बार्शीतील संगीत परिसंवादाचा समारोप - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, 25 January 2014

बार्शीतील संगीत परिसंवादाचा समारोप

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : लोकसंगीतामध्ये भारतीय संस्कृतीचा पारंपारिक ठेवा दडला आहे, परंपरा, सण, समारंभ, नैतिक मूल्ये, बोधकथा, चालीरीती अशा अनेक बाबी एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पोहचल्या आहेत. लोकसंगीताचा अभ्यास काळाची गरज असल्याचे मुंबई विद्यापीठ लोककला विभागाचे प्रमुख डॉ.प्रकाश खांडगे यांनी म्हटले.
    श्री शिवाजी महाविद्यालयातील संगीत परिसंवादाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कन्व्हेनकर प्रा.अबोली सुलाखे व ऑर्गनायझिंग सचिव प्रा.डॉ.गुरमे व भारूडकार श्रीमती चंदाताई तिवाडी होत्या. खांडगे म्हणाले, संगीतमधूल करियरसाठी अनेक संधी आहेत, या सुवर्णसंधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. महाविद्यालयाने लोकसंगीत विभाग सुरू केला तर चांगले सहकार्य करु असेही त्यांनी म्हटले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.मधुकर फरताडे म्हणाले, शरिराचे आणि मनाचे आरोग्य राखण्यासाठी संगीत उपयोगी आहे,मन प्रसन्न होते. मानवाच्या शारिरीक व मानसिक थकवा दूर होतो इतकेच काय तर वनस्पती व प्राणीदेखिल संगीताला प्रतिसाद देतात. भविष्यातही असे अभिनव उपक्रम घेऊ. यावेळी प्रख्यात भारूड गायिका चंदाताई तिवाडी यांनी भारूड सादर केले. प्रास्ताविक सौ.अबोली सुलाखे यांनी सूत्रसंचालन श्रीमती सोनकर यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.गुरमे यांनी मानले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages