Friday, 31 May 2024

सेवानिवृत्ती निमित्त डाॅ. अरविंद बिराजदार यांचा सपत्नीक सत्कार

सेवानिवृत्ती निमित्त डाॅ. अरविंद बिराजदार यांचा सपत्नीक सत्कार         

 मुरुम, दि.३१

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्ञ विषयाचे प्राध्यापक डाॅ. अरविंद आण्णाराव बिराजदार व सौ. मलम्मा अरविंद बिराजदार यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्त  सत्कार सोहळा श्री माधवराव पाटील महा विद्यालयात शुक्रवार(ता.३१) रोजी आयोजित करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डाॅ. अरविंद बिराजदार यांचा सपत्नीक  फेटा,शाल, पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आली.

प्रारंभी कै.माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.यावेळी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे डाॅ. रवी आळंगे, डाॅ.अविनाश मुळे, डाॅ.सुजित मटकरी,डाॅ.सोमनाथ बिराजदार, डाॅ. अविनाश बिराजदार, डाॅ.सुभाष हुलपल्ले, डाॅ. भिलशिंग जाधव,प्रा गोपाळ कुलकर्णी, प्रा राजीव शाळु,सेवानिवृत शिक्षक ज्ञानेश्र्वर वाघमारे, सेवानिवृत प्रा.राजेद्र वाकडे,सेवानिवृत प्रा.राजेश दलाल व श्री माधवराव पाटील महाविद्यालय,प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय ,मुरुमचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मित्र परिवार  बहुसंख्येने उपस्थित होते.

Labels:

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलने यंदाही शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलने यंदाही शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के                

 मुरूम, ता. उमरगा, दि. ३० 

 येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचा इयत्ता शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यंदाही या शाळेने शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा  कायम राखली आहे.

 इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत सर्वच विद्यार्थी उतीर्ण झाले असून यामध्ये अतिफ अबीद पटेल ९१ टक्के (प्रथम), प्रणव राजेंद्र गायकवाड ९०.८० टक्के (द्वितीय), सचिन बीभिशन गडकर ८८.८० टक्के (तृतीय) क्रमांक घेवून उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, सर्व संचालक मंडळ, प्रशालेच्या  मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, सच्चीदानंद अंबर, प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, धनराज हाळळे, जगदीश सुरवसे सह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून विशेष अभिनंदन करून कौतुक करण्यात आले.                                   

फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलचे शालांत परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

Labels:

Wednesday, 29 May 2024

प्रणाली शिंदे यांचे दहावी परिक्षेत यश

प्रणाली शिंदे यांचे दहावी परिक्षेत यश 

वागदरी, दि.२९

सिंदगाव तां.दुळजापूर‌ येथील प्रणाली शेषराव शिंदे यांनी इ.१० वी बोर्ड परिक्षेत ८८ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
  
सिंदगाव येथील प्रणाली शेषराव शिंदे यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची वडील रोजगारासाठी गाव सोडून हडपसर पुणे या ठिकाणी रोजंदारीवर काम करतात.घरभाडे कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांच्या शिक्षणाचा खर्च याचा ताळमेळ घातल कुटुंबाचा गाडा हाकतात.असा परिस्थितीतत प्रणाली ही रयत शिक्षण संस्था संचलित साधना हायस्कूल हडपसर पुणे येथे शिक्षण घेत होती.मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० वी बोर्ड परिक्षेत त्यांनी ८८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.त्यांनी मिळविलेल्या  यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Labels:

Tuesday, 28 May 2024

नंदगाव ग्रामपंचायतीच्या गैरव्यहाराच्या चौकशीत सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल बिडीओने जिल्हा परिषदेस केले सादर

नंदगाव  ग्रामपंचायतीच्या गैरव्यहाराच्या चौकशीत
सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल बिडीओने धाराशिव जिल्हा परिषदेस केले सादर 

नळदुर्ग ,दि. २८ शिवाजी नाईक

 नंदगाव ता तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्या गैरव्यहाराची चौकशी  करुन पंचायत समितीचे गटविकास आधिकारी अमोल ताकभाते यांनी  प्र. सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याचा अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी आधिकारी यांच्याकडे पाठविला आहे. माञ याप्रकरणी आठवडा उलटूनही प्रशासनाने दोषीविरुध्द  कांहीच कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थातुन जिल्हा परिषदेच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केले जात आहे.


15 वा वित्त आयोग व ग्रामनिधी मधील कामे न करता परस्पर बिल उचलले बाबत व चौकशी असमाधानकारक झाल्याने दि.16 एप्रिल रोजी सचिन कोरे, सागर चौगुले, मल्लिनाथ गुड्डे, विश्वजीत घंटे, रहीम शेख, हिरालाल वाले, सतीश काटे, श्रीशैल कामशेट्टी आदीनी आक्षेप  घेऊन सदर प्रकरणात फेर चौकशी करण्याची मागणी केली.  त्यानुसार तुळजापूर प.स. गटविकास अधिकारी यानी दि.21 मे रोजी धाराशिव जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना  अहवाल देऊन विस्तार अधिकारी  ए.पी. काळे यांना फेर चौकशी करण्याबाबत नियुक्त् केल्याचे सांगून  नंदगाव ग्रामपंचयायत गैरप्रकाराची  चौकशी अहवालानुसार ग्रामपंचायतने मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट बेंच बसविणे, डस्टबिन खरेदी करणे, शौचालय युनिट खरेदी, शाळा साहित्य खरेदी, फँगींग मशीन खरेदी करणे इत्यादी साहित्य दर पत्रक व प्रमाणका आधारे खरेदी केले आहे. वास्तविक महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 व शासन मार्गदर्शक सूचनेनुसार कोणतेही साहित्य खरेदी करण्यापूर्वी ई. निविदा अथवा जाहिरात वर्तमानपत्रात देऊन पुरवठा दराचे दर पत्रक घेऊन त्याचा तुलनात्मक तक्ता तयार करून तदनंतर कमी दर देणाऱ्या पुरवठादारास साहित्य पुरवठा आदेश देणे आवश्यक होते. 

तथापी प्रभारी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी अशी कार्यवाही केलेली नाही. फक्त तीन पुरवठा धारकाचे दरपत्रक घेतले असल्याचे दर्शवून प्रमाणका आधारे खरेदी करून अनियमितता केल्याचे दिसून येते. तसेच प्र.सरपंच यांनी पार्श्व इंटरप्राईजेस सोलापूर यांच्याकडून गावातील होणाऱ्या नुकसान दुरुस्तीसाठी रुपये 5 लाख 62 हजार 500 रूपये. अनामत घेतले. त्यांना रक्कम रुपये 4 लाख 60 हजार रूपये परत केल्याचे दिसून येते. उर्वरित रक्कम रुपये 1 लाख 02 हजार रूपये ग्रामपंचायतने ठेवले आहे. वास्तवात पार्श्व इंटरप्राईजेस सोलापूर यांचे काम पूर्ण झाल्यानंतर सदरील कंत्राटदाराकडून  खोदकाम करताना झालेल्या नुकसानीसाठी रक्कम सक्षम प्राधिकरणाकडून निश्चित करून व ती नुकसानीचे काम पूर्ण करून उर्वरित रक्कम संबंधितास परत करणे आवश्यक होते. तथापि प्रभारी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तशी कोणतीच कार्यवाही केलेली दिसून येत नाही.

 तसेच पार्श्व इंटरप्राईजेस कडून अनामत घेतलेली रक्कम ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामासाठी खर्च करून अनियमितता केली असल्याचे दिसून येते. सबब  उक्त दोन मुद्द्याच्या अनुषंगाने सरपंच व ग्रामसेवक दोषी असल्याबाबतचा अहवाल पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी आधिकारी यांच्याकडे दि.२१ मे रोजी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान चौकशी अहवाल समाधानकारक न झाल्याने त्यावर संबंधितांनी हरकत घेऊन फेरचौकशीची मागणी करत नंदगांव ग्रामपंचायत मधील 13 लाख 60 हजार रूपयेचा प्र.सरपंच व ग्रामसेवक यांनी गावातील विविध 15 वा वित्त   आयोग व ग्रामनिधी मधील कामे न करता संबंधितांना बिले   आदा केले असुन ग्रामनिधीतुन 5 लाख 62 हजार रूपये आनामत उचलले असल्याचे सांगुन या प्रकरणी पं.स. गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती. याबाबत चौकशी झाली असता चुकीचा अहवाल देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न  विस्तार अधिकारी यांनी केले असल्याचे ग्रामस्थानी तक्रार करुन  संबंधित दोषी विरूध्द  कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या घटनेला 2 आठवडे होत आले. या प्रकरणी अद्यापर्यंत कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थातुन आश्चर्य व्यक्त  केले जात आहे. याप्रकरणी नंदगाव पंचक्रोशित ग्रामपंचायत व प्रशासनाबद्दल चर्चा रंगली आहे.

Labels:

डॉ आंबेडकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के : सर्व विद्यार्थी मेरीट मध्ये उत्तिर्ण

डॉ आंबेडकर इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्गचा निकाल शंभर टक्के : सर्व विद्यार्थी मेरीट मध्ये उत्तिर्ण

वागदरी (एस.के.गायकवाड):

सम्यक सेवाभावी संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर संचलित डॉ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नळदुर्गचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेची विद्यार्थिनी कु श्रध्दा संजय चिमणे यांनी ९८ टक्के ‌गुण घेऊन शाळेतच नव्हे तर नळदुर्ग केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला असून सर्वच विद्यार्थ्यी मेरीट मध्ये उत्तिर्ण होऊन शाळेचे नाव लौकीक केले आहे.
  

  मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१० बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून नळदुर्ग येथील डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे.या शाळेतून एकूण २४ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. २४ पैकी २४ विद्यार्थी मेरीटचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असून याच शाळेतील विद्यार्थ्यांनी  श्रध्दा  चिमणे यांनी ९८ ‌टक्के गुण घेऊन  केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र आभिनंदन होत असून शाळेचे संस्थापक अध्यक्ष मारुती खारवे यानी  मुख्याध्यापक, शिक्षक आणि उत्तिर्ण विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

Labels:

Monday, 27 May 2024

नंदगाव ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे न करता परस्पर लाखो रुपयाचे बिले उचलुन अपहार केल्याची तक्रार

नळदुर्ग, दि. २७

नंदगाव ता. तुळजापूर  येथील  ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग व ग्रामनिधी खर्चुन विकास कामे न करता परस्पर लाखो रुपयाचे बिले उचलुन अपहार  केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य शशिकांंत नागिले व ग्रामस्थानी  धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी व संबंधिताना देवुन अडीच महिने उलटून गेले. माञ याप्रकरणी अद्याप पर्यंत वरिष्ठानी कारवाई  केली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 तुळजापूर तालुक्यातील नंदगाव  ग्रामपंचायत मध्ये भष्ट कारभार झालेला आहे. 15 व्या वित आयोग व ग्रामनिधी या निधीमधून गावामध्ये कामे न करताच परस्पर प्रभारी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी बील उचलले असल्याचे नमुद करुन पुढे म्हटले आहे की,  प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेमधील साहित्य देणे , टीसीएल खरेदी करणे , फॉगिंग साहित्य खरेदी करणे, कॅम्पुटर सेट आणि इन्व्हर्टर खरेदी करणे,  शौचालय बांधणे व सुशोभीकरण करणे , डस्टबीन खरेदी करणे,  आदी कामे व साहित्य न पुरवठा करता व साहित्य  आणताच व बांधकाम न करताच  संबंधितांना बिले अदा केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. 

ग्रामसेवक व प्रभारी सरपंच याना संबंधितानीथ विचारले असता उडवा उडवीची उत्तर देवुन काम करायच्या आधी बिले उचलण्याची परवानगी असल्याचे सांगितात.   अनेक कामे झाले नाहीत. याची देखील आमच्याकडे सबळ पुरावे आहेत .अगदी लेखी स्वरूपात व व्हिडिओ स्वरूपात असल्याचे म्हटले  आहे. तरी याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक व प्रभारी सरपंचावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी अमोल ताकभाते यांच्याशी  संपर्क साधले असता नंदगाव ग्रामपंचायतची चौकशी करुन पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठाकडे पाठवले आहे.

वागदरी ग्रा.प.च्या वतीने इ.१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

वागदरी ग्रा.प.च्या वतीने इ.१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार 

वागदरी(एस.के.गायकवाड) :

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील 
इ.१२ वी बोर्ड परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला .
  मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या 
इ,१२ बोर्ड परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या‌ बोर्ड परिक्षेत वागदरी येथील विविध ठिकाणी काॅलेज मध्ये शिकत असलेले एकुण चौदा विद्यार्थी गुणवत्तापुर्ण मार्क मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.असा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी म्हणून वागदरी ग्रामपंचायतीच्या व समस्त ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर, उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
  या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते तथा सेवा निवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.
 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन माजी उपसरपंच दत्ता सुरवसे यानी केले.यावेळी ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार,अंकुल वाघमारे, गुणाबाई बनसोडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामसिंग परिहार, रामचंद्र यादव,शंकर धुमाळ, धनाजी बिराजदार, नामदेव यादव, ग्रामसेवक एम.एम.तांबोळी संगणक ऑपरेटर अमित लोंढे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

नळदुर्ग येथील जनसेवा बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नळदुर्ग येथील जनसेवा बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कार 

वागदरी(एस.के.गायकवाड):
जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर व पैलवान रेवप्पा सोनकांबळे क्रीडा प्रतिष्ठान नळदुर्ग-पुणे यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित इ.१२ वी उत्तीर्ण व पदवी शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुणे येथे यथोचित सत्कार करण्यात आला.
 
 तथागत भगवान गौतम बुद्ध यांची १२८६ वी  जयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त इ.१२ वी उत्तीर्ण व पदवी  पदव्युत्तर  शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा  सत्कार जनसेवा बहुउद्देशीय शिक्षण संस्था व पैलवान रेवाप्पा सोनकांबळे क्रीडा प्रतिष्ठान नळदुर्ग-पुणे याच्या संयुक्त विद्यमाने टिंगरे नगर पुणे येथील संघमित्रा प्रेरणा बुद्ध विहार बरमासेल येथे करण्यात आला. 
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा गोजरताई जेठीथोर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गचे सचिव मारुती बनसोडे हे होते.


  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब बनसोडे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी कु.ऋतुजा संजय पवार,आराशीन शेख,सुजाता देविदास जाधव,पायल भारत जाधव,सागर जेठीथोर ,सुजीत विजय वंजारी ,ओम शालीक राठोड,आम्रपाली फुलमली,अश्विनी गिरी,अक्षदा देवता चलवादी, कावेरी एलप्पा चलवादी ,सोनाली चलवादी,भरती पवार,ऋतुजा पवार ,सुजय भिंगारदिवे,सागर निसर्गने,राजन निसर्गने,जानवी  फुलमली,जणू फुलमली,गोरसे  श्रीकांत,सिद्धांत सुखे,आदी विद्यार्थ्यांचा पुस्तक, वही व पेन देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा.आर.आर.सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वराज्य सोनकांबळे यांनी केले.
 यावेळी नवाडे सर ,सुरेखा विजय वंजारी (अंगणवाडी सेविका व आदर्श किशोरी पुरस्कार प्राप्त),फुलमली इंदूबाई,अरुणा कांगडे ,भिंगारदिवेबाई आदी उपास्थित होते.

Labels:

४१ वर्षानंतर झाले मनोमिलन, उत्साहात साजरा केला स्नेह मेळावा

४१ वर्षानंतर झाले मनोमिलन, उत्साहात साजरा केला स्नेह मेळावा                         

मुरूम, ता. उमरगा, ता. २७  

येथील ज्ञानदान शिक्षण प्रसारक संस्था संचलित ज्ञानदान विद्यालयाच्या १९८३-८४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा ४१ वर्षानंतर एकत्र येऊन आयोजित स्नेहमेळावा रविवार रोजी श्रीराम मंगल कार्यालयात पार पडला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एन. आय. करपे होते. प्रमुख अतिथी  ज्ञानदान संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर मुदकन्ना होते. यावेळी संचालक सिद्राम हुळमुजगे, काशिनाथ मुदकन्ना, रवी बदोले  आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. 

या कालखंडात मृत्यु पावलेले गुरुवर्य व वर्गमित्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी गुरुवर्य एन. आय. करपे, एन. बी. हावळे, एस. बी. माने, ए. के. शेख, एम. पी. लूल्ले, ए. बी. कुलकर्णी, कार्यालयीन कर्मचारी अमीन कांबळे, शंताप्पा कामशेट्टी आदींचा माजी विद्यार्थ्यांकडून यथोचित सत्कार करण्यात आला. दिलीप मुदकण्णा, धनराज शिंदे, सुभाष गवई, संजीव शिंदे, मारुती मडोळे, राजू शिंदे, शंकर मोरे, मधुकर वाकळे, फुलचंद भालेराव, शाहूराज जगताप, दिपक भाट, इसाक पटेल, वैजीनाथ पांढरे, बसवराज मुदकण्णा आदींनी पुढाकार घेतला.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगशिक्षक नागनाथ बदोले यांनी तर सूत्रसंचालन  दत्ता इंगळे , आभार शकील शेख यांनी मानले.                    

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा ज्ञानदान विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याप्रसंगी मान्यवरांसोबत माजी विद्यार्थी

Labels:

Friday, 24 May 2024

वागदरी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

वागदरी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

वागदरी, दि. २४ एस.के.गायकवाड

वागदरी ता.तुळजापूर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी,पंचशील बौद्ध विहार समिती आणि समस्त बौध्द बांधवांच्या वतीने वागदरी ता.तुळजापूर येथे दि.२३ मे २०२४ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत.प्रारंभी सकाळी ठिक ८.३० वा.दरम्यान जेष्ठ कार्यकर्ते मोहन वाघमारे, युवा कार्यकर्ते उत्तम गायकवाड (शिरवळ ता.अक्कलकोट), सामाजिक कार्यकर्ते रमेश जेटीथोर माजी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव  डॉ.बाबासाहेब     आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन धाराशिव कृषीविकास प्रोड्युशर कंपनी लि.वागदरी (नळदुर्ग) च्या मुख्य प्रवर्तक तथा सामाजिक कार्यकर्त्या शिक्षाबाई रमेश जेटीथोर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.


  तर सायंकाळी ठिक ७.३० वा.दरम्यान तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीचे अध्यक्ष संदीपान वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सामुदायिकरित्या बुद्ध वंदना,धम्मदेशना व इ.१२ वी बोर्ड परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सुरवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपान वाघमारे, पंचशील बुध्द विहार समितीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, जेष्ठ कार्यकर्ते उत्तम झेंडारे, सामाजिक कार्यकर्ते रमेश जेटीथोर आदींच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन सामाजिक कार्यकर्त्या शिक्षाबाई रमेश जेटीथोर यांच्या हस्ते गावातील इ.१२ वी बोर्ड परीक्षेत 
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन जयंती उत्सव कमिटीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संघमित्रा अशोक गायकवाड यांचे प्रभावशाली भाषण झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिक्षाबाई जेटीथोर म्हणाल्या की, तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपली सर्वांगीण प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.के. गायकवाड यांनी केले तर आभार  महादेव वाघमारे यांनी केले.


यावेळी अनिल वाघमारे, वाल्मिक वाघमारे, शिवाजी वाघमारे, दत्तू नाना वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, हणमंत वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, सहादेव वाघमारे, सुर्यकांत वाघमारे, रमेश वाघमारे, गुरूनाथ वाघमारे, अण्णासाहेब वाघमारे, नितीन बनसोडे, दिपक वाघमारे, आप्पा भंडारे,माजी उपसरपंच कविता गायकवाड, गीताबाई झेंडारे, श्रीदेवी वाघमारे, ठकुबाई वाघमारे, जिजाबाई वाघमारे, वंदना वाघमारे,उज्वला वाघमारे, कमळाबाई वाघमारे, शकुंतलाबाई वाघमारे, कमलबाई धाडवे,स्वाती गायवाकड सह महिला,ग्रामस्थ युवा कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Labels:

छत्रपती संभाजीराजे ग्रुपचा अनोखा उपक्रम ; मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचा देखावा

छत्रपती संभाजीराजे ग्रुपचा अनोखा उपक्रम ; मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचा देखावा 

  मुरुम, ता. उमरगा,  दि. २४ 

 छत्रपती संभाजी महाराजांच्या मुर्तीची मुरुम शहरातून गुरुवारी   रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण ठरले ते शिवकालीन मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषा करुन अनेक प्रकारचे खेळ सादर करण्यात आले. यात तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, अग्नीचक्र अशा अनेक शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करून शिवभक्तांची नागरिकांची मने जिंकली. 

महाराष्ट्रातील शिवकालीन युद्ध कला जगभर प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते. याच मर्दानी खेळांची प्रदर्शन देखाव्याच्या माध्यमातून शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने छत्रपती शंभूराजांच्या जयंती निमित्त मिरवणुकी दरम्यान शहरातील मिरवणूक मार्गावरील सर्वच चौकात आयोजित करून शहरवासीयांचे मने जिंकली. शिवरायांनी स्वराज्य बांधणीत गनिमी कावा आणि मर्दानी युद्ध कलेवर आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केले. याच युद्ध कलेच्या जोरावर शत्रूंना गुडघे टेकायला भाग पाडले. मुलगा चालायला लागला की युद्धकलेच शिक्षण देण्यास सुरुवात होत असे. पुरुषांप्रमाणेच महिलाही युद्धकला कौशल्ये आत्मसात करत असतं. स्वराज्यातील अनेक शूरवीरांनी रणांगण गाजवून स्वराज्याचे रक्षण केले. कालांतराने ही युद्ध कला मर्दानी खेळांच्या रूपात पुढे आली आणि याच कलेचा वारसा जपण्याच्या प्रामाणिक हेतूने छत्रपती संभाजी राजे ग्रुपच्या वतीने शंभूराजांच्या जयंती निमित्त मिरवणुकीत कराड येथील हिंदुतेज शिवकालीन दांडपट्टा आखाड्याच्या कलाकारांनी मुख्य प्रशिक्षक अभिजीत गिरी नेतृत्वात मर्दानी कलेच्या खेळांचे देखाव्याच्या स्वरूपात आयोजन केले. 

दरम्यान मिरवणुकीत पुरुषांबरोबर तरुणींनीही या मर्दानी खेळात सहभाग नोंदवला. अगदी नऊवारी साडी नेसून कपाळावर चंद्रकोर लावून तरुणी या खेळांमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे होत्या. विशेष म्हणजे हातात काठी, ढाल, तलवार असे एखादे शस्त्र घेतले की जणू काही त्यांच्या अंगातील रक्तच या ठिकाणी सळसळत होते, इतक्या सुंदर व अप्रतिम मर्दानी कलेचे त्यांनी सादरीकरण केले. मिरवणूकीची सुरुवात मुरूम शहरातील छत्रपती संभाजीनगर येथून झाली. शहर प्रदक्षिणा पुर्ण करुन पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे मिरवणूकीची सांगता झाली. शिवशंभूच्या नामाचा जयघोषाने आसमंत दुमदुमला या मिरवणूकीत लहान मुले, मुली, गावातील शिवभक्त डोक्यावर भगवे फेटे बांधुन मिरवणूकीत सहभागी झाले होते. 

यावेळी डिजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण मुरुम शहर शिवमय झाले होते. शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मुरुम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे व पवनकुमार इंगळे, यांच्या  मार्गदर्शनाखाली पांडुरंग पवार, मिलिंद साकंळे, रमांकात परीट, अजय माळी, बळीराम लोंढे यांच्यासह इतर पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.    

        फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचा देखावा व विविध कलाप्रकार सादर करताना शिवभक्त

Labels:

Saturday, 18 May 2024

श्रीमंत जानोजीराजे भोसले यांची 252 वी पुण्यतिथी साजरी

 
श्रीमंत जानोजीराजे भोसले यांची 252 वी पुण्यतिथी  साजरी 

नळदुर्ग, दि.१८

तुळजापूर  तालुक्यातील येडोळा येथे , ऐतिहासिक वारसा असलेले , ठिकाण. सेना साहेब सुभा सरदार नागपूरकर श्रीमंत जानोजीराजे भोसले यांची 252 वी पुण्यतिथी  साजरी करण्यात आली व समाधी पूजन करून  अभिवादन करण्यात आले.

 
यावेळी येडोळा गांवचे जेष्ठ माजी पोलीस पाटील श्री शाहूराज पाटील, युवा उदयोजक राजकुमार जाधव ,  राजेंद्र जाधव मेजर शिवसेना उ. बा. ठा.  तालुकाप्रमुख ग्राहक कक्ष तुळजापूर , रवि पाटील , राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुका सरचिटणीस तुळजापूर , चेतन जाधव दिगंबर पाटील  ग्रा. प सदस्य  , पांडुरंग जाधव , रामचंद्र जाधव ,धोंडबा केदार , नवनाथ जाधव भा. ज. पा. उपाध्यक्ष , वैजनाथ जाधव , राष्ट्रवादी युवा  काँग्रेस  शरदचंद्र पवार युवा कार्यकर्ते गोवर्धन लोंढे ,  भास्कर शित्रे , दत्तात्रय जाधव , प्रवीण कांबळेसह  ग्रामस्थ, शिवभक्त  व इतिहास प्रेमी नागरिक 
उपस्थिती होते.

Labels:

Friday, 17 May 2024

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा तुळजापूर येथे सत्कार

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा तुळजापूर येथे सत्कार 

वागदरी , दि.१७  , एस.के.गायकवाड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांचा तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

  दि.१६ मे २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे व त्यांच्या पत्नी सौ.वनिता वसंतराव मुंडे हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले असता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
 
याप्रसंगी पत्रकार संघाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे व  सामाजिक कार्यकर्त्या अन्नपुर्णा मोरे यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची प्रतिमा, कवड्याची माळ,शाल, पुष्पहार देवुन यथोचित त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
   
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व सूत्रसंचलन पत्रकार संघाचे मंत्रालयीन प्रतिनिधी अहमद शेख यांनी केले तर आभार  पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे यांनी केले.आपल्या आभार प्रदर्शनपर भाषणात बोलताना अरूण लोखंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे हे महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचे प्रेरणा स्थान असून विशेषतहा ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांनाची त्यांना जाणीव आहे.त्यामुळे ते पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करतात.
   यावेळी जेष्ठ पत्रकार इरफान काझी, आप्पा भिसे,राम कांबळे,अक्षय कांबळे,बालाजी घोटमुकले,सह पत्रकार उपस्थित होते.

Labels:

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त "महाकाल" देखावा, भव्यदिव्य मिरवणूक संपन्न


महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त "महाकाल" देखावा, भव्यदिव्य मिरवणूक संपन्न


 मुरूम दि.१७:  प्रा.डाॅ.सुधीर पंचगल्ले

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मुरूम शहरातील महात्मा बसवेश्वर युवक मंडळाच्या वतीने दि.१० मे रोजी मुरूम शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात बसवेश्वरांचे पूर्णाकृती पुतळ्याचे स्थापना करण्यात आले होते, 

दि.१६ मे वार गुरुवार रोजी शहरातील महात्मा बसवेश्वर चौक,साठे चौक,अशोक चौक,टिळक चौक,किसान चौक,सुभाष चौक,गांधी चौक,हनुमान चौक मार्गे "महाकाल देखावा" सादरीकरण करीत भव्यदिव्य मिरवणूक सोहळयाने सांगता संपन्न झाले. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष दत्ता हुळमुजगे, नंदकुमार उपासे,शरद स्वामी,मनोज स्वामी,ओमकार पाटील आदींच्या हस्ते पूजन संपन्न झाले. हरियानातून आलेल्या अघोरीनी मिरवणुकी दरम्यान चौकात अघोरी नृत्य,पाच फण्याचे नागासह भगवान महाकाल, नंदीवरील विराजमान होऊन भगवान शंकर अवतरले, जिवंत देखाव्यांनी नागरिकांना मंत्रमुग्ध केले होते. अघोरी विधी, विभूती भस्माची उधळण करीत भव्यदिव्य देखाव्यांनी मुरूम नगरीत भक्तिमय वातावरण पसरला होता,

 हरियाणातील अघोरी संघ कलाकारांनी डमरू आणि शिव धून तालावर अंगावर राख लावून विविध मुद्रामध्ये नृत्य सादर केले. ठीक ठिकाणी आगीच्या माध्यमातून ओम,त्रिशूल,डमरूचे चित्र रेखाटले,  शहर व परिसरातील नागरिकांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता तर ठीक ठिकाणी महिला वर्गातून देखावा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. प्रत्येक ठिकाणी भक्तीभावाने मिरवणुकीचे स्वागत केले. मंडळाने सुंदर उपक्रम राबविल्याचे नागरिकांतून स्तुती केले जात आहे. एकंदरीत मिरवणूक सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातवरणात पार पडला, मिरवणूक सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बसव भक्त महेश निंबरगे,सतीश शेळके, नागेश कारभारी, संजय धुमुरे, शरणप्पा वाडे, प्रदीप गव्हाणे,शिवा दुर्गे,गौरीशंकर बोंगरगे,ओमकार कुंभार,सिधलिंग हिरेमठ,राजकुमार वाले,सागर खूने,अनिल चव्हाण आदींनी परिश्रम घेतला यादरम्यान असंख्य बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे,पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौज तैनात करण्यात आला होता. नगर परिषद, महावितरण कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभले.

Labels:

Thursday, 16 May 2024

अतनुर ता. जळकोट येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

अतनुर ता. जळकोट  येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.


वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्‍ताहाला मोठे महत्त्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते. ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते.

जळकोट तालुक्यातील अतनुर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची 

सांगता बुधवारी हजारो जनसागराच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात झाली. अतनुर येथे अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात गेली सात दिवस सुरू होता. या सात दिवसांमध्ये दररोज भजन व पहाटे पाच वाजता काकड आरती होत होती. या सप्ताहाची बुधवारी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची गावात पायी दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. पायी दिंडी व शोभायात्रा मुख्य बाजार रस्त्यावरुन अंबाबाई मंदीर मार्गे बस स्टॅड मार्गे पाटलाच्या ईनामातुन कुंभार गल्ली,शाळेच्या मैदान अशी परिक्रमा करून भजनी मंडळीच्या हरिनामाच्या गजरात ढोल ताशाच्या निनादात व फटाक्याच्या आतिषबाजीत संपूर्ण गावात फिरून पायी दिंडी व शोभायात्रा परत शेवटी श्री काशी विश्र्वनाथ महाराज व संजीवन समाधी श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या पवित्र देवस्थान असणाऱ्या मंदिरात आली. पायी दिंडी व शोभायात्रा निघाली असता यात बालगोपालांसह टाळकरी महिला पुरुषांनी टाळमृदुंगाच्या आवाजावर फुगडीचा ठेका धरला. 

ज्ञानदेव तुकाराम च्या गजरात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. श्री पांडुरंग महाराज शिंपले  यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. व नंतर लगेच अन्नदाते सुर्यकांत पांचाळ यांच्या कडुन ठेवणण्यात आलेल्या महाप्रसादाला सुरुवात झाली. या महाप्रसादाचा लाभ अतनुर परिसरातील हजारो भाविकहाा भक्तांनी घेतला. अशाप्रकारे गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या सप्ताहाच्या सांगतेने शहर हरिनामाच्या गजरात, ढोलताशांच्या व फटाक्यांच्या अतिषबाजीने अक्षरक्षः दुमदुमले होते.

या सप्ताह यशस्वितेसाठी कमिटी अध्यक्ष विकास सोमुसे,ऊपाध्यक्ष गोविंद पाटील येवरे,हभप दयानंद स्वामी,प्रकाश पोलीस पाटील,चंद्रकांत जोशी गुरुजी, नामदेव कोकणे,माधव सोमूसे,सुर्यकांत पांचाळ,कासन मुगदळे,अशोक पाटील माजी सभापती कृषी ऊत्पन्न बाजार समिती,ऊदगीर,मारुती गुंडीले,श्रीधर पाटील गव्हाणे,श्रीमती मन्याबाई मधुकर पत्तेवार,पञकार संजय शिदे या सर्वानी सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी गेली दोन महिने मोलाचे योगदान व सहकार्य केले तसेच अन्य काही मंडळीनी आपल्या दिलेली जबाबदारी चोख पार पाडली म्हणुन श्री काशी विश्र्वनाथ महाराज मंदिर संमिती तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Labels:

Tuesday, 14 May 2024

पस्तीस वर्षानंतर स्नेहमेळाव्यात रमले दहावीचे विद्यार्थी

पस्तीस वर्षानंतर स्नेहमेळाव्यात रमले दहावीचे विद्यार्थी; जि. प. प्रशाला नंदगांव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

वागदरी (एस.के.गायकवाड):

जि. प. प्रशाला नंदगांव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील १९८८-८९ मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे माजी शिक्षक व निवृत्त विस्ताराधिकारी श्री. बाबूराव पडसलगे होते. यावेळी माजी शिक्षक श्री. प्रभाकर उपासे, श्री. गुरुनाथ मुळे, श्री. अशोक धुमाळ, श्री. रामचंद्र बुरगुटे, श्री. शिवाजी वऱ्हाडे, माजी सरपंच श्री. सिद्धेश्वर कोरे, शालेय समिती अध्यक्ष श्री. सागर पाटील आदी उपस्थित होते.
प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. सतीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सांगितले की, जि. प. प्रशाला नंदगांव या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक प्रस्थापित केला आहे.

पस्तीस वर्षांनी भेटलेल्या या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकमेकांना भेटून खूप आंनद झाला. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील आठवणी सांगितल्या. हा माजी विद्यार्थी संघ केवळ या स्नेहमेळाव्यापुरता मर्यादित न राहता, भविष्यात आपल्या समस्या सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे अशी भावना व्यक्त केली. 

तर माजी शिक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या या स्नेहमेळाव्यामुळे आमच्या भूतकाळातील सुखद आठवणींना उजाळा मिळाला आहे. आमचे विद्यार्थी मोठे होताना आम्हाला खूप आनंद होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या स्नेहमेळाव्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर आदी शहरातून जवळपास पन्नास माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते. सर्व माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना स्नेहमेळाव्याचे स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थीनींना शाळेतील आठवणी सांगिताना गहिवरून आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी कल्याणी कोरे, नजीर शेख, विलास जेवळे, सूर्यकांत शरणार्थी, श्रीशैल कट्टे, चंद्रकांत बशेट्टी राजकुमार पाटील आदींनी परिश्रम घेतले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Labels:

Monday, 13 May 2024

चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र, शाळा पुन्हा भरली

चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र, शाळा पुन्हा भरली

मुरूम ता.१२, 

येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील सन २०००-२००१ मधील दहावी विद्यार्थ्यांची दि.१२ मे वार रविवार रोजी " स्नेह मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम अध्यक्ष बापूराव पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नगर शिक्षण विकास मंडळ सचिव व्यंकट जाधव,माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सोसायटी चेअरमन दत्ता चटगे,गोविंद पाटील यांची उपस्थिती होती. 

जाफर मोमीन,अप्पू मुदकण्णा,अभिजित कुलकर्णी, आप्पासाहेब बिराजदार आदींच्या पुढाकाराने तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळा भरवली, आणि विद्यार्थी दसेतील आठवणींना उजाळा दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, विद्येची देवता सरवस्ती पूजन संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा,उपस्थित मान्यवरांचा शाल,फेटा, सन्माचिन्ह देऊन येतोचित्त सत्कार केला. याप्रसंगी दिवंगत शिक्षक व विद्यार्थी मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने पुन्हा एकदा शाळा भरवून जुन्या आठवणींच्या गप्पा रंगल्या.गुरुजनांनी, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मित्र- मैत्रिणी एकमेकींना अनेक वर्षांनी भेटून सुख:दुःखाच्या चर्चा रंगल्या होत्या. स्नेहभोजनाने पुरण-पोळी,आमरस,भजी,पापड्या वर ताव मारून स्नेह मेळाव्याचे सांगता संपन्न झाले.शांत कोरे,कल्याणी कारडामे,विशाल मुरूमकर,संतोष तगरखेडे, शिवराम जाधव,रियाज पटेल,पवन स्वामी,वर्षाराणी खुणे,अन्नपूर्णा खजुरेकर,उमादेवी सगरे,साधना जोशी,पूनम कांबळे,प्रियंका डोंगरे,केतकी पापळकर, पुष्पावती शेळके आदीसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेळके,प्रास्ताविक डॉ.सागर काबरा तर आभार अभिजित कुलकर्णी यांनी मानले.

Labels:

Saturday, 11 May 2024

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विजय कोणाचा याची उत्सुकता शिगेला

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विजय कोणाचा याची उत्सुकता शिगेला  : विजयाचे गणित सोडविण्यात मतांची बेरीज व वजा बाकी सुरू


वागदरी,दि.१०: एस.के.गायकवाड

 लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात दि.७ मे २०२४ रोजी मतदान झाले.एकुन ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.हे जरी खरे असले तरी खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्यातच झाली असून कार्यकर्ते व पुढारी विजयाचे गणित सोडविण्याकरीता मतांची बेरीज व वजाबाकी करण्यात मग्न आहेत.


  विजयाची मशाल पेटणार की घड्याळ बाजी मारणार हे कोडे मतमोजणी नंतरच उलगडणार असले तरी मशाल आणि घड्याळ आपापल्या परीने विजयाचा दावा करीत आहेत.तसं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ हा मुळात राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता.पण काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढून गेल्या अनेक वर्षांपासून कालपर्यंत भाजपा व शिवसेना युतीच्या माध्यमातून शिवसेनेने या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
  
आतापर्यत शिवसेनेचे शिवाजी कांबळे, कल्पनाताई नरहीरे,प्रा.रविद्र गायकवाड, आणि ओमराजे निंबाळकर आदींनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.गेल्या दहा वर्षांपासून भाजपा शिवसेना युतीचे भाजप, शिवसेना ,रिपाइं (आठवले),रासप व मित्रपक्ष मिळुन महायुतीमध्ये रुपांतर झाले आहे.आजही या महायुतीच्याच ताब्यात हा मतदार संघ आहे.पण या आडीच वर्षात अनेक  अनपेक्षित नाट्यमय घडामोडी महाराष्ट्रच्या राजकारणात घडल्या आहेत.शिवसेनचे कार्याध्यक्ष तथा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतुन  एकनाथ शिंदे आमदार आणि खासदारांचा  गट घेऊन भाजपाच्या महायुतीत सामील झाला.पाटोपाट काका पासुन फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडून अजीत  पवार हेही राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा आपला मोठा गट घेऊन भाजपाच्या महायुतीत सहभागी झाले.तसेच मनसेचे राज ठाकरे यांनी महायुतीतला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला त्यामुबळे अर्थातच महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि मित्र पक्ष मिळून उदयास आलेल्या महाविकास आघाडी समोर एक मोठं तगडे आव्हान उभे राहिले.जागा वाटपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघची जागा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (उबाठा)चे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोडण्यात आली.तर अनेक उमेदवारांच्या नावांची चर्चा करत शेवटी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मशाल हे निवडणुक चिन्ह देण्यात आले तर महाविकास आघाडीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात आले.अर्थात या मतदारसंघात मशाल विरुद्ध घड्याळ अशी चुरशीची लढत होऊन दि.७ मे  रोजी या मतदारसंघातील भावी खासदारांचे नशीब मशिन मध्ये बंद झाले आहे.
  

आता ४ जून २०२४ पर्यंत तर्क वितर्क करत  विजय कोणाचा याची उत्सुकता वाढवली जाते आहे.
  विजय कोणाचा याची चर्चा करताना मतांची बेरीज व 
वजा बाकीचे गणीत घातले जात आहे.या मतदार संघातील महायुतीचे राजकीय बलाबल पाहीले असता या मतदार संघातील आठ विधानसभा आमदार पैकी महायुतीचे आमदार जास्त आहेत.तुळजापूर, उमरगा -लोहारा,भुम-परंडा, लातूर जिल्ह्यातील औसा व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा आमदार हे महायुतीचे आहेत.तर उमरगा तालुक्यातील माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड व नुकतंच भाजपात प्रवेश केलेले माजीमंत्री बसवराज पाटील व तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र युवा नेते सुनील चव्हाण हे महायुतीच्या बाजुने आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शिवसैनिकाचे पाठबळ, शिवाय भाजपाची या मतदार संघात वाढलेली प्रचंड ताकद आणि अजित  पवार यांना मानणारा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गट, तुळजापूर न.प.चे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली वेगळं अस्तित्व निर्माण केलेले देवराज मित्र मंडळ आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेची निःपक्षपाती करत असलेली सेवा व गावागावात केलेली विकस कामे या सर्व बाबींची गोळाबेरीज केली असता महायुतीच्या सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.


  या उलट या लोकसभा मतदारसंघाचे विद्यामान खासदार उबाठा सेनेचे ओमराजे निंबाळकर यांची या मतदार संघातील जनतेवर चांगली पकड असून युवकांचा प्रचंड संपर्क त्यांचा आहे.युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ते ओळखले जातात शिवाय उबाठा सेनेचे उस्मानाबाद विधानसभा आमदार कैलास पाटील यांची खंभी साथ, शिवसेनेचे सर्वासर्वे कार्याध्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार या मतदार संघात आहे.नेते त्यांच्या सोयीनुसार भाजपात गेले असले तरी आम्ही त्यांच्या सोबत मेंढरा सारखे त्यांच्या पाठीमागे जाणार नाही असं म्हणणारे कट्टर शिवसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनुक्रमे उध्दव ठाकरे व शरद पवारांच्या पाठीमागे निष्ठा ठेवून उभे आहेत त्यामुळे त्यांचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार उबाठा सेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना होणार आहे.या मतदारसंघात प्रचारादरम्यान प्रचार मोदीचा तर जयजयकार ओम दादाचा अर्थात ओमराजे निंबाळकरांचा असे चित्र दिसत होते.त्यात वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते कोणाच्या पथ्यावर पडणार हाही एक प्रश्न आहे.त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या मशालीला मिळालेली मते सौ.अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळला मिळालेल्या मतातून वजा केली असता ओमराजे निंबाळकर यांचाच विजय मतदारांना खुणावत आहे.असे असले तरी दि.४ जून  रोजी होणाऱ्या मतमोजणी नंतरच उलगडणार आहे. या  निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ओमराजे निबांळकर यांची विजयाची मशाल पेटणार की सौ.अर्चनाताई पाटील यांचे घड्याळ बाजी मारणार?

Labels:

Monday, 6 May 2024

पॅंथर गंगाधर गाडे याना नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले) च्या वतीने श्रध्दांजली

पॅंथर गंगाधर गाडे याना नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले) च्या वतीने श्रध्दांजली 

नळदुर्ग ,दि.०६

संभाजी नगर (औरंगाबाद) येथील दलित पँथरचे चे नेते माजी मंत्री आंबेडकरी चळवळीतील लढवय्या नेतृत्व दिवंगत पॅंथर गंगाधर गाडे यांना नळदुर्ग ता.तुळजपू येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
   

आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू आणि धाडसी नेतृत्व गंगाधर गाडे यांचे नुकतेच संभाजी नगर (औरंगाबाद) येथे  निधन झाले..त्यांच्या  निधनाबद्दल नळदुर्ग येथे रिपाइं (आठवले)  शहर शाखेच्या वतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी युवकांचे प्रेरणास्थान गंगाधर गाडे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या नेतृत्व काळाच्या पडद्याआड आड झाले असून चळवळीत कधिही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे भावपूर्ण शब्दांत कार्यकर्ते यांनी श्रद्धांजली वाहिली.
  

या प्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, नळदुर्ग शहर अध्यक्ष मारुती खारवे, रिपाइंचे राजेंद्र शिंदे, सुभाष गायकवाड (बाभळसुर), सामाजिक कार्यकर्ते बंडु पुदाले,विश्वास रणे, बशीर बागवान, बबलु मकसुद शेख, शकील शेख, शहानवाज कुरेशी,प्रणाल गवळी, सलीम शेख, जेष्ठ कार्यकर्ते नामदेव बनसोडे, मकसुद शेखसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Labels:

Sunday, 5 May 2024

७ मे रोजी मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध राहणार ; जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे


७ मे रोजी मतदान केंद्रावर मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध राहणार ; जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे

 पाणी व प्रथमोपचाराची सुविधा, उन्हापासून बचावासाठी केंद्रांवर सभा मंडप, लहान मुलांना खेळण्याची सुविधा
 
धाराशिव,दि.05 

 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.मतदान केंद्रावर मतदारांना विविध सोईसुविधा उपलब्ध देण्यात येत आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी स्वयंस्फूर्तीने निवडणुकीच्या या उत्सवात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

जिल्ह्यात व्यापक प्रमाणात मतदार जागृतीसाठी मागील काही दिवसांपासून शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, महिला,सर्वसामान्य नागरिक,विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी सहकार्य केले. मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश आहे. 
 

उन्हापासून संरक्षणासाठी मंडप व्यवस्था

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. मतदानाच्या दिवशी मतदानासाठी केंद्रावर येणाऱ्या मतदारांना उन्हात उभे रहावे लागू नये यासाठी जेथे आवश्यकता आहे तेथे मंडप उभारण्यात येत आहे.मतदान केंद्रावर एकावेळी जास्त मतदारांना रांगेत उभे रहावे लागणार नाही,अशी व्यवस्था करण्यात येत आहे.मतदान केंद्रावर जास्त गर्दी झाल्यास मतदारांना जवळच्या कक्षात बसण्यासाठी टेबल खुर्चीची व्यवस्था केली जाणार आहे. मतदार तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मुबलक शुद्ध पिण्याचे पाण्याची,पाणी पिण्यासाठी ग्लास आणि स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे मतदान केंद्रावर उपलब्ध राहणार आहे.

व्हिल चेअर,प्रथमोपचार पेटी

कडक उन्हाळा लक्षात घेता वाढत्या तापमानामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास तातडीने उपचार करता यावे यासाठी केंद्रावर प्रथमोपचाराची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे.आवश्यकता पडल्यास ठराविक ठिकाणी डॉक्टर व अँम्बुलन्स देखील उपलब्ध असणार आहे. 

ज्या मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार मतदान करतील त्या केंद्रावर व्हिल चेअरची सुविधा उपलब्ध राहणार आहे.तसेच रॅम्पची व्यवस्था राहणार आहे.अंध मतदारांसाठी मतदान करतांना बॅंलेट युनिटवरच असलेल्या ब्रेल लिपीच्या आधारे मतदान करता येणार आहे.

*मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप*

मतदारांना मतदान करतांना अडचण येऊ नये,त्यांना मतदान केंद्र,मतदार यादीतील अनुक्रमांक,भाग क्रमांक सहज उपलब्ध व्हावा यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत बार कोड असलेल्या मतदान पत्रिका (व्होटर स्लिप) घरोघरी वाटप करण्यात येत आहे.त्यामुळे मतदारांना बार कोड स्कॅन केल्यावर त्यांचे मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती होण्यास मदत होईल.

*प्रत्येक केंद्रावर मतदार सहायता कक्ष*
जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदान सहायता कक्ष स्थापन केला जाणार आहे.ज्या मतदारांना व्होटर स्लिप प्राप्त झाल्या नसतील,त्याना या केंद्रात त्या उपलब्ध होतील.मतदारांना आवश्यक सहाय्य केंद्रात उपलब्ध मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होतील.

*मतदान केंद्रावर पाळणाघर व हिरकणी कक्ष* 
मतदानासाठी बालकांना सोबत घेऊन येणाऱ्या मातांना मतदान केंद्रावर बालकांसाठी पाळणाघराची व हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.5 प्रकारची खेळणी बालकांसाठी उपलब्ध राहणार आहे. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास ट्यूबलाईटची व्यवस्था राहणार आहे. 

मतदानाच्या दिवशी मतदारांची मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही,यासाठी जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण केली आहे.तरी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदाराने मतदानापासून वंचित राहू नये व मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले आहे.

Labels: