सिंदफळ बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी देण्यासाठी तुळजापुरात सर्वपक्षीय मोर्चा - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, 2 September 2022

सिंदफळ बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी देण्यासाठी तुळजापुरात सर्वपक्षीय मोर्चा

तुळजापूर , दि. 2 

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे  झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या मोर्चा नंतर करण्यात आली. सर्व मोर्चेकरांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले.

सिंदफळ ता तुळजापूर येथे  मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी आपल्या निवेदनाद्वारे तहसीलदार तुळजापूर यांच्याकडे केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शेतकरी कामगार पक्ष ,शिवसेना भारिप बहुजन महासंघ, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना या प्रमुख पक्षासह इतर सामाजिक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष धैर्यर्शील पाटील युवक नेते विनोद गंगणे,विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, काँग्रेसचे नगरसेवक रणजीत इंगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक विजय कंदले, पंडित जगदाळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमर चोपदार ,निलेश रोचकरी ,संजयकुमार बोंदर, ,आनंद जगताप, औदुंबर  कदम, किशोर साठे, मिलिंद रोकडे, धैर्यशील कापसे, नळदुर्गचे ज्येष्ठ नेते शफी शेख ,लालासाहेब तांबोळी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, नाना शितोळे, फिरोज पठाण, युसुफ शेख, अफसर शेख, अशपाक शेख' जावेद बागवान, अश्फाक सय्यद ,मोहसिन बागवान ,आयाज पठाण, कलीम शेख, आसिफ बागवान' हाजी बागवान, अमीर शेख ,आमिर बागवान, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अमीर शेख,  रफिक शेख, मतीन बागवान यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदन दिल्यानंतर सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल  संताप व्यक्त केला आणि आरोपीला फास्टट्रॅक कोर्टामध्ये जलद गतीने निकाल देऊन फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages