Monday, 31 December 2012

नाटयचळवळीतूनही नैतिकेचे धडे : आर.आर. पाटील

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) दिल्‍लीतील सामुहिक बलात्‍काराचा निषेध करत सामाजिक अधःपतन होत असल्‍याने नाटय चळवळ देखील नैतिकतेचे धडे देईल, असे मत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी व्‍यक्‍त केले. बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त आयोजित निमंत्रितांच्‍या राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धेच्‍या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
    यावेळी व्‍यासपीठावर राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष मनोहरभाऊ डोंगर, आ. दिलीप सोपल, आ. राजन पाटील, नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, नागेश अक्‍कलकोट आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना पाटील म्‍हणाले, समाजातील रूढी परंपरा, वास्‍तव, अंधश्रद्धा यांचे सादरीकरण करत नाट्यचवळवळीद्वारे जनजागृती होत असून नाटक हे शहरी भागात जोमाने होत असून खेड्या पाड्यातील शेवटच्‍या माणसांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. मोठ्या सिनेमांना कलाकार देण्‍याचे कामही नाटकामुळे शक्‍य झाले. पूर्वीच्‍या काळात कलांना राजाश्रय मिळत परंतु सध्‍याच्‍या लोकशहीत असे आवश्‍यक असलेले प्राधन्‍य मिळत नसल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. साहित्‍य, कला याविना जीवन हे रूचीहीन वाटते, नाटक हे लोकशिक्षक व समाजशिक्षकाचे कार्य करते. मराठीला समृध्‍दी नाटकामुळेच मिळते. चित्रपटांमुळे प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरवली हा विचार करण्‍यापेक्षा आहे हा प्रेक्षक अधिक रसिकतेने या क्षेत्राकडे वळेल हे करणे आवश्‍यक आहे. पारंपारिक महाराष्‍ट्रात भजन किर्तन, संतवाणी, यांमधून समाजाची नैतिक जडणघडण होत असे. परंतु ते आज लयाला जात असून माणूस सैतान होत चालला आहे हे दुदैवी आहे. अशा कार्यक्रमातून दिग्‍गज कसदार कलाकार महाराष्‍ट्राला मिळावेत, जेणेकरुन संस्‍कारक्षम तरुणाई उद्याचा समाज घडवेल. पंढरीनाथ कांबळे यांच्‍या अभिनयाचे कौतुक करत आम्‍ही राजकीय पटलावर कलाकार असून एका दिवसात अनेक प्रकारचे कलाप्रकार सादर करीत असतो, असेही त्‍यांनी यावेळी म्‍हटले.
    आ. सोपल यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा देत सभागृहातील सोपलांचे अस्तित्‍व जनतेसमोर मांडले, आण्‍णा हे विधानभवनातील लॉबीचे अध्‍यक्षपद कायम टिकवून असल्‍याचे सांगत विनोदी, झणझणीत बोल फक्‍त सोपलच बोलू शकतात. जनतेच्‍या भावनांप्रमाणे तीव्र स्‍वरुपात मागण्‍या फक्‍त आण्‍णाच मागतात बार्शीकरांच्‍या भावनांचा आदर करुन आपल्‍या अपेक्षांचं ओझं निश्चितच उतरविणार आपल्‍या अपेक्षा पूर्ण करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
    पंढरीनाथ कांबळे यांनी बार्शीसारख्‍या ठिकाणी एकांकिका स्‍पर्धेचे आयोजन केल्‍याबद्दल धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. काळाच्‍या ओघाने पारितोषिके रक्‍कमा महाकरंडकाचे आकर्षण वाढत आहे. याच कार्यक्रमातून आबांशी चर्चा मनमोकळेपणे करता आली, त्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
    आ. सोपल यांनी बोलताना म्‍हणाले, बार्शीकर हे नाट्यप्रेमी असल्‍याने महाराष्‍ट्रातील सर्वात‍मोठी एकांकिका स्‍पर्धेची मेजवानी उपलब्‍ध करुन दिल्‍याचे सांगत आबांनी तालुक्‍यासाठी सातत्‍याने मदत केली आहे. आबा हे महाराष्‍ट्रातील वृध्‍दांचा मानसिक आधार आहेत. पेन्‍शनर्सच्‍या राज्‍यव्‍यापी अधिवेशनाचे उदघाटक आहेत. प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात नाटक असते, नाटकांशिवाय मराठी माणूस जगणे शक्‍य नाही, असे म्‍हणत विजेत्‍यांचे अभिनंदन करुन संयोजकांचे कौतुक केले.
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नागेश अक्‍कलकोटे यांनी तर सुत्रसंचालन रामचंद्र इकारे यांनी केले. कार्यक्रम यश‍स्‍वीतेसाठी रणजित गायकवाड, सचिन गावसाने, गणेश अक्‍कलकोटे, संतोष घुमरे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
बक्षीस वितरण
1) प्रथम क्रमांक - 61 हजार रूपये महाकरंडक ट्राफी, एकूट समूह, रंगसंगती मुंबई, 2) द्वितीय क्रमांक – 41 हजार रूपये, करंडक, सायलेंट स्‍क्रीन, श्री. मुंबई, 3) तृतीय क्रमांक - 21 हजार रूपये करंडक, वास इज वासव, तांडव पुणे 4) चतुर्थ क्रमांक –11 हजार रूपये करंडक आता पास, संक्रमण पुणे.
    स्‍पर्धेत परिक्षक म्‍हणून प्रा. दिलीप गाडे (अभिनेते), किशोर साव (दिग्‍दर्शक), सौ. शोभा बोल्‍ली, ज्ञानेश मुळे (दिग्‍दर्शक क्राईम डायरी) यांनी काम पाहिले.
आगळा वेगळा सत्‍कारआर आर पाटील यांच्‍या हस्‍ते दिलीप सोपल यांचा विशेष सत्‍कार करताना महात्‍मा फुलेंची पगडी, शाहू महाराजांची तलवार अन् भारतरत्‍न डॉ. बाबासाहेबांची राज्‍यघटना (संविधान) देऊन गौरविण्‍यात आले.


Labels:

सारा - सार


Labels:

Sunday, 30 December 2012

युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्‍यावा - राष्ट्रपती

मुंबई : विद्यापीठांनी केवळ उच्च शिक्षणाच्या द्वारपालाची भूमिका घेण्‍यापेक्षा समाज सक्षम करण्यासाठी आणि राष्ट्राच्या वेगवान प्रगतीसाठी युवकांमध्ये क्षमता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. याबरोबरच पर्यावरण व सामा‍‍‍जिक विषयांची जाण असणारे युवक निर्माण करणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.
        मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल के.शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर, प्र.कुलगुरु डॉ.नरेश चंद्र, विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्वत् सभेचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
           मुंबई विद्यापीठाचा गौरवपूर्ण शब्‍दात उल्लेख करुन राष्ट्रपती म्हणाले, या विद्यापीठाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व देणारे अनेक नेते दिले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, न्या.महादेव गोविंद रानडे अशा अनेक महान व्‍यक्तिंच्‍या विद्यार्जनाची कर्मभूमी असणाऱ्या याच विद्यापीठात महात्मा गांधींचे मॅ‍ट्रिकपर्यंतचे शिक्ष्‍ाण झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली. उज्वल इतिहास असणाऱ्‍या मुंबई विद्यापीठाने देशाचे भवितव्य घडविण्यासाठी स्वत:ला अधिक समर्पित करणे गरजेचे आहे. उच्च शिक्ष्‍ाणाचा हेतू हा केवळ उत्तम नोकरी आणि चांगले अर्थार्जन करण्यापुरता मर्यादित न ठेवता मानवतेची सेवा करण्याचा उद्देशही ठेवला पाहिजे. अध्ययन व अध्यापनाच्या क्ष्‍ोत्रात आमूलाग्र बदल होत आहेत, हे लक्षात घेऊन शिक्षकांनी नाविन्याचा ध्यास घेऊन प्रशि‍क्षित होणे गरजेचे आहे, असेही यावेळी राष्ट्रपतींनी सूचित केले.
         मुंबई विद्यापीठाच्‍या स्थापनेच्‍या वेळी मुंबई शहरातील नागरिकांनी या विद्यापीठाच्या उभारणीसाठी हातभार लावला आहे. भविष्‍यातील आव्‍हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र शासनाबरोबरच या शहरातील नागरिक व औद्योगिक आस्थापनांनीही विद्यापीठाच्या वाढीसाठी पुढे यावयास हवे यावरही त्‍यांनी भर दिला.
            राज्‍यपाल के.शंकरनारायणन यांनी, विद्यार्थ्यांनी संस्‍कारांची जपणूक करावी, असे आवाहन केले.
      ज्ञानदानाच्या क्षेत्रात दर्जेदार समजल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठातून आज पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देशभरात त्याचप्रमाणे इतरत्रही चांगल्या संधी मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करुन मुंबई विद्यापीठामार्फत भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्‍या उपक्रमांना राज्य शासनाचे यापुढेही सहकार्य राहील, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.
        राजन वेळुकर यांनी यावेळी समाजाच्या शैक्षणिक गरजा भागविण्याचे कार्य मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात येत असल्याचे सांगून विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Labels:

बाई गं...


Labels:

पंचायत समिती स्तरावरील दाखल्यांचे वाटपआता ग्रामपंचायत स्तरावरुन करणार : जयंत पाटील

सोलापूर :  राज्यातील ग्रामपंचायती हायटेक व अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून त्याअंतर्गत तालुकास्तरावरुन मिळणारी 19 शासकीय दाखले आता लवकरच ग्रामपंचायत स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येतील अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केली.
    अक्कलकोट पंचायत समिती विस्तारीत नुतन इमारतीचे उदघाटन ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, माजी उपमुख्यमंत्री आ. विजयसिंह मोहिते पाटील, आ. दिपक साळुंखे पाटील, आ. सिद्रामप्पा पाटील, जिल्हा परिषद  उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षण सभापती शिवानंद पाटील, पंचायत समिती सभापती विमल गव्हाणे, उपसभापती सोनाबाई आलुरे, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार उपस्थित होते.
    यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पंचायत राज व्यवस्थेतील तीन्ही स्तरांना राज्य सरकारकडून बळ देण्याचे काम सातत्याने होत आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने अनेक क्रांतीकारी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. इकोव्हीलेज अंतर्गत गावे चांगली आणि समृध्द करण्यावर भर दिला जात आहे. आता शाळांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळांचे मुल्यांकन करण्यात येणार असून 200 गुणांच्या आधारावर त्यांची अ,ब,क,ड,इ अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. असेही श्री. पाटील म्हणाले.
    दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळया उपाययोजना करुन केवळ दुष्काळी कामांसाठी पाच कोटी रुपये जिल्हाधिका-यांकडे कायमस्वरुपी ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन हजारो कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करीत असून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी एकोव्हिलेज योजना उपयुक्त असून यामध्ये केलेल्या वृक्षसंवर्धनामुळे निश्चीतच पर्जन्यमानामध्ये सकारात्मक फरक पडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गावांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
    जिल्हास्तरावरील रस्ते सुधारण्यासाठी सर्व प्रमुख जिल्हा मार्ग  सार्वजनि‍क बांधकाम विभागाकडे वर्ग करुन जिल्हयातील इतर लहान मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या सर्व कामांना मंजुरी देऊन कोणत्याही विकास कामांकरीता अनुदानाची अडचण भासू दिली जाणार नाही. तसेच ग्रामविकास, महसूल यासह नागरिकाभिमुख कार्यालयांमधील पद भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचाही उल्लेख ग्रामविकास मंत्र्यांनी केला.
    पालकमंत्री श्री. ढोबळे आपल्या भाषणात म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील पाणी प्रश्न मिटविण्यासाठी 11 कोटी रुपयांची सुजल योजना सुरु करण्यात आली असून रस्त्यांसाठी 72 कोटी रुपये आणि नागरी सुविधांसाठी 24 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळी गावांनी पिण्याच्या पाण्याचे 33 टक्के वीज बिल भरल्यास उर्वरित 67 टक्के रक्कम आणि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे सर्व वीज देयक शासन भरणार आहे.  अक्कलकोटला पाणीपुरवठा करणारी  हळ्ळी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन बदलण्याचा विचार असल्याचे पालकमंत्र्यांनी  सांगितले.
    ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत व पंचायत समिती ही सामान्य माणसांची महत्वाची केंद्रे आहेत. या केंद्रामधून चांगल्या सेवा दिल्या गेल्या पाहिजे. राज्यात प्रत्येक पंचायत समितीची सुसज्ज इमारत बांधण्याचा ग्रामविकास विभागाचा प्रयत्न असून ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम योजना संपूर्ण गावांमधून राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द असून बचत गटांच्या रुरल मॉलसाठीही शासन सर्व प्रकारे निधी उपलब्ध करुन देत असल्याचा उल्लेख ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी केला.                    
    माजी उपमुख्यमंत्री आ. मोहिते पाटलांनी शासनाकडून चांगल्या योजना सुरु असून प्रशासनाकडून त्या योग्य प्रकारे कार्यान्वित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.  जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. माळी यांनी जिल्हा परिषदेतील सर्व रिक्त पदे भरण्याची मागणी आपल्या भाषणातून केली. कार्यक्रमात आ. दिपक साळुंखे, आ. सिद्रामप्पा पाटील, माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचीही यथोचित भाषणे झाली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती विमल गव्हाणे यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कासार यांनी मानले.कार्यक्रमास अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांच्यासह अनेक प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

Labels:

पंढरपूरचा केंद्रीय पर्यटन यादीत समावेशाबाबत पालकमंत्र्यांचे महामहिम राष्ट्रपतींना निवेदन

सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा केंद्रीय पर्यटन स्थळाच्या यादीत समावेश करावा. पंढरपूर येथे वर्षभरात लाखो भाविक येत असतात. येथे पायाभूत सुविधा व अनुषंगिक विकासासाठी नांदेडच्या गुरुत्ता गद्दीच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून तरतूद संबधित मंत्रालयाकडून होण्याबाबतचे निवेदन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी महामहिम राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना पंढरपूर दौ-यात दिले.
    लोणंद - बारामती आणि लोणंद - पंढरपूर रेल्वे मार्गाचे सर्वे व भूसंपादनाची कार्यवाही झालेली आहे. सदरचे काम सुरु करुन लवकरच पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. भिमा (उजनी) हा राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प आहे. याचे काम अनेक वर्षापासून सुरु आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी 350 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. यासाठीचा निधी संबधित केंद्र शासनाच्या मंत्रालयाकडून उपलब्ध होऊन हे काम लवकर पूर्ण व्हावे आदि कामाचा अल्लेख पालकमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

Labels:

ती निष्‍पाप वेदना...

कु. राखी गायकवाड
ती निष्‍पाप वेदना...

वेदनेच्‍या वेदना समजून घ्‍या,
त्‍या पापी नराधमांना फाशी द्या,
ज्‍या स्‍त्री जातीच्‍या पोटातून जन्‍माला आला
त्‍याच स्‍त्री जातीवर त्‍याने अंधकार केला

वेदनाच्‍या आयुष्‍याचा शेवटी अंत झाला
त्‍या वेदनेची वेदना समजून घ्‍या
त्‍या पापी नराधमांना फाशी द्या

त्‍या पापी नराधमांनी केले
वेदनांच्‍या स्‍वप्‍नांचा चुरा
त्‍या पापी वृत्‍तीच्‍या नराधमांना
भर रस्‍त्‍यात तलवारीने चिरा
त्‍या वेदनेच्‍या वेदना समजून घ्‍या
त्‍या नराधमांना फाशी द्या

तिच्‍या डोळ्यातला अश्रूंचा प्रत्‍येक थंब
सांगत होता तिच्‍या दुःखाचा वेध
तिच्‍या निष्‍पाप मनाची व्‍यथा समजून घ्‍या
तिच्‍या मनाला शांती द्या,
त्‍या पापी नराधमांना फाशी द्या

तिने सोसले जे दुःख
ना येवो दुस-या वेदनाच्‍या पदरी
ना सोसावे दुसरी वेदना
या दुःखाचे ओझे भारी
उठा, जागे व्‍हा, आता न्‍याय करा
वेदनेच्‍या वेदना समजुन घ्‍या
त्‍या पापी नराधमांना फाशी द्या

तिच्‍या चितेला खरी श्रद्धांजली द्या
तिच्‍या शेवटच्‍या शब्‍दांची पुर्तता करा
तिच्‍या दुःखद मनाला शांती द्या
त्‍या वेदनेची वेदना समजुन घ्‍या
त्‍या पापी नराधमांना फाशी द्या
पापी नराधमांना फक्‍त फाशीच द्या

कु. राखी गायकवाड
इंजि‍नअरींग कॉलेज, सोलापूर

Labels:

स्‍त्रीचा काय गुन्‍हा...?

स्‍त्रीचा काय गुन्‍हा...?

काय आहे गुन्‍हा स्‍त्रीचा
का स्‍त्री जातीत जन्‍माला आली हाच ?
का स्‍त्रीने न जातीला जन्‍म दिला हा ?

आई होऊन जन्‍म दिला पुरूषाला तीच स्‍त्री
बहिनरुपी रक्षा करते भावा तीच स्‍त्री
पत्‍नी रुपी साथ निभावते आयुष्‍यभर तीच स्‍त्री

तीच स्‍त्री सोसते नराधमाचे अत्‍याचार
तीच स्‍त्री ऐकते जगाचा दुराचार
तीच स्‍त्री झेलते अग्‍नीचे घाव

का तिने सोसावे हे दुराचार
का तिच्‍याच पदरी हे अत्‍याचार
म्‍हणून आज सांगते हे नारी पेटून उठ

बस, आता या पुरुषनराधमाची दया
ज्‍याने स्‍त्रीवरच घातली आपली काळी छाया
होऊन चंडीका कर त्‍या रावणरुपी राक्षसाचा विनाश
ज्‍याने केला स्‍त्रीच्‍या पावित्र्याचा नाश
सौ. कल्‍पना गायकवाड
नळदुर्ग

Labels:

'दामिनी'चे ठरले होते लग्‍न, नराधमांनी केला स्‍वप्‍नांचा चुराडा

नवी दिल्‍ली -: सामुहिक बलात्कार पीडित तरुणीचा मृत्‍यू झाला. या तरुणीचे डॉक्‍टर व्‍हायचे ध्‍येय होते. तिने विवाह करुन भविष्‍याचेही स्‍वप्‍न रंगविले होते. परंतु, नराधमांनी तिच्‍यासोबतच या सर्व स्‍वप्‍नांचा चुराडा केला. घटना घडली त्‍या‍ दिवशी पीडित तरुणी ज्‍या युवकासोबत होती, त्‍याच्‍यासोबतच तिचे लग्‍न ठरले होते. परंतु, त्‍या दिवशी जे काही घडले, त्‍याने दोघांचेही आयुष्‍य उद्ध्‍वस्‍त केले.
         पीडित तरुणीच्‍या शेजा-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या युवकासोबत तिचे लग्‍न ठरले होते. तो तिच्‍या घराजवळच राहतो. फेब्रुवारीमध्‍ये त्‍यांचे लग्‍न होणार होते. लग्‍नाची खरेदी जोरात सुरु होती. दोन्‍ही घरांमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. घटना घडली त्‍या दिवशीही ते खरेदी करण्‍यासाठी गेले होते. लग्‍नाची एक मोठी पार्टीही त्‍यांनी आयोजित केली होती.
       नराधमांनी तिच्‍यावर हल्‍ला केला त्‍यावेळी तरुणाने तिला वाचविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, सर्वांनी मिळून त्‍यालाही जबर मारहाण केली. अखेर दोघांना नग्‍नावस्‍थेत बसबाहेर फेकुन दिले.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी

Labels:

पीडित तरूणीच्‍या पार्थिवावर सकाळी झाले अंत्‍यसंस्‍कार

नवी दिल्ली -: दिल्लीतील सामूहिक बलात्काराला बळी ठरलेल्या पीडित तरुणीच्या पार्थिवावर रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्‍यात आले. यावेळी केंद्रीय राज्य गृहमंत्री उपस्थित होते. सिंगापूर येथून एका विशेष विमानाने रविवारी पहाटे साडेतीन वाजेला पीडित तरुणीचे पार्थिक दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या.
         गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणा-या 23 वर्षीय बलात्कार पीडित तरुणीचा शनिवारी रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी मृत्यू झाला होता. सिंगापूर येथील माउंट एलिझाबेश रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. पार्थिवासोबत पीडितेचे आई-वडिल, भाऊ व भारतीय दूतावासाचे अधिकारी होते.
       शवविच्छेदन झाल्यानंतर तरुणीचे पार्थिव घेऊन विशेष विमान भारतीय वेळनुसार शनिवारी रात्री साडे दहा वाजता सिंगापूरहून भारताकडे रवाना झाले होते. बलात्कार पीडित तरुणीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात यावे तसेच 29 डिसेंबर हा दिवस 'महिला अत्याचारविरोधी दिन' म्हणून  घोषित करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.
         पीडित मुलीची शुक्रवारी प्रकृती खूपच नाजूक बनली होती. तिच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे बंद केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातील कर्मचा-यांनी पीडित तरुणीच्या इच्छाशक्तीला व धौर्याला सलाम ठोकला. त्या तरुणीने खूपच हिंमत दाखवली, तिला जगायचे होते. भारतातून तिला गंभीर अवस्थेतच आणून येथे भरती केले गेले होते. तिला वाचविण्याचा आम्ही भरपूर प्रय़त्न केला मात्र आम्ही यशस्वी ठरलो नाही, असे रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी म्हटले आहे.
          दरम्यान, 16 डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तसेच तिच्यावर अमानवी अत्याचारही  केला होता. एवढेच नाही तर तिला चालत्या बसमधून फेकून देण्यात आले होते. दिल्लीतील सफरगंज रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्‍यात आले होते. परंतु दिवसेंदिवस तरुणीची प्रकृती खालावत चालली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सिगांपूर येथील माउंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथेही पीडित मुलीची प्रकृती खूपच नाजूक बनली होती. तिच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे बंद केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.
        पीडितीने आपल्या आईला विचारले होते की, आरोपींना पकडले का?. त्यावर तिच्या आईने तिला हो सांगताच त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी इच्छा आईकडे व्यक्त केली होती. तसेच तिला जगायचे होते. तिच्यावर इतका भीषण प्रसंग येऊनही तिने धीर सोडला नव्हता. अखेर संसर्ग वाढतच राहिल्याने तिची प्रकृती खालावत गेली होती. अखेर तिचा शनिवारी मृत्यू झाला. तिची जगण्याची दुर्दम इच्छाशक्ती अपूर्णच राहिली असून, तिच्या इच्छेखातर सरकार बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा तरी देईल का, असा सवाल देश विचारत आहे.
डॉक्टर म्हणतात : दिल्लीतच सर्व अवयव निकामी झाले होते, सिंगापुरात केवळ तपासणी झाली
पीडित तरुणीसोबत सिंगापूरला गेलेले मेदांता हॉस्पिटलचे डॉ. यतीन मेहता यांनी सांगितले, तिच्या रक्तात प्लेटलेट्सची निर्मिती ठप्प झाली होती. फुप्फुसे निकामी झाली होती. फुप्फुसांसह पूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले होते. त्यामुळे तिचे अनेक अवयव काम करत नव्हते.
        डॉ. मेहता यांनी सांगितले, सिंगापुरात तिला आणल्यानंतर तिची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्यामुळे तिच्यावर अधिक उपचार करता आले नाहीत. तेथे पोहोचताच डॉक्टरांनी तिच्या शरीरातील सर्व अवयवांची तसेच रक्ताची चाचणी केली. मात्र, अधिक उपचार करण्याइतका अवधी त्यांना मिळाला नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. जगदीश प्रसाद यांनी तिला उपचारासाठी सिंगापुरात पाठवण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 25 डिसेंबरच्या रात्री तिला हार्ट अटॅक आल्यानंतर तिची प्रकृती अधिकच नाजूक झाली. आम्ही डॉक्टरांच्या टीमसह इतर डॉक्टरांचाही सल्ला घेतला होता. मात्र, परिस्थिती गंभीर होती. क्षण न् क्षण किमती होता. त्यामुळे त्याच दिवशी दुपारी तीननंतर तिला अमेरिका किंवा लंडनला हलवण्याचा निर्णय झाला होता. स्थिती आणखी बिघडण्यापूर्वी वेळ न दवडता आम्ही तिला सिंगापूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. तेथे तिच्यावर सर्वतोपरी उपचार करता येतील, ही त्यामागची धारणा होती.
पाच जणांना फाशीच होईल, सहावा मात्र सुटू शकतो
बलात्काराच्या आरोपींपैकी किमान 5 नराधमांना तरी मृत्युदंड होऊ शकतो. अल्पवयीन असल्याने सहावा आरोपी मात्र सुटू शकतो. हे मत आहे कायदेतज्ज्ञांचे. सिंगापुरात मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सर्व आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. केवळ सरकारपक्षाला ते सिद्ध करावे लागेल. अर्थात हे कठीण काम नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खटल्याची सुनावणी 4 जानेवारीपासून फास्ट ट्रॅक कोर्टात रोज होणार आहे. आरोपींना फाशी देण्यासाठी कोलकात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व निर्घृण खून करणार्‍या धनंजयच्या प्रकरणाचा संदर्भ घेतला जाऊ शकतो. धनंजयला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती.
* सौजन्‍य दिव्‍यमराठी

Labels:

सारा - सार

Labels:

Saturday, 29 December 2012

अर्थवस्थेच्या मजबूतीकराणसाठी बँकांचा सहभाग महत्वाचा : राष्ट्रपती मुखर्जी

पंढरपूर : ग्रामीण ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सहकारी बँका निसंधिग्दपणे अधिक महत्वाची भूमिका बजावू शकतात पंढरपूर को.अर्बन बँक अशा बँकेपैकी आहे. यंदा ही बँक शंभर वर्ष पुर्ण करीत आहे हा सहकाराच्या इतिहासातील गौरवपूर्ण क्षण आहे अशा शब्दात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंढरपूर को.अर्बन बँकेचा गौरव केला.
    पंढरपूर को.अर्बन बँकेचा शताब्दी समारोप मार्केट कमिटीच्या प्राणंगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
    यावेळी व्यापसपिठावर राज्यापाल के.शंकरनारायण, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार सुधाकर परिचारक, बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष उदय उत्पात उपस्थित होते. 
     1904 सालच्या सहकार कायद्याने या चळवळीला खरी गती मिळाली. सन 1913-14 साली आलेल्या अर्थिक संकटात ही चळवळ टिकून राहीली. सध्या सहकारी बँकासमोर अनेक आव्हाने असून या परिस्थित बँकांनी स्वत:ची कार्यकुशलता वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच सहकारी बँकांनी आपल्या खंडप्राय देशातील गोरगरीब व मागासालेल्या प्रवर्गासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही राष्ट्रपती महोदयांनी यावेळी केले.
      याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशाच्या प्रगती मध्ये बँकाचा मोठा हिस्सा असून देशाच्या आर्थिक उलाढालीतही सहकाराचा मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
    सध्या दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत असून याचा मुकाबला करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून दुष्काळ निवारणासाठी अधिका-यांनी सजग रहावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री.चव्हाण यांनी केले.
  यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्याचे पाणीपुरवठा,स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रपती महोदयांना निवेदन दिले.
    याप्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन राष्ट्रपती श्री.मुखर्जी यांच्या हस्ते  कळ दाबून करण्यात आले.बँकेच्या आजपर्यतच्या वाटचालीचा डाक्युमेंट्रीच्या (माहितीपटाच्या) सी.डीचे व स्मरणिकेचे प्रकाशन राज्यपाल के.शंकरनारायण यांच्या हस्ते करण्यात आले तर कोअर बँकीग प्रणालीचे उदघाटन मुख्यमंत्री महोदयांनी केले.
    प्रारंभी प्रास्ताविकामध्ये बॅकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी बँकेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला तसेच आगामी काळात 3 हजार कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट त्याच बरोबर राज्याच्या  विविध भागात 50 शाखांचा विस्तार करणार असल्याचे सांगितले.शेवटी  बँकेचे उपाध्यक्ष उदय उत्पात यांनी आभार मानले      

Labels:

कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा आणि त्याची कडक अंमलबजावणी हिच खरी श्रध्दांजली : मुख्यमंत्री

मुंबई : बलात्कारासारखा मानवतेला कलंक असलेला गुन्हा करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करणारा कायदा करणे आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करणे हिच दिल्लीमधील पिडीत तरुणीला खरी श्रध्दांजली ठरेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
        दिल्लीमधील सामुहिक बलात्कारानंतर गेले 13 दिवस मृत्युशी झुंज देणाऱ्या तरुणीच्या निधनाबद्दल श्री.चव्हाण यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.  शोक संदेशात चव्हाण यांनी म्हटले आहे की, अलिकडच्या कालावधीत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दुर्देवाने वाढले आहे. एकीकडे शिक्षणाचा सर्वस्तरावर प्रसार होत असताना अशा प्रकारची अमानवी कृत्ये वाढणे हे चिंताजनक आहे. या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच स्त्रियांवरील अत्याचार आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांची सुनावणी  विशेष जलदगती न्यायालयांमार्फत कमीत कमी कालावधीत होणे आणि गुन्हेगारांना शिक्षा होणे आवश्यक आहे.  आपण आपल्या स्तरावर यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत.  कठोर कायदे, जलद सुनावणी, शिक्षेची तातडीने अंमलबजावणी याचबरोबर सामाजिक प्रबोधनासारखे उपाय योजूनच अशा प्रकारच्या घटना टाळणे शक्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
       नवी दिल्लीतील या घटनेनंतर देशभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन मी राज्याच्या गृहमंत्र्यांसमवेत वरिष्ठ सनदी व पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन अशा प्रकारच्या राज्यात घडलेल्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला आहे.  सध्याच्या जलदगती न्यायालयांपैकी 25 जलदगती न्यायालये स्त्रियांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचे खटले चालविण्यासाठी असावीत अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाला करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात भविष्यकाळात अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत यासाठी गृह विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे.
      दिल्लीतील घटनेमुळे संपूर्ण देशभरात विशेषत: तरुण वर्गात निषेधाची लाट उसळली आहे आणि ती स्वाभाविक आहे.  अशा प्रकारच्या घटनांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. मात्र, निषेध वा निदर्शने करताना सामाजिक शांततेला तडा जाऊ न देता कायदा व सुव्यवस्था पाळून शांततामय मार्गाने करण्याचे भानही निदर्शकानी पाळले पाहिजे असेही आवाहन श्री.चव्हाण यांनी केले आहे.

Labels:

देशातील महिला सुरक्षित झाल्यातर आमचे दु:ख हलके होईल : 'दामिनी'चे कुटुंबिय

सिंगापूर -: दिल्लीतील सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या युवतीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, आमची मुलगी गेल्याचे आम्हाला अपार दु:ख आहे. पण तिच्या मृत्यूच्या निमित्ताने देशातील महिला अधिक सुरक्षित झाल्या तर दु:ख थोडे हलके झाल्यासारखे वाटेल. ही माहिती सिंगापूरमधील भारतीय दूतावासातील अधिकारी यांनी दिली आहे.
      पीडित युवतीचा शनिवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये माऊंट एलिझाबेझ रुग्णालयात मृत्यू झाला होता. पीडित युवतीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान सिंगापूरात दाखल झाले आहे. युवतीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ती प्रक्रियाही पूर्ण झाली असून, हे विशेष विमान सायंकाळपर्यंत नवी दिल्लीत दाखल होईल.
       भारतीय दूतावासातील अधिकारी टी. सी. ए. राघवन यांनी माध्यमांना सांगितले की, पीडित युवतीवर ज्या क्रूरतेने सामूहिक अत्याचार करुन तिला लोखंडी रॉडने मारहाण केली ते पाहता व आता आपली मुलगी या जगात नसल्याचे कळताच पीडितेच्या कुटुंबियांना जबरी धक्का बसला आहे. मात्र, त्यांना जगभरातून सांत्वनाचे संदेश व फोन येत आहेत. तसेच आम्ही तुमच्या दुखात सहभागी झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हे कुटुंब कोसळून गेले असले तरी या कुटुंबाला थोडे सावरावे लागत आहे. तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की आमची मुलगी जरी याला बळी पडली असली तरी, या घटनेच्या निमित्ताने दिल्लीतील व भारतातील महिला अधिक सुरक्षित व भीतीमुक्त होतील.
        या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांचे अपरिमित हानी झाली असून, या कुटुंबाला हे जबरी दु:ख सहन करण्याचे साहस व धैर्य मिळो. या घटना खूपच किळसवाणी आहे, असेही राघवन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी

Labels:

सुटली बिचारी !


Labels:

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी अंतीम मुदतवाढ

उस्मानाबाद -: महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ई-स्कॉलरशिप ही योजना कार्यन्वित केलेली आहे. या योजनेमुळे शिष्यवृत्तीची रक्कम थेट मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यात तर शिक्षण फी परीक्षा फी व इतर अनुषंगिक फी संबंधित महाविद्यालयाच्या खात्यात जमा होणार आहे. जे मागासवर्गीय विद्यार्थी ऑन लाईन अर्ज भरतील त्यांनाच मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचा आणि संबंधित महाविद्यालयांना शिक्षण फी व परीक्षा फीचा लाभ देण्यात येणार आहे. यापुर्वी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  http:// mahaeschol.maharashtra.gov in/scholarship/login.aspex या वेबसाईटवर दिनांक 15 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढवून आता ती 15 जानेवारी, 2013 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
           वाढीव मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती /शिक्षण फी, परीक्षा फी माहे जानेवारी-2013 नंतर मिळेल याची विद्यार्थ्यांनी तसेच प्राचार्यांना नोंद घ्यावी. याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही. आता देण्यात आलेली  मुदतवाढ ही अंतीम स्वरुपात असल्याने यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच विहित मुदतीनंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही.विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची लबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील.
           ऑन लाईन अर्ज भरतांना इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा आसन क्रमांक आणि उत्तीर्ण झाल्याचे वर्ष ही माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे.
       या संदर्भात काहीही अडचणी असल्यास संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण किंवा संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग यांचेशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Labels:

लोकशाही दिनासाठीची कार्यपद्धती आता अधिक सुलभ

उस्मानाबाद -: सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी तसेच अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणू करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येतो यासंदर्भातील कार्यपध्दती अधिक सूलभ व्हावी,यासाठी आता तालुकास्तरावरही लोकशाही दिनाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरावर तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक ठरणार आहे.
       शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत दि. 26 सप्टेंबर,2012 रोजी परिपत्रक जारी केले असून यापुढील काळात विहीत नमुन्यातील अर्जच लोकशाही दिनाकरीता स्वीकारण्यात येतील,असे जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
     तालुका लोकशाही दिन कार्यक्रमाचे तहसीलदार हे अध्यक्ष असतील तर जिल्हाधिकारी कार्यालयात होणा-या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील. संबंधित स्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 वाजता हा उपक्रम आयोजित करण्यात येईल.
       संबधितानी आपले अर्ज विहीत नमुन्यात करावेत, तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपात असावी. चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी  यांच्या लोकशाही दिन कार्यक्रमात संबंधितांना अर्ज करता येईल. त्यानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिन कार्यक्रमात तर विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात  अर्ज करता येणार आहे.
    या चारही स्तरावर लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट  प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक तसेच आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतीम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे,अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
       सर्वस्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, त्या विभागाच्या विभाग प्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल व सदर विभाग प्रमुख या अर्जातील कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील.
         तालुका लोकशाही दिनात अर्ज करताना अर्जदारांनी स्वत:चे नाव व पुर्ण पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक , विषय, विनंती/निवेदन/तक्रारीच्या समर्थनार्थ दाखल केलेली कागदपत्रे जोडावयाचे असून सोबत तहसीलदार यांना उददेशून अर्ज करावयाचा आहे. तालुकास्तरावरील लोकशाही दिन तहसीलदार कार्यालयात होईल त्यावेळी मुळ अर्जासह उपस्थित रहावे.अर्जाची आगाऊ प्रत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी पाठविणे आवश्यक आहे.
        जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिनात अर्ज सादर करताना अर्जदारांने स्वत:चे नाव व पुर्ण पत्ता, दूरध्वनी/मोबाईल क्रमांक, विषय, तालुका लोकशाही दिनात अर्ज केला होता काय, असल्यास टोकन क्रमांक,तहसीलदारांकडून मिळालेले उत्तर आदि कागदपत्र जोडावयाचे असून सोबत जिल्हाधिकारी यांना उद्देशून अर्ज, तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत आणि तहसीलदारांच्या उत्तराची प्रत जोडणे आवश्यक आहे.
         लोकशाही दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुटी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल,असे कळविण्यात आले आहे. 

Labels:

जिल्हयात शस्त्रबंदी व जमावबंदी

उस्मानाबाद -: जिल्ह्यात  दि. 30 डिसेंबर ते 13 जानेवारी, 2013 च्या मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे  अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड  यांनी कळविले आहे.
        या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तिंना शस्त्र, काठ्या, लाठ्या, बंदुका, तलवारी, चाकू, रिव्हॉवर आदि जवळ बाळगता येणार नाही, शरीरास इजा करण्यास कारणीभूत ठरतील किंवा सहज बाळगता येतील अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाही, कोणतेही क्षार, द्रव्य पदार्थ, स्फोटके जवळ बाळगता, ठेवता येणार नाही ,किंवा वाहून नेता येणार नाही. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही. सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा. वस्तु जवळ बाळगता येणार नाही. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
       तसेच उस्मानाबाद जिल्हयात कोणत्याही सडकेवर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास किंवा सभा घेण्यास, मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय कामावरील कोणतेही अधिकारी, कर्मचारी किंवा शासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम यांना हे आदेश लागू राहणार नाहीत.
       या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधितानी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.  हे आदेश दि. 30 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते दि 13 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.

Labels:

दिल्लीत शांतीमोर्चा : संपूर्ण देश गहिवरला, शीला दीक्षितांना तरुणाईचा घेराव

नवी दिल्ली -: गेल्या 13 दिवसापासून मृत्यूशी झुंज देणा-या 23 वर्षीय बलात्कार पीडितेचा शनिवारी सिंगापूरात मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील तरुणाईने या घटनेच्या निषेधार्थ शांतीमोर्चा काढला आहे. देशाची राजधानी दिल्लीत वैद्यकीय शिक्षण घेणा-या एका उच्चशिक्षित मुलींवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे. तसेच या घटनेने देशाच्या इज्जतीची लक्तरेच निघालीच आहे. गेल्या १३ दिवसापासून दिल्लीतील तरुणाईने आंदोलन करुन राग व्यक्त केला. पण आज तरुणाईने कोणताही शब्दही न उच्चारता केवळ संपूर्ण दिल्लीतून शांतीमोर्चा काढला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठापासून ते मुनारिकापर्यंत (जेथे ही पीडित मुलगी 'त्या' बसमध्ये बसली होती) हा शांतीमोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, जंतरमंतर सामील झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तरुणाईने घेराव घातला. त्यानंतर दीक्षित यांनी तेथून काढता पाय काढला.
       या तरुणाच्या मृत्यूनंतर संपूर्ण देश गहिवरला. राष्ट्रपती, पंतप्रधान, महिला आयोग, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांच्यापासून देशातील उद्योगपती, सेलेब्रेटी ते सोशल नेटवर्क साईटवरील सामान्य नागरिकांनी या घटनेचा रोष व्यक्त केला आहे. आपण देशाची लाडो (मुलगी) गमावली असल्याच्या प्रतिक्रिया देशभर सर्वजण उमटत आहेत.
        दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्या सहा नराधाम आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी दिल्ली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी

Labels:

देशातील सर्व जनतेने शांतता राखावी : राष्ट्रपती

सोलापूर :- दिल्ली येथील सामुहिक बलात्कारातील पीडीत मुलीच्या मृत्युच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व जनतेने शांतता राखाण्याचे आवाहन महामहिम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.
    सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील  अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राचे उदघाटन राष्ट्रपती महोदयांच हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री गुलाम नबी आझाद,
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री कुमारी सेलजा, पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे, वन, मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम,  उपस्थित होते.
    आपल्या भाषणात पीडीत तरुणीच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करुन राष्ट्रपती म्हणाले की, झालेली घटना अत्यंत दु:खद व खेदपूर्ण आहे. त्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी सरकारकडुन सर्व शक्य ते प्रयत्न करण्यात आले.तीच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.
    आपल्या संस्कृतित स्त्रियांना देवी, माता, बहिण, पत्नी या सह विविध रुपात बघितले जाते. त्यांना समाजात निर्भय वातावरणात राहता यावे यासाठी अशा घृणास्पद घटना घडु नयेत याची दक्षता घेतली पाहिजे. असे आवाहन महामहिम राष्ट्रपती यांनी केले.
    परदेशातील सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा देशात उपलब्ध होण्यासाठी येत्या पंचवार्षिक योजनेत आरोग्य विभागासाठी असणारी आर्थिक तरतूद 300 टक्क्यांनी वाढविण्यात आली आहे. सद्या देशात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टर्स, परिचारीका, वैद्यकीय मनुष्यबळाचे प्रमाण कमी आहे. परंतू आगामी वर्षात शासनाच्या प्रयत्नामुळे हे नक्कीच वाढेल असा विश्वास राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केला.
    ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी शासन विविध आरोग्य योजना राबवित आहे. सामाजिक व आर्थिक विकासामध्ये चांगल्या आरोग्यासह शरीर व मन सुदृढ राहावे म्हणून ग्रामीण वै'द्यकीय पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. देशातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल्सची अधिक आवश्यकता असून या साठी वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांची प्रवेश क्षमता वाढवून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभारण्यात येत असल्याचेही राष्ट्रपती महोदय म्हणाले.
     भारत हा तरुणांचा देश असून त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त क्षमता आहे. त्या क्षमतांचा वापर चांगल्या पध्दतीने व्हायला पाहिजे. देशात कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी भगवान गौतम बुध्दांच्या अहिंसक आणि शांततेच्या मार्गाचे अनुकरण करण्याची अपेक्षा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली.
    मुख्यमंत्री चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्यदायी योजनेसारखा पथदर्शी  प्रकल्प प्रयोगात्मकरित्या आठ जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे. आता तो संबंध राज्यभर राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत 23 हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
    राज्यात लवकरच शंभर मोबाईल रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्याची क्रांतीकारी योजना कार्यान्वित होत आहे. यामध्ये रुग्णवाहिका कॉलसेंटरला फोन केल्यास रुग्णाच्या सेवेत ती रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध होणार आहे. सद्या नवीन आठ वैद्यकीय महाविद्यालयांना शासनाने परवानगी दिली असून भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
    सद्या राज्य भीषण दुष्काळाशी सामना करीत असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे. या दुष्काळामध्ये पाणी टंचाईला खुप मोठ्या प्रमाणवर तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासन सर्व ताकत पणाला लावील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. 
    केंद्रीय आरोग्यमंत्री आझाद यांनी युपीए सरकारने ग्रामीण भागातील 75 टक्के लोकांच्या आरोग्यसेवेसाठी अधिकाधिक लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यांमध्ये 90 हजार कोटी रुपये वैद्यकीय सेवेसाठी खर्च करण्यात आल्याचे सांगितले. तसेच राज्यांमधील वैद्यकीय सुविधांच्या सक्षमीकरणासाठी 43.50 हजार कोटी दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला. गेल्या तीन वर्षापासून भारत सरकार वैद्यकीय क्षेत्रात क्रातीकारी बदल घडविण्यासाठी ठोस पावले उचलत असून त्या अंतर्गत वैद्यकीय पदवी प्रवेश क्षमतेच्या संख्येत 40 टक्के आणि पदव्युत्तर पदवी प्रवेश क्षमतेत 80 टक्के वाढ केली आहे. आगामी काळात हीच वाढ अनुक्रमे 50 व 100 टक्के करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
    कार्यक्रमास महापौर अलका राठोड, आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्रामप्पा पाटील, माजीमंत्री आनंदराव देवकते, माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, एम. एम. पटेल पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टचे बिपीन पटेल, अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Labels:

पीडीत मुलीच्या निधनाबद्दल राष्ट्रपतींना शोक

सोलापूर :- दिल्ली येथील सामुहिक बलात्कारातील पीडीत मुलीच्या मृत्युबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन राष्ट्रपती श्री.प्रणव मुखर्जी यांनी अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले.
      सोलापूर येथे डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान सभागृहाचा लोकार्पण समारंभ आज त्यांच्या हस्ते  झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन हे होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. गुलाम नवी आझाद, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री श्रीमती कुमारी सेलजा,  वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण, पालकमंत्री श्री. लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते.
    या प्रसंगी बोलतांना राष्ट्रपती म्हणाले की, महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, महिला सुरक्षीत राहिल्या पाहिजेत, स्त्रीला आई व बहिणीच्या नात्याने सन्मानाने वागविले पाहिजे यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
     शरिराला जसे अन्न लागते तसे बुध्दीलाही खाद्य लागते. ते खाद्य देण्यासाठी सोलापूरातील कलावंत, खेळाडू, वक्ते यांना उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. निर्मलकुमार फडकुले हे सोलापूरचे ज्येष्ठ विचारवंत व राज्यातले नामवंत साहित्यीक म्हणून त्यांचे योगदान महत्वपूर्ण होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने या अत्याधुनिक सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. या सभागृहाचे लोकार्पण झाल्याचे त्यांनी जाहीर केले.  
     सोलापूरला अनेक शतकांची, श्रेष्ठ मूल्यांची, धाडसाची व संस्कृतीची परंपरा आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या लढ्यात सोलापूर शहराचे योगदान महत्वपूर्ण राहिले असल्याचे गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपती महोदयांनी केला.
    मुख्यमंत्री श्री. पथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सोलापूरच्या साहित्यीक व सांस्कृतिक जीवनात डॉ. निर्मलकुमार  फडकुले यांची महत्वाची भूमिका होती. संत वाड्.मयावर त्यांनी केलेले योगदान महत्वपूर्ण होते. सांस्कृतिक काया्रला त्यांनी वाहून घेतले होते. त्यांच्या नावाने उभारण्यात आलेले हे सभागृह सोलापूरच्या वैभवात भर टाकणारे आहे असे प्रतिपादन केले.
    डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रामदास फुटाणे व सचिव श्री. विष्णुपंत कोठे यांनर मान्यवरांचा सत्कार केला. समारंभाला महापौर श्रीमती अलका राठोड, आ. प्रणिती शिंदे, श्रीमती मंदाकिनी फडकुले, प्रतिष्ठीत नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

Labels:

तुळजाभवानी कारखान्‍याची सर्वसाधारण सभा घेऊन भंगार विक्री करण्‍याची मागणी

नळदुर्ग -  श्री तुळजाभवानी साखर कारखान्‍यातील भंगार विक्री करण्‍यापूर्वी कागदपत्राची पूर्तता करुन  सभासदांची सभा घेऊन व त्‍या सभेत ठराव घेऊनच भंगार विक्री करावी अशी मागणी करून भंगार विक्रीसह इतर विषयावर सविस्‍तर चर्चा सभेत घडवून आणावी, तसेच कायदेशीर बाबीची पूर्तता केल्‍याची खात्री होईपर्यंत कारखान्‍यातील भंगाराची विक्री करु नये अन्‍यथा अनुचित प्रकार घडल्‍यास त्‍यास कार्यकारी संचालक जबाबदार राहतील, असे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सभासद व शेतकरी संघटनेच्‍यावतीने देण्‍यात आले.
      निवेदनात नमूद केले आहे की, गेल्‍या काही दिवसांपासून श्री तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्‍यातील लोखंड भंगार विक्री बेकायदेशीरित्‍या सुरु असून हे विचारण्‍यासाठी दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माहिती मिळाल्‍यानंतर घटनास्‍थळी नऊ वाजता तुळजाभवानी कारखान्‍यावर गेले असता गेटवरती भंगार भरणा-या दोन ट्रक आढळून आल्‍या. त्‍यानंतर आम्‍ही कार्यकारी संचालक यांची भेट घेतली असत चार ट्रक लोखंड भंगार भरुन गेल्‍याची माहिती  दिली. यावेळी त्‍यांना भंगार विक्रीच्‍या कागदपत्राची माहिती विचारली असता उडवाउडवीचे उत्‍तर मिळाले. भंगार विक्री कोणत्‍या आधारे कार्यकारी संचालक करतात, याची सर्व कागदपत्राची पुर्तता करुन सभासदाची सभा घेऊन त्‍या सभेत ठराव होवूनच रितसर भंगार विक्री करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. सर्वसाधारण सभा घेऊन भंगार विक्री तसेच इतर विषयावरती सविस्‍तर चर्चा घडवून आणावी. सर्वसाधारण सभा न घेता किंवा कायदेशीर कागदपत्राची पुर्तता, त्‍याचप्रमाणे दिेलेल्‍या सर्व कागदपत्राची पर्तता केल्‍यानंतर शहनिशा होईपर्यंत भंगार विक्री करु नये, अन्‍यथा अनुचित प्रकार घडल्‍यास कार्यकारी संचालक हेच जबाबदार राहतील, असेही निवेदनात म्‍हटले आहे.
या निवेदनावर अरविंद बाबुराव घोडके, आप्‍पासाहेब शेटे, अच्‍युत आलुरे, बसवराज मुळे, राजाराम गोवे, अनिल कुलकर्णी, गुरूनाथ मिटकर, सदाशिव हागलगुंडे, दत्‍ता जाधव, बाळु हागलगुंडे, संजू घुगे, परमेश्‍वर काळे, महमंद शेख, नागनाथ जाधव, संजय घुगे, शिवराज कुताडे, योगीनाथ तोग्‍गी आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
         दरम्‍यान याप्रकरणी कारखान्‍याचे कार्यकारी संचालक विकास भोसले यांच्‍याशी संपर्क साधले असता, तुळजाभवानी साखर कारखान्‍यातील भंगारचा माल ट्रकमध्‍ये भरण्‍यापूर्वी कायदेशीर आवश्‍यक त्‍या कागदपत्राची पूर्तता करुनच कारखान्‍याबाहेर भंगार पाठविण्‍यात येतो. सभासद शेतकरी यांची कारखान्‍याकडून दिशाभूल केली जात नाही, असे सांगितले.

Labels:

चिकुंद्रा येथे स्‍थानिक बी-बियाणांचे प्रदर्शन

नळदुर्ग -: वन मंत्रालय भारत सरकार, बायफ संस्‍था पुणे व आधार सामाजिक संस्‍था इटकळ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पर्यावरण जाणीव जागृती कार्यक्रमानिमित्‍त आधार संस्‍थेच्‍या वतीने मौजे चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे स्‍थानिक बी-बियाणांचे प्रदर्शन दाखविण्‍यात आले.
      पर्यावरण व स्‍थानिक बी-बियाणांचा संबंध कसा आहे, याविषयी प्रदर्शनामध्‍ये परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. तर ज्ञानकिरण सामाजिक संस्‍थेचे अध्‍यक्ष भैरवनाथ कानडे यांनी पर्यावरणाचा होत असलेला -हास व त्‍यावर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुचवली.
       प्रदशर्नामध्‍ये माहिती देताना मारुती बनसोडे म्‍हणाले की, स्‍थानिक बी-बियाणे हे वरचेवर लोप पावत चालले आहेत. रासायनिक खताच्‍या मा-यामुळे सध्‍याचे पीक हे मानवास हानीकारक आहे. अशा अन्‍नाने मानवास अनेक व्‍याधी, स्‍थानिक बियाणाचे संवर्धन करावे, असे त्‍यानी शेवटी सांगितले.
      आधार सामाजिक संस्‍थेचे सचिव दयानंद काळुंके यांनी आपल्‍या सूत्रसंचालनासह पर्यावरणाच्‍या संदर्भात ‘‘माझ्या अंगणात झाडाचं लय कामरं’’, ‘‘मिरची बाईचं लगीन झाली गवार करवली’’ सह अनेक मनोरंजनात्‍मक गायन करुन विद्यार्थ्‍यांना पर्यावरणाचे महत्‍त्‍व पटवून दिले.
      या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी भानुदास कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून नितीन शिंदे, उस्‍मानाबाद शिक्षक संघटनेचे उपाध्‍यक्ष एन.एस. इटकरी, गोविंद कराळे, भालके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्‍वर गरड यांनी केले. या कार्यक्रमाच्‍या प्रदर्शनाचा लाभ शेकडो विद्यार्थी, गावक-यांनी घेतला.

Labels:

गॅंगरेप प्रकरण: 23 वर्षीय पीडित तरुणीचा मृत्यू; दिल्लीत अलर्ट

नवी दिल्ली -:  गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूशी संघर्ष करत असलेल्या दिल्लीतील गॅंगरेप पीडित २३ वर्षीय तरुणीचा अखेर मृत्यू झाला. सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये         तिच्यावर उपचार सुरु होते.  मध्यरात्री सव्वा दोन वाजता तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले. अवयव निकामी झाल्यामुळे पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.  तरुणीच्या मृत्यू झाल्यानंतर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
           प्रकृती सातत्याने खालावत असल्यामुळे पीडित तरुणीला सफरगंज रूग्णालयातून सिंगापूरला हलविण्यात आले होते. तिला वाचविण्यासाठी तेथील डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले. सिंगापूर येथील रुग्णालयात दाखल करण्याआधीच पीडित तरुणीचे अवयव निकामी होण्यास सुरुवात झाली होती. प्रकृती सातत्याने खालावत असल्यामुळे अवयव प्रत्यारोपण करुन तिला वाचवणे अशक्य झाले होते. पीडित तरुणीची प्रकृती शुक्रवारी खूपच खालवली होती. तिचे अवयव निकामी झाले होते. उपचाराला ती सकारात्मक प्रतिसाद देत नव्हती. तरुण‍ीचा मृत्यू झाला तेव्हा तिचे आई-वडील आणि भाऊ तिच्यासोबत होता.

आरोपींना फाशीची ‍शिक्षा द्यावी
        16 डिसेंबर रोजी दिल्लीत एका धावत्या बसमध्ये या तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या आणि तिच्या मृत्यूसही कारणीभूत ठरलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी केली आहे.
 (साभार - दिव्‍य मराठी )

Labels:

सारा-सार


Labels:

Friday, 28 December 2012

रोमांचक सामन्‍यात भारताचा पाकिस्‍तानवर विजय, टीम इंडियाने राखली लाज

अहमदाबाद -: अखेरच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या रोमांचक सामन्‍यात भारताने पाकिस्‍तानला 11 धावांनी पराभूत केले. भारताने दिलेल्‍या 193 धावांच्‍या आव्‍हानाचा पाठलाग करताना पाकिस्‍तानने 7 बाद 181 धावा काढल्‍या. अखेरच्‍या षटकात पाकिस्‍तानला 20 धावांची गरज होती. परंतु, इशांतने फटकेबाजीची संधी दिली नाही.
       मोठ्या धावसंख्‍येचा पाठलाग करताना पाकिस्‍तानच्‍या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. नासिर जमशेद आणि अहमद शेहजाद यांनी 74 धावांची सलामी दिली. परंतु, 84 धावांमध्‍ये पाकिस्‍तानचे दोन्‍ही सलामीवीर परतले. नासिर जमशेद आणि अहमद शेहजाद यांनी पॉवर प्‍लेच्‍या 6 षटकांमध्‍ये 54 धावा कुटल्‍या. दोघांनी त्‍यानंतरही फटकेबाजी सुरु ठेवली. अखेर ही जोडी आर. अश्विनने फोडली. त्‍याने जमशेदला झेलबाद केले. जमशेदने 32 चेंडुंमध्‍ये 41 धावा काढल्‍या. त्‍यानंतर युवराजने शेहजादला बाद केले. समोर येऊन युवराजला षटकार खेचण्‍याच्‍या नादात तो यष्‍टीचीत झाला. त्‍याने 31 धावा काढल्‍या.

त्‍यानंतर पाकिस्‍तानचा कर्णधार मोहम्‍मद हाफिजने तडाखेबाज अर्धशतक झळकावून आव्‍हान कायम ठेवले. ऐन मोक्‍याच्‍या क्षणी हाफिज आणि कामरान अकमलला अशोक डिंडाने बाद केले आणि सामना भारताच्‍या बाजुने झुकला. या दोन विकेट्स टर्निंग पॉईन्‍ट ठरल्‍या. हाफिजने अवघ्‍या 23 चेंडुंमध्‍ये अर्धशतक ठोकले. त्‍याने 26 चेंडुंमध्‍ये 3 षटकार आणि 6 चौकारांसह 55 धावांची स्‍फोट खेळी केली. हाफिज आणि उमर अकमलने आक्रमक फलंदाजी करुन 33 चेंडुंमध्‍ये  62 धावांची भागीदारी केली. अखेर अशोक डिंडाने ही जोडी फोडली. त्‍याने अकमलचा त्रिफळा उडविला. त्‍यापुर्वीच्‍या षटकात भुवनेश्‍वर कुमारने धोकादायक शाहिद आफ्रिदीची विकेट घेतली. तो बाद झाला त्‍यावेळी पाकिस्‍तानला 13 चेंडुंमध्‍ये 30 धावांची गरज होती.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी

Labels:

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पाणीटंचाई निवारणासाठी 25 कोटीचा निधी पालकमंत्री चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

उस्मानाबाद -: राज्यातील टंचाई निवारण कार्यक्रमासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी तसेच काही उपसासिंचन योजनांची थकीत विद्यूत देयके अदा करण्याकरीता राज्य शासनाने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे 125 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून उस्मानाबाद येथील अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. याचबरोबर ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारण उपाय योजनांसाठी जिल्ह्याला 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी हा निधी मिळावा यासाठी विशेष पाठपुरावा  केला होता. यासाठी राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही श्री. चव्हाण यांनी आग्रह धरला होता.
     राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय 27 डिसेंबर रोजी जारी केला असून टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच काही उपसा सिंचन योजनांची थकित विद्यूत देयके भरण्यासाठी  हा 125 कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याचे यात नमूद केले आहे.        
        जिल्ह्यात तसेच उस्मानाबाद शहरातही पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे.  या पार्श्वभुमीवर पाणीपुरवठ्याची निकड भागविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत यापूर्वीही विविध बैठका घेवून पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते तसेच शासन पातळीवरही त्यांनी जिल्ह्यांसाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता. टंचाई परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी निधी प्राप्त झाल्याने या कामांना आता अधिक गती मिळणार आहे.
पिण्याच्या पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात राबविलेल्या तसेच राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरील खर्च भागविण्यासाठी हा 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
        संबंधित टंचाईग्रस्त क्षेत्राची परिस्थिती पाहून तसेच नागरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी प्राप्त होणारी निधीची मागणी लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी हया निधीचा विनियोग करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने यासंदर्भात 27 डिसेंबर रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

Labels:

जलसंपदामंत्र्यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर - राज्याचे जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांनी सहकुटूंब विठ्ठल मंदीराला भेट देवून विठ्ठल-रुक्मीणी चे दर्शन घेतले.यावेळी  विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
      याप्रसंगी मंदीर समितीचे पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक तहसिलदार सचिन डोंगरे, मंदीर समितीचे व्यवस्थापक एस.एस.विभूते आदी मान्यवर उपस्थित होते.                              

Labels:

पालकमंत्री प्रा. ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईची आढावा बैठक संपन्न

सोलापूर  :- जिल्ह्यातील पाणी टंचाई, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबतची आढावा बैठक राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात संपन्न झाली.
    यावेळी माजी उपमुख्यमंत्री आ. विजयसिंह मोहिते पाटील, आ. गणपतराव देशमुख, आ. दिलीप सोपल, आ. भारत भालके. आ. बबनदादा शिंदे, आ. सिद्रमप्पा पाटील, आ. हणुमंत डोळस, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    या बैठकीत जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी ऑक्टोबर 2012 ते जुन 2013 या कालावधीसाठीचा टंचाई निवारणार्थ करावयाच्या नऊ उपाय योजना बाबतचा 74 कोटी 25 लाखांचा आराखडा सादर केला. तसेच जिल्ह्यातील गावनिहाय पाण्याच्या पातळीबाबतही माहिती दिली. यामध्ये सुधारणा सुचविणेबाबत आवाहन करुन सुचविल्यानुसार सुधारणा करण्यात येईल असे सांगितले.
    जिल्ह्यात सद्या 229 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून 242 विहिर / बोअर अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. टँकरद्वारे पाणी पुरवठा करतांना तफावत आढळल्यास पैसे कमी करुन त्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) करावे अशी चर्चा बैठकीत झाली. त्याचप्रमाणे जनावरांच्या छावण्यात बोगस जनावरे आढळल्यास नोटीस देऊन खुलासा मागवावा. तसेच अशा प्रकारचा गैरप्रकार करणा-यांना जरब बसवावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
    जिल्हृयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी 53 कोटी 60 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तालुकानिहाय मजूर उपस्थिती व मागणीनुसार निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी दिनेश भालेदार यांनी दिली.
    या योजनेवर काम करणा-या मजूरांना वेतन वेळेवर मिळत नसल्याबद्दल उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी विचारणा केली याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात यावी तसेच तहसिलदार व गटविकास अधिका-यांनी विशेष लक्ष घालावे अन्यथा यापुढे जबाबदारी निश्चित करुन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मवारे यांनी सांगितले.

Labels:

बचतगटांनी एकत्रितरित्या कर्ज प्रस्ताव सादर करावेत : एस.एल.हरिदास

उस्मानाबाद : बचतगटांना नवनवीन कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होण्यासाठी  एक किंवा अनेक बचतगटांनी एकत्रित येऊन कर्ज प्रकरण प्रस्ताव सादर करावीत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी समितीचे अध्यक्ष एस. एल. हरिदास यांनी गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणेला दिले. 
          येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात आयोजित कार्यकारी समितीच्या आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना त्यांनी दिले. यावेळी प्रकल्प संचालक  डॉ. केशव सांगळे यांच्यासह विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
           जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलाची प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रत्यक्ष गावात जाऊन लाभार्थी, ग्रामसेवक, अभियंते आणि बँक अधिकारी  यांच्या भेटी घेऊन  समन्वयाने घरकुल प्रकरणे मुदतीत निकाली काढावीत, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले.
          हरिदास यांनी यावेळी स्वर्णजयंती स्वरोजगार योजना, इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना (अपूर्ण व मंजूर घरकुल बांधकाम), नोव्हेंबर अखेर झालेला योजनानिहाय खर्च तसेच विभागीय आयुक्त स्तरावरील सुधारित घरकुल प्रतिक्षा यादीस मान्यता देण्यात येणाऱ्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला.             

Labels:

मनोरंजन कार्यक्रम व्यावसायिकांना परवाना आवश्यक

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल / क्लब / परमिटरुम / बिअरबार चालकांनी नवीन वर्षाच्या आगमनाप्रित्यर्थ दि. 31 डिसेंबर 2012 रोजी डिस्कोथेक / कॅब्रे किंवा इतर विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये पोलीस आयुक्त सोलापूर व उर्वरित ग्रामिण भागासाठी जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांच्याकडुन नियमानुसार परवानगी घेऊनच कार्यक्रम आयोजित करण्याचे जिल्हादंडाधिकारी गोकुळ मवारे  यांनी कळविले आहे.
      रंगभूमी  परिनिरीक्षण मंडलाचा दाखला ध्वनीप्रदुषण व अन्य नियमांचे पालन करण्याच्या अटीवर करमणूक कर विभागाकडुन प्रमाणपत्र घ्यावे. सदर प्रमाणपत्र हे मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील नियम 137 व 138 (2) मधील तरतुदी, रंगभूमि परिनिरीक्षण मंडल यांचेकडील 2 जुलै 2005 चे आदेशातील तरतुद व द रुल फॉर लायसेन्सिंग अँड कंट्रोलिंगच्या प्लेसेस ऑफ  अम्युझमेंट 1960 यानुसार परवाने दिले जातात.
      मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील कलम 3(1)(ब) अन्वये ग्राहकांना पुरविल्या जाणा-या खाद्यपदार्थ व मद्यपेयाच्या एकुण रक्कमेच्या 50 टक्के रक्कमेवर सध्या प्रचलित करमणूक शुल्क दराने शुल्क शासन जमा करणे आवश्यक आहे.  अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करणारे चालकाने प्रवेशासाठी विश्चित केलेल्या रकमेची प्रवेश तिकीटे करमणूक कर कार्यालयाकडुन पूर्वमंजूरी घेणे आवश्यक आहे.
         विनापरवाना मनोरंजानाचे कार्य्रकम आयोजित करणा-या चालकाविरुध्द नियमानुसार करमणूक शुल्क वसुल करणे संदर्भात व विनापरवाना कार्यक्रम आयोजित केलेबद्दल कारवाई करणेत येईल.

Labels:

30 डिसेंबरला जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती सभा

सोलापूर :-  जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची आढावा सभा केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 30 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
     या सभेत दि. 1 जून 2012 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे. केंद्र पुरस्कृत योजनांचा माहे नोव्हेंबर 2012 अखेरच्या प्रगतीबाबत आढावा घेणे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ग्रामीण पाणी पुरवठा, स्वजलधारा. ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (एनएसएपी). स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना. इंदिरा आवास योजना. पाणलोट क्षेत्र विकास यंत्रणा, प्रशासन. भुमि अभिलेख्यांचे संगणकीकरण या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

Labels:

इतिहास हा मानवाचा वैश्विक गुरु : राज्यपाल

मुंबई : आजचा वर्तमान हा उद्याचा इतिहास आहे. त्यामुळे भविष्यातील चुका टाळण्यासाठी इतिहासापासून आपण बरेच काही शिकू शकतो. या न्यायाने इतिहास हा मानवाचा वैश्विक गुरु आहे, असे उद्‌गार राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी भारतीय इतिहास परिषदेच्या (दि इंडियन हिस्ट्री काँग्रेस) 73 व्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना काढले.
        मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाने कलिना कॅम्पस् येथे आयोजित केलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आज राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री डी . पी. सावंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळूकर, भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष वाय. सुब्बरायल, मावळते अध्यक्ष डॉ. पी.बी. चौधरी, प्रा. इरफान हबीब, इतिहास संशोधक, इतिहास प्रेमी, विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
       भारताला वैभवशाली इतिहास असून, तो वस्तुनिष्ठ आणि धर्मनिरपेक्ष स्वरुपात लोकांसमोर यावा यासाठी भारतीय इतिहास परिषदेने मोठे योगदान दिले आहे. आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनातूनही विद्यार्थी आणि संशोधकांना भारतीय इतिहासाविषयी बहुमोल माहिती मिळेल, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. इतिहास हा विषय उच्च शिक्षणासाठी निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत या अधिवेशनाला लाभलेली उपस्थिती पाहून आनंद झाला, असे सांगून राज्यपाल म्हणाले, बालवर्गापासूनच विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावायला हवी. विद्यार्थ्यांमधून चारित्र्यसंपन्न नागरिक घडवण्यासाठी देशाचा वैभवशाली इतिहास आणि परंपरा समजावून सांगायला हव्यात. सर्व इतिहास प्रेमींनी पंडित जवाहरलाल नेहरुंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक अवश्य वाचायला हवे. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
    मुंबई विद्यापीठाला तिसऱ्यांदा भारतीय इतिहास परिषदेचे अधिवेशन आयोजित करण्याचा मान मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करुन श्री. राजेश टोपे म्हणाले, या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक, शिक्षक एकत्र येणार असल्यामुळे हे अधिवेशन म्हणजे इतिहासाला नवे आयाम देणारे उत्तम व्यासपीठ आहे. देशापुढे असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी इतिहास माहित असणे गरजेचे आहे. विद्यापीठातून संशोधनास अधिक प्रोत्साहन देण्यासाठी संशोधकांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवरही संशोधन केल्यास देशातील विद्यापीठे जागतिक दर्जाची होण्यासाठी  अशा संशोधनाची मदत होईल, असे श्री. टोपे यांनी सांगितले.
         अधिवेशनासाठी देशभरातून आलेल्या इतिहास संशोधकांचे स्वागत करुन राज्यमंत्री श्री. सावंत म्हणाले, इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यामधील संवाद आहे. आपण जीवनातून इतिहासाला वजा करु शकत नाही. युवापिढीला स्वातंत्र्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच देशाचा खरा इतिहास कळायला हवा.
    तब्बल 32 वर्षांनंतर भारतीय इतिहास परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजन करण्याची संधी मुंबई विद्यापीठाला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन राजन वेळुकर म्हणाले, इतिहासावरील शास्त्रीय लिखाणाला प्रोत्साहन देणे, संबंधित विविध संस्थांना एकत्रित करणे आणि वस्तुनिष्ठ संशोधनाला प्रोत्साहन देणे हे या अधिवेशनाचे उद्दिष्ट आहे. या अधिवेशनात सुमारे 1000 संशोधनपर निबंध सादर होणार आहेत. तसेच इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
       वाय सुब्बरायलू यांनी दक्षिणेतील ‘नाडू’ या उत्तर भारतातील  ‘विषय’ या संज्ञेची व्याप्ती आणि त्यांच्यातील फरक या विषयी सखोल माहिती सांगितली.
          महाराष्ट्रातील कोळी नृत्य, दिंडी, वाघ्यामुरळी, वासुदेव, दशावतारी, लेझीम, ढोल आदी लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या शोभा यात्रेने  या अधिवेशनाची सुरुवात झाली. अधिवेशनाचे उद्घाटनही नगारा आणि घंटा वादनाने करण्यात आले.

Labels:

सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्राप्त होताच स्मारकाच्या जागेची निश्चिती : जयंत पाटील

मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याच्यादृष्टीने जागा निश्चितीसाठी आज दोन ते तीन पर्याय निवडले असून, काही विभागांच्या सर्वेक्षणाच्या अंतिम निष्कर्षानंतर लवकरच ही जागा निश्चित केली जाईल, असे मुंबई शहराचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
     अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याच्यादृष्टीने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  शासनाने समन्वय समितीचे गठन केले आहे. समिती अध्यक्ष म्हणून कामाला गती देण्याच्यादृष्टीने आज श्री. पाटील यांनी स्मारकाच्या जागेच्या निश्चितीसंदर्भात अरबी समुद्रात पाहणी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
     त्यांच्यासमवेत सामान्य प्रशासन विभाग, पर्यावरण विभाग, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशनाग्राफी, नॅशनल इन्वारमेंटल इंजिनिअरिंग इन्स्टिट्युटचे शास्त्रज्ञ, स्मारकाचे मुख्य वास्तु विशारद आदी मान्यवर उपस्थित होते.
     स्मारकाचे काम वेगाने पूर्ण होण्याच्यादृष्टीने केंद्र सरकार तसेच पर्यावरण विभागासह अन्य संबंधित विभागाच्या परवानग्या लवकरच घेतल्या जातील असे सांगून पाटील म्हणाले, स्मारकाची जागा निश्चित करताना त्याचा बेस मजबूत असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काही विभागांना निवड केलेल्या जागांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आपण दिल्या असून, या सर्वेक्षणाच्या अंतिम निष्कर्षानंतर स्मारकाची जागा निश्चित केली जाईल. या स्मारकाच्या कामाला सर्व विभागाच्या समन्वयातून वेग देऊन मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Labels:

पुरस्कार प्राप्त कुस्तीगिरांच्या मानधनाबाबतची वय व उत्पन्नाची अट शिथिल : पद्माकर वळवी

मुंबई -: महाराष्ट्रातील वयोवृध्द खेळाडूंना मानधन देण्याबाबतच्या योजनेसाठी  महाराष्ट्र केसरी व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना यापुढे वयाची व उत्पन्नाची अट लागू होणार नाही, अशी माहिती क्रीडा व युवककल्याण मंत्री पद्माकर वळवी यांनी दिली.
    महाराष्ट्रातील वयोवृध्द महिला किंवा पुरुष खेळाडूंना मानधन देण्याबाबतच्या नियमानुसार अर्जदार महिला किंवा पुरुष खेळाडूंचे वय अर्ज करण्याच्या दिनांकास 50 वर्षापेक्षा जास्त असावे. तसेच त्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 40 हजार रुपयांपेक्षा कमी असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
     हिंद केसरी, रुस्तमे-हिंद, महान भारत व भारत केसरी किताब मिळवणा-या कुस्तीगिरांच्या बाबतीत वयाची व उत्पन्नाची अट यापुर्वीच शिथिल करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र केसरी व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा समावेश नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र केसरी व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या बाबतीतही वयाची व उत्पन्नाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री. वळवी यांनी दिली.
    याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 201212211518079021 असा आहे.

Labels:

जिल्हा परिषदेच्या जुन्या वाहनांचा 9 जानेवारीला जाहीर लिलाव

 उस्मानाबाद -: जिल्हा परिषदेकडील जुन्या वाहनांचे जाहीर लिलाव दिनांक 9 जानेवारी 2013 रोजी सकाळी  11 वाजता जिल्हा परिषद कार्यशाळा, उस्मानाबाद येथे करावयाची आहेत. तसेच त्याच दिवशी अनामत रक्कम सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत रोख स्वरुपात भरुन घेण्यात येईल.
      तरी लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या बोलीदारांनी जिल्हा परिषद कार्यशाळा उस्मानाबाद येथे दिलेल्या तारखेस वेळेवर उपस्थित रहावे, सर्व वाहने जिल्हा परिषद कार्यशाळेत कार्यालयानी वेळेत पहावयास मिळतील. लिलावाच्या अटी व शर्ती कार्यशाळेत नोटीस बोर्डावर लावण्यात आल्या आहेत. तसेच मागणी केल्यास अटी व शर्तीची प्रत विनामुल्य देण्यात येईल. वाहनाचा तपशील- जीप क्रमांक एम एच 25/ ए-392 महिंद्रा अँन्ड महिंद्रा, वाहन खरीदीचे वर्ष- 1999, जीप क्रमांक एम.एच.25/6176 महिंद्रा ॲन्ड महिंद्रा, 2001 आहे.       

माजी सैनिकांच्या पाल्यांना सिक्युरीटी कोर्स बाबत आवाहन  
 उस्मानाबाद -: जिल्हयातील सर्व माजी सैनिक / विधवा व इतर उमेदवारांना सूचित करण्यात  येते की. महासैनिक ट्रेनिंग सेंटर, कोल्हापुर येथे सिक्युरीटी कोर्स दिनांक 12 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2013, 9 फेब्रुवारी  ते 4 मार्च, 9 मार्च, ते  एक एप्रिल, सहा एप्रिल ते 29एप्रिल, 8 जुन  ते एक जुलै या कालावधीत चालणार आहेत. तसेच प्रि रिक्रुटमेंट ट्रेनिंग कोर्स - दिनांक 3 मे ते 1 जुन  या कालावधीत चालणार आहेत. तसेच त्यासाठी फिस अनुक्रमे 4 हजार 800  व 6 हजार रुपये इतकी भरावी लागणार आहे. तरी इच्छुक सर्व माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

घाटेअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाचा सल्ला
उस्मानाबाद -:  कृषी विभागामार्फत राबविण्यात येणा-या पिकावरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत  उस्मानाबाद तालुक्यातील हरभरा पिकाचे सर्वेक्षण केले असता हरभरा या पीकांवर  घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. घाटेअळीच्या नियंत्रसाठी शेतक-यांनी हरभरा 50 टक्के फुलो-यात असताना घाटेअळीच्या नियंत्रणासाठी असाफेट 75 टक्के  1 मी.लीटर पाण्यात तसेच   1 टक्का गूळ मिसळून फवारावे. तसेच प्रती हेक्टरी 50 पक्षीथांबे उभारावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी,उस्मानाबाद  यांनी केले आहे.

अनुकंपा नोकरी यादीबाबत 31 डिसेंबरपर्यत आक्षेप पाठवा 
उस्मानाबाद -: अनुकंपा तत्वावर नोव्हेंबर 2012 अखेर जेष्ठता यादी जिल्हा सुचना व विज्ञान केंद्र ( एन. आय. सी. ) उस्मानाबाद या http:// osmanabad.nic.in /newsite/ govdepartments/Z.P.htm या संकेतस्थळावर व जिल्हा परिषेद नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
      कोणाचे कांही आक्षेप असतील त्यांनी  दिनांक 31 डिसेंबर 2012 पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह सामान्य प्रशासन विभाग येथे सादर करवेत. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. असे मुख्य नियंत्रण माहिती व प्रसिध्दी कक्ष तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) जिल्हा परिषद,  उस्मानाबाद यांनी कळविले आहे.   

Labels:

निवडून आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या जातपडताळणीबाबत 6 जानेवारीला कॅम्प

उस्मानाबाद -: ग्राम पंचायत निवडणूक सन 2012-13 निवडून आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या जातीचा दावा पडताळणी बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हास्तरीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने स्विकारलेले आहेत. प्राप्त प्रस्तावापैकी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये जे मागासवर्गीय उमेदवार निवडणूक लढवून विजयी झाले आहेत अशा प्रस्तावाची छाननी करुन ज्या प्रस्तावामध्ये त्रुटी दर्शनास आलेल्या आहेत,अशा उमेदवारांनी त्रुटी पूर्तता करणे बाबतचे त्रुटी पत्र त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदार यांचेमार्फत उमेदवारास पोंहच करण्यासाठी देण्यात आलेली आहेत. अशा सर्व संबंधित उमेदवारांनी दिनांक 6 जानेवारी 2013 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,प्रशासकीय इमारत ,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन त्रुटीची पुर्तता करण्यात यावी.  या दिवशी रविवारची साप्ताहिक सुट्टी असली तरी त्रुटी पुर्तता करणे बाबत कँम्प आयोजित करण्यात आलेला आहे. तेंव्हा संबंधित उमेदवारांनी याची नोंद घेऊन त्रूटी पूर्तता शिबीरास हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.               

Labels:

पालकमंत्री मधुकरराव चव्हाण जिल्हा दौ-यावर

 उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून  त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
        शनिवार, दि.29 डिसेंबर रोजी  दुपारी 3-30 वा.  सोलापूरहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव आणि नंतर सोईनूसार अणदूरकडे प्रयाण व मुक्काम.
         रविवार,दि. 30 रोजी  अणदूर येथे राखीव तसेच रात्री 9 वाजता तेथील श्रीनिळकंठेश्वर मठ येथील पुराण महामंगल व षठस्थळ पीठारोहण धर्मसभेस व तत्पुर्वी आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.
     सोमवार, दि.31 रोजी सकाळी 10 वा. अणदूर येथून बेंबळी ता.उस्मानाबादकडे प्रयाण. स.11 वा.बेंबळी येथे आगमन व शासकीय गोदाम,रस्ता,शेतरस्ता व संरक्षक भिंतींचा भूमीपूजन कार्यक्रम व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर सोईनूसार अणदूरकडे प्रयाण. सायंकाळी 6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.

Labels:

गिधाडे आणि गिधाडे


Labels:

सारा सार


Labels:

Thursday, 27 December 2012

सात बँकाना माविमचा बँकर्स इन्सेन्टीव्ह पुरस्कार प्रदान

उस्मानाबाद -: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सन 2011 -12 चे जिल्हा व तालुका स्तरीय बँकर्स इन्सेन्टीव्ह पुरस्काराचे वितरण आज येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा ग्राम स्वच्छता अभियानाचे जिल्हा समन्वयक डॉ.आर.आर.चंदेल, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक तथा बँकर्स इन्सेंटिव्हचे विशेष समिती सदस्य सी.डी.देशपांडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यु.पी. बिरादार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.केशव सांगळे, भारतीय स्टेट बँक आरसीटीचे संचालक  युवराज  गवळी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी तथा बँकर्स इन्सेंटिव्ह विशेष समितीचे  सदस्य सचिव एम.ए.भादुले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
         यावेळी  जिल्हास्तीय -1 व तालुकास्तीय -6 अशा 7 बँकेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार–भारतीय स्टेट बँक शाखा-पंरडा यांना तर तालुकास्तीय पुरस्कार भारतीय स्टेट बँक, शाखा-उस्मानाबाद, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा-तामलवाडी, ता. तुळजापूर, भारतीय स्टेट बँक ,शाखा-आष्टाकासार,ता.लोहारा, महाराष्ट्र ग्रामीण बँक,शाखा-गुंजोटी ता.उमरगा, भारतीय स्टेट बँक शाखा-सोनारी ता. परंडा, महाराष्ट्र गा्रमीण बँक शाखा-शिराढोण ता. कळंब या संबंधित बँकेच्या शाखा व्यवस्थापक व प्रतिनिधींनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्विकारला. बँकांनी केलेल्या बचतगटांना वाटप केलेल्या कर्जाच्या अनुषंगाने बँकाचे मनोधर्य उंचाविण्यासाठी असे  पुरस्कार देण्यात येतात.
        यावेळी देशपांडे यांनी महिलांच्या अडचणी  सोडविण्यासाठी व त्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी बचतगटांना वार ठरवून देणे व त्यांची प्रकरणी तातडीने निकाली काढण्याची सूचना केली. तसेच त्यांनी चालू आर्थीक वर्षातील वार्षीक उदिष्ट पूर्तीसाठीही प्रयत्न करावेत,असेही त्यांनी सांगितले.
श्री.चंदेल यांनी, बँका चांगले काम करतात म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो ही बाब आनंदनीय आहे, असे सांगितले. बँकानी महिला बचतगटातील प्रलंबित कर्ज प्रकरणे समन्वयाने सोडवावीत. महिला बचतगटांनी बँकांनी काढलेल्या त्रुटीबाबत सातत्याने पाठपुरावा करुन कर्ज प्रकरणे मंजूर घ्यावीत  आणि बचतगटांचया माध्यमातून  आर्थिक उन्नती साधावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.  यावेळी  डॉ. सांगळे, गवळी, बिरादार यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. 
       उस्मानाबाद लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती चारशिला पाटील, उमरगा (कदेर)  साधन केंद्राच्या अध्यक्षा वंदना पाटील,साधन केंद्र ढोकीच्या अधक्षा श्रीमती चव्हाण आणि परंडा येथील साधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती मिरा शहाजी कोळी यांनी मनोगत मांडले.
         कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भादूले यांनी  तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमातील मायक्रो फायनान्स या घटकातंर्गत ग्रामीण महिला बचत गटांना विविध उद्योग व्यवसाय व शेती विकासाकरिता जिल्ह्यातील बँकानी महिला बचतगटांना कर्जाच्या रुपात अर्थ सहाय करुन लघु उद्योगास चालना दिली. गेल्यावर्षी 1 कोटी 83 लाख रुपये रक्क्म बँक कर्जाच्या माध्यमातून प्राप्त झाली त्याचाच एक भाग म्हणून 2011-12 या वर्षात जवळपास 871 महिलांनी शेती व बिगर शेतीवर आधिरित उद्योग सुरु केले. या पुढील काळातही बँकाच्या सहाय्याची आम्हाला आवश्यकता असून त्यांनी जास्तीत जास्त बचतगटांना अर्थसहाय उपलब्ध करुन दिल्यास  महिला सक्षमीकरणास मदत होईल, असे सांगितले. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहायक समन्वय अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास निर्मल ग्रामअभियान कक्षाचे संवादतज्ज्ञ रमाकांत गायकवाड, मारुती राऊत, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, बचतगटातील  महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Labels:

गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य दया जिल्हाधिकारी यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश

उस्मानाबाद -: पाणी सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी  संबधित यंत्रणेनी  आतापासूनच धरण, तलावात साठलेला गाळ काढण्याच्या कामास  प्राधान्य दयावे, तातडीने विहीरीचे पूर्नभरणाची कामे हाती घेवून वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी पाणीटंचाईचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक  व्ही. डी. लोखंडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोटेचा व संबंधित समितीचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
        यंदा कमी पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शिवाय धरण, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पडलेल्या पावसाचे पाणी वाहून गेले. नदी, तलाव, नाले, विहीरी कोरडे पडल्याने दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली. या संकटाचा सामना करण्यासाठी शिघ्रगतीने उपाय योजना करावी. शेतक-यांना गाळ घेवून जाण्यासाठी गावात दवंडी दयावी. आत्मा या योजनेतून ज्या शेतक-यांची  प्रकरणे प्राप्त होतील, त्यांना प्रचलित नियमानुसार मंजूरी देवून दुष्काळसदष्य परिस्थतीवर मात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. कृषी विस्ताराला प्रसार माध्यमांचे सहाय घेवून आकाशवाणी, कृषी विभाग व प्रसार माध्यमांच्या  सहकार्याने  कृषी योजना शेतक-यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे, हे नमूद करण्यात आले.

Labels: