त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करा रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची प्रशासनाकडे मागणी - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, 2 September 2022

त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करा रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची प्रशासनाकडे मागणी



तुळजापूर , दि. ०२

तालुक्यातील सिंदफळ येथे एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली असून अशा नराधमास लवकरात लवकर व कठोरात कठोर शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान विभाग तुळजापूर यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील,पोलीस निरीक्षक  अजिनाथ काशीद व तहसीलदार सौदागर तांदळे यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील अल्पवयीन मुलीवर घडलेली घटना ही संतापजनक व निंदनीय असून आरोपीस कठोरात कठोर ती कारवाई होणे गरजेचे आहे.जेणेकरून अश्या घटना नंतर घडणार नाहीत. याकरिता अश्या नराधमांना लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान तुळजापूर तर्फे करण्यात आली आहे.यावेळी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध करण्यात आला.

निवेदनावर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान च्या श्रुती गायकवाड, श्रेया गायकवाड, प्रकाश भंडे,मनोज देवकते,अभिजित गायकवाड,सार्थक सुरवसे,राम जळकोटे यांच्यासह पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages