शासनाने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घर बांधून दयावे असे प्रतिपादन राष्ट्रसेवादलाचे जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांनी नळदुर्ग येथे आयोजित कबाला हक्क परिषदेत अध्यक्ष समारोप प्रसंगी बोलताना केले.
 श्रावणबाळ माता-पिता सेवा संघ उस्मानाबाद
शाखेच्यावतीने नळदुर्ग येथे कबाला हक्क परिषद संपन्न झाली. या परिषदेचे उदघाटन संघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते तर मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा विभाग अध्यक्ष बजरंग ताटे व पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य समन्वयक लियाकत जमादार, शंकर चंदन, नगरसेवक सुरेश आरणे (शिर्डी), माजी सैनिक मंगेश थोरात आदीसह मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शासकीय विश्रामग्रृहापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.   पूढे बोलताना पन्नालाल भाऊ सुराणा म्हणाले की, शासनाने केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष अमलबजावणी करून गरजू गरिब कुटूंबाना त्यांच्या हक्काचा निवारा देवून दिलासा दयावा.
      तर उदघाटनपर बोलताना राजेंद्र निबांळकर म्हणाले की,1995 पूर्वीपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काचा मालकी उतारा देण्यासाठी शासनाने त्वरीत समिती गटन करावी. व त्यांना हक्काचा कबाला दयावा. अन्यथा संघटनेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर मानवी हक्क अभियाने मराठवाडा अध्यक्ष बजरंग ताटे म्हणाले की शासकीय जागांवर गेल्या 40 वर्षापासून राहणा-या गरीब कुटूंबाची मते घ्यायला लोकप्रतिनिधी  विसरत नाहीत. मग त्यांना हक्काच घर देण्याच विसर कसा पडतो असा सवाल करून वीजपुरवठा घेण्यास नाहरकत मिळते, नळ, रस्त्याच्या सुविधा पुरवल्या जातात. असे असतानाही येथील पालिका प्रशासनाने शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून चार दशकांपासून राहणा-या गरीब कुटूंबाला शासकीय जागा मोकळी दाखवून वरिष्ठांची दिशाभूल करतात. जे पुर्णपणे चुकीचे आहे, त्या दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, बेघरांना हक्क मिळेपर्यंत आपण लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सचिन पाटील, संघटनेचे तालुका समन्वयक सचिन डुकरे, शहर समन्वयक मन्सूर शेख, होर्टी ग्रा.पं. चे उपसरपंच लखन चव्हाण, भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे तालुकाध्यक्ष कमलाकर खरात, सामाजिक कार्यकर्त्या संगिता गायकवाड, शाहेदाबी सय्यद, पत्रकार सुनील बनसोडे, जहीर इनामदार, इरफान काझी, पांडुरंग पोळे, ज्ञानेश्वर घोडके, रिपाइंचे दुर्वास बनसोडे, दादासाहेब बनसोडे, रमेश पिस्के, निजाम बागवान, आदीसह महिला युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम नाईक, अशोक बंजारे, राजाराम चव्हाण, विकास नाईक, अरुण नाईक, राजाराम नाईक, बालाजी चव्हाण, दत्तात्रय नाईक आदी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे शिवाजी नाईक यांनी तर सुत्रसंचालन संघटनेचे जिल्हासंपर्कप्रमुख विनायक अहंकारी  व शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार जिल्हा समन्वयक एस.के. गायकवाड यांनी मानले.
चौकट :
कबाला हक्क परिषदेत घेण्यात आलेले ठराव :-
* नळदुर्गसह राज्यभरातील शासकीय जमिनीवर राहणा-या गोरगरीबांना मालकी हक्काचे उतारे दयावेत
* उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमित जागेचे तहसिलदारामार्फत ले-आऊट तयार करावेत.
* पाडलेल्या त्याच ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून घ्यावीत.

* 30 सप्टेंबरपर्यंत आदेश न दिल्यास श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 
 
Top