पुरुषोत्तम मासानिमित्त ३३ ब्राह्मण दाम्पत्यास आधिकवाण
नळदुर्ग, दि. १८ :
अधिकमासानिमित्त नळदुर्ग येथील श्री बाळकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन ३३ ब्राह्मण दाम्पत्यास आधिकवाण करून हा सोहळा उत्साहात पार पडला.
गेल्या २५ वर्षांपासून तसेच सलग तीन वर्षांपासून अधिकमासानिमित्त कथावाचन, गीतापठण, जप व विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री नंदकुमार डुकरे व महेश डुकरे तसेच सौ रुपाली डुकरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. तसेच श्रीबाळकृष्ण भजनी मंडळाच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.
नळदुर्ग शहरातील श्री बाळकृष्ण मंदिराची स्थापना सन १९९६ मध्ये झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गुजरातमधून श्रीबाळकृष्णाची मूर्ती आणून मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली असून, त्यानंतर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जात आहेत.
अधिकमासानिमित्त ब्राह्मण पूजन, ब्राह्मण भोजन व ब्राह्मण दाम्पत्यास आधिकवाण करण्यात आले. या कार्यक्रमास उत्तम रामदासी, प्रमोद कुलकर्णी, सुधीर पुराणिक, पांडुरंग कुलकर्णी, मुकुंद नाईक, मिलिंद कुलकर्णी, राणी भुमकर, वसंतराव अहंकारी, आनिल जोशी, राजू कुलकर्णी, हेमंत भुमकर, महेश कुलकर्णी, सुधीर पुराणिक, मनोज कुलकर्णी, सचिन होर्टीकर, मिलिंद भुमकर, पानसरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोई समाजाचे माजी सुनिल उकंडे, व अध्यक्ष अमृत पुदाले,
श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, भोई समाज बांधव तसेच बाळकृष्ण मंदिर भजनी मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भक्तांच्या मोठ्या सहभागामुळे धार्मिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.