उस्मानाबाद - मौजे जुनोनी.. वेळ रात्री 9-30 ते 9-45 वाजताची.  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचे गावात आगमन होते... गावातील मंडळी स्वागतासाठी पुढे येतात.. स्वता डॉ. नारनवरे गावकऱ्यांचे स्वागत स्विकारत पुढे होतात आणि मग सुरु होतो, ग्रामस्थ आणि प्रशासनातील मनमोकळा संवाद.
शनिवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्यासह विविध विभागांच्या यंत्रणा प्रमुखांनी भेट दिली. त्यावेळी दिसलेले हे चित्र. ग्रामस्थांशी चर्चा करीत, त्यांच्या अडचणी जाणून घेत, विविध योजनांच्या गावातील अंमलबजावणीचा आढावा घेत जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे स्वता विविध अधिकाऱ्यांना सूचना देत होते. संबंधित कामाचे काय झाले, याची विचारणा करीत होते.
त्यानंतर डॉ. नारनवरे यांनी ग्रामस्थांशी मनमोकळेपणे संवाद साधला. जुनोनी गाव आदर्श बनवण्याच्या दृष्टीने पावले टाका. गाव निर्मल करा. प्रत्येक गावकऱ्याच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही. त्यामुळे तुम्हीच पुढाकार घ्या. विकास करणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण संतुलित गाव योजना, दारुबंदी, शंभर टक्के तंटामुक्त गाव, रोजगार हमी योजनेंतर्गत कामे, समाजकल्याण, कृषी, आरोग्य, पशुवैद्यकीय, पाणलोट विकासाची विविध कामे हाती घेण्याची सुचना त्यांनी केली.
शेतीला महत्व देऊन कृषी गटाच्या माध्यमातून शेती क
यावेळी या दौऱ्यात त्यांच्यासमवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी. उबाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी शीतलकुमार मुकणे, तहसीलदार सुभाष काकडे, पोलीस निरीक्षक श्री. गावडे आदींची उपस्थिती होती. सरपंच अन्नपूर्णा जिरगे यांनी गावकऱ्यांच्या वतीने डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले.  उपसरपंच कमलाकर पाटील, डॉ. संतोष मुळे, हनुमंत केंडे, आण्णा पाटील, दिलीप मुळे आदींसह सर्वच गावकऱ्यांनी हा जिल्हाधिकारी यांचा गावभेट कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.  ग्रामस्थांच्या वतीने अतुल मुळे यांनी प्रास्ताविक केले.  
रा. गावातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडांगण, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला विकास या बाबींकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
 
Top